Kamra Andhare latest update-कामरा, अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर

सुप्रसिद्ध स्टॅंडिंग कॉमेडीयर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे हे दोघेही काल मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र विधिमंडळ हक्कभंग समितीसमोर हजर राहिले होते. पण या समितीने काल सुनावणीच घेतली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ज्याने हक्कभंग प्रस्ताव मांडला ते प्रवीण दरेकर काल समितीसमोर हजर राहिले नाहीत.त्यामुळे हक्कभंग समिती आता ही सुनावणी पुढील महिन्यात दहा मार्च रोजी घेणार असल्याचे अधिकृत रित्या समजले.

ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढीे या विडंबनात्मक गाण्यातून कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली होती. या टीकेचे समर्थन सुषमा अंधारे यांनी केले होते. त्यामुळे या दोघांच्याविरूद्ध हक्क भंग प्रस्ताव मांडलेला होता. त्याची सुनावणी आता पुढील महिन्यात दहा मार्च 2026 रोजी होईल.

Leave a comment