रोहित पवार यांनी दुसऱ्यांदा पत्रकार घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूचे कारण काय? यावर स्पष्टपणे आपले मत मांडले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे तर पायलटचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घातपात केला गेला असावा असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. प्रसारमाध्यमासमोर सादरीकरण करताना धक्कादायक बाबींचा उलघडा त्यांनी केला. प्रमाणापेक्षा जास्त इंधन भरल्यामुळेच विमानाचा कोसळताच स्फोट झाला. हा स्फोट झाला नसता तर कदाचित अजितदादा वाचले असते. अतिसुरक्षित ब्लॅक बॉक्सही कसा जळाला ?आणि ब्लॅक बॉक्स जळाला याची माहिती किती दिवसांनी तुम्ही देता? हे सर्व संशयास्पद आहे. व्ही एस आर कंपनीत गोपी नावाची व्यक्ती फ्लाईट प्लॅन बनवते. कागदपत्रांमध्ये हेराफेरी करण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत त्यामुळे तपास यंत्रणांनी ई-मेल मेसेजेस अशा डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी करावी अशी मागणी ही अजित पवार यांनी केली आहे.