Shivaji Maharaj weapons-अफजलखानाचा वध करण्यासाठी शिवरायांनी एक खास शस्त्र बनवून घेतले होते. तुम्हास माहित आहे का ते शस्त्र?

अफजलखानाचा वध करण्यासाठी शिवरायांनी एक खास शस्त्र बनवून घेतले होते. हे शस्त्र तुम्हास माहित आहे का? होय असे शस्त्र शिवरायांनी बनवून घेतले होते. विजापूरच्या आदिलशाहाने शिवरायांचा बिमोड करण्यासाठी अफजलखानाला स्वराज्यात पाठवले होते. अफजलखानाने वाई, सातारा भागात धुमाकूळ घातला होता. अनेक ठिकाणी शेतीचे, पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शिवरायांनी अफजलखानाला चर्चेसाठी प्रतापगडावर बोलावले. शिवरायांच्या बोलावण्यावरून आमचं खान आला; पण त्याने दगा फटका केलाच तर आपण सावध असावे म्हणून शिवरायांनी एक शस्त्र बनवून घेतले होते.ते शस्त्र कोणते ते आपण जाणून घेऊया.

*बिचवा/ खंजिरी*

बरेच जण सांगतात की अफजलखानाला मारण्यासाठी शिवरायांनी वाघ नख्या वापरल्या होत्या: पण वाघ नख्या या अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वापरल्या नव्हत्या .तर अफजलखानाने जेव्हा शिवरायांना मगरमिठी मारली , त्यावेळी अफजलखानाची ही मिठी सैल करण्यासाठी शिवरायांनी वाघ नख्या त्याच्या कमरेत रूतवल्या. त्यामुळे अफजलखानाची मिठी सैल झाली.त्याचवेळी शिवरायांनी आपल्या उजव्या हातात लपवलेला बिचवा खानाच्या पोटात घुसवला आणि खानाची आतडी बाहेर काढली. हा बिचवा हाताच्या मनगटात त्याच्या चांगल्या पद्धतीने बसवलेला असतो. त्याला दोन्ही बाजूला धार असल्यामुळे तो खचकन पोटात घुसतो .त्यामुळेच अफजलखानाच्या पोटात बिचवा घुसला आणि खानाची आतडी बाहेर आली. त्यावेळी खानाची मिठी आणखी सैल झाली आणि त्याने शिवाजीरायांना सोडून दिले खानाला तिथेच टाकून शिवराय सभा मंडपातून बाहेर आले. पुढचा सर्व इतिहास तुम्हास माहीत आहेच.

जय शिवराय

Leave a comment