एपस्टीन फाईलमुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील भलेभले आणि बडे बडे नेते चांगलेच गोत्यात आलेले आहेत. त्यामध्ये आता ब्रिटनचे राजघराण्यातील प्रिन्स अँड्रू यांना अटक केल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. एपस्टीन फाईलमध्ये जगातील अनेक नेत्यांची नावे आहेत.इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स याशिवाय अन्य देशातीलही कित्येक नावे आहेत. भारतातीलही नेत्यांची एपस्टीन फाईलमध्ये नावे आहेत. पण विदेशात ज्याप्रमाणे एफस्टीम फाईलमध्ये नाव आलेल्यांच्यावर थेट कारवाई केली जात आहे, त्याप्रमाणे भारत देश मात्र या संदर्भात चिडीचूप आहे.विरोधी पक्षाने फाईलवर आवाज उठवला असतानाही तो दडपण्याचे काम सरकारने आणि मीडियाने केले आहे. मीडिया ही सरकारच्या हातची बाहुली बनली आहे. एपस्टीन फाईलमध्ये केंद्रीय मंत्री हार्दिकसिंग पुरी ,अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी यांची नावे आहेत; पण भारत सरकार मार्फत कोणतीही कारवाई झालेली नाही.अनेक परदेशी नेत्यांनी आपले नाव जाहीर झाल्याबरोबर आपल्या पदाचा राजीनामा दिला; पण भारतात मात्र असे घडले नाही.