Rahul Gandhi AI Summit statement-ए आय समिट हा केवळ तमाशा: राहुल गांधी

गलगोटियाज् विद्यापीठाच्या तांत्रिक श्वानावरून झालेला वाद चांगलाच रंगला आहे. त्यामुळे भारताच्या प्रतिमेवर आघात झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी या समिटची प्रसिद्धी म्हणजे एक तमाशात असे म्हणत या समिटची खिल्ली उडवली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरून एआय समिटवर शरसंधान केले असल्याचे बोलले जाते. राहुल गांधी म्हणाले की भारताची प्रतिभा आणि डेटा यांचा योग्य प्रकारे वापर करण्याऐवजी इंडिया एआयएस इम्पॅक्ट समिट हा विस्कळीत पीआर शो ठरला आहे. यात भारतीय डेटा विक्रीसाठी खुला आहे आणि मंचावर चिनी उत्पादकांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या इम्पॅक्ट समिटमध्ये चिनी कंपनीचा यांत्रिक स्वान भारतीय नवोपक्रम म्हणून सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून याप्रकरणी चिनी प्रसार माध्यमांनी सुद्धा भारताची खिल्ली उडवली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Leave a comment