Threat to kill Rahul Gandhi-राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी: देशभर तीव्र संताप

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने आज एका व्हिडिओद्वारे गोळ्या घालून ठार करण्याची धमकी दिली. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांची भूमिका अगदी परखड आणि स्पष्ट असल्याने सरकार चांगले जेरीस आले आहे.राहुल गांधी यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर ट्रेड डीलवर ही संसदेत अतिशय उत्तम पद्धतीने आक्षेप घेतला.या सर्व गोष्टींमुळे केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. राहुल गांधीची वाढती लोकप्रियता सहन न झाल्याने भाजप व करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधीसह काँग्रेसच्या 25 खासदारांना गोळ्या घालून हार करण्याची धमकी दिली आहे.

*ही तर विषारी संस्कृती: वेणुगोपाल*

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांनी या धमकीवर जोरदार टीका केली असून स्वतःला मोदीभक्त मानणाऱ्या लोकांकडून राहुल गांधी यांना दिवसाढवळ्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून सत्ताधारी व्यवस्थेकडून त्यांना कोणताही समज किंवा शिक्षा दिली जात नाही.ही बाब खूप गंभीर आहे. हा तर विषारी सांस्कृतीचा परिणाम आहे .राहुल गांधी यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण राहुल गांधी आणि मी एक इंचही मागे हटणार नाही असे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

Leave a comment