राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नवे अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांनी धुरा सांभाळली आहे. एक तडफदार आणि परखड व्यक्तिमत्त्व अजित पवार यांचा पक्षावर एक वेगळाच वचक आणि पकड होती. आता प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे;पण त्यांना हा पक्षावर वचक ठेवणे पेलेल का?पक्ष वाढवणे जमेल का? प्रफुल्ल पटेल अध्यक्ष करण्यासाठी कोणी दुसऱ्याच व्यक्तीने अर्थात भाजपाने हस्तक्षेप केला आहे का? याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा चालू आहे. असे असले तरी प्रफुल्ल पटेल यांच्या कारकीर्दीत राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट उतरंडीला लागलेला दिसेल असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.