Gold and Silver Price Fluctuations-सोन्या-चांदीच्या भावात चढउतार

भारतीय व्यापार पेठेमध्ये सोन्या-चांदीच्या भावात दररोज मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 चे सोन्या-चांदीचे भाव असे आहेत–
महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याच्या भावाला एक लाख 54 हजार ते एक लाख 56 हजार रुपये असा भाव आहे. तर चांदीचा भाव दोन लाख 40 हजार ते दोन लाख 50 हजार रुपये किलो या दराने आहेत.

जागतिक अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोन्याच्या भावात दररोज मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. असे असले तरी सोने दीड लाखांच्या आसपास आणि चांदी अडीच लाखांच्या आसपास गेल्यामुळे दागिने खरेदी विक्रीला मर्यादा आलेली आहे. असे असले तरी सोने आणि चांदी याच्यामध्ये गुंतवणूक करणारे शेअर बाजार मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्या चांदीच्या घरात काहीही चढ उतार झाले तरी नेहमीच सोने दीड लाखांच्या आसपास तर चांदी अडीच लाखांच्या आसपास राहील असा अंदाज आहे*

Leave a comment