BMC 36000 crore deposits-मुंबई महापालिका 36 हजार कोटी रुपयांच्या ठेवी खर्च करणार

महापालिका पालिका , जिल्हा परिषदा, वेगवेगळ्या सहकारी संस्था, बँका आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी म्हणून ठेवी ठेवत असतात. त्या अडचणीच्या वेळी खर्च केल्या जातात.पण भाजपाची सत्ता येतात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या 36 हजार कोटी रुपये किमतीच्या ठेवी खर्च करणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे सगळीकडे हाहाकार माजला आहे. हाच का तो नव्या सरकारचा कारभार? अशा प्रकारचे प्रश्न मुंबईकर आणि महाराष्ट्रवासीय विचारत आहेत. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 92 हजार कोटी रुपयांच्या होत्या.त्यापैकी प्रशासकीय काळात बऱ्याच ठेवी मोडल्या आहेत. या मोडलेल्या ठेवी नेमक्या कोणत्या कारणासाठी खर्च झाल्या? याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ठेवी मोडणे हे चुकीचे आहे.

Leave a comment