Indian solar import duty 126%-डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरीपणा चालूच: भारतीय सौर उत्पादनावर 126%आयात शुल्क

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांचा आयात शुल्कावर कडाडून टीका केली असून ते रद्दही केले आहेत.याचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांना खूप मोठा बसला असला तरी त्यांचा मनमानी कारभार चालूच आहे. त्यांनी भारताच्या सौर उत्पादनावर 126 टक्के आयात शुल्क लागू केले आहेत. त्यामुळे भारतातून सौर उत्पादने निर्यात करताना भारताला निर्यात शुल्क म्हणून जबर किंमत मोजावी लागणार आहे. भारत यापूर्वी सौर उत्पादन अंतर्गत स्पेअर पार्टस् चीनकडून आयात करत होता; पण आता तो व्हिएतनाम,मलेशिया, सिंगापूर या देशातून मोठ्या प्रमाणात आयात करतो. भारत-अमेरिका सौर आयात-निर्यातमध्ये भविष्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचा तोटा भारत आणि अमेरिकेलाही सोसावा लागणार आहे.

Leave a comment