Iran Israel America War 2026-इराण-इस्रायल,अमेरिका युद्ध पेटले:दुबईसह अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला

इराण विरुद्ध इस्रायल,अमेरिका असे युध्द पेटले असून या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचे रूप निर्माण होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणनेही प्रत्युत्तर देण्यासाठी दुबईवर हल्ला केला असून दुबईच्या मरीना बीचवर क्षेपणास्त्र मारा केला आहे. त्यामुळे दुबईने आपल्या राज्यात हाय अलर्ट जारी गेला आहे.दुबईने बुर्ज खलिफा सारखी अनेक ठिकाणे खाली करण्यात आली आहेत. अमेरिकेने इराणवर थेट हल्ला केल्यामुळे इराणचे सर्वेसर्वा खामेनी आणि त्यांचे कुटुंबीय मृत्युमुखी पडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका अशा या युद्धाला जर तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप प्राप्त झाले तर जगामध्ये खूप मोठी आर्थिक आणि जीवित हानी होण्याची शक्यता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षा भयानक स्थिती निर्माण होईल आणि जग संकटाच्या खाईत लोटले जाईल असे दिसत आहे.हे युद्ध केवळ तीन देशांच्या मध्ये नसून हळूहळू अनेक देश यामध्ये जोडले जातील. यापूर्वी भारताने अलिप्ततावाद स्वीकारल्यामुळे पंडित नेहरूंच्या धोरणांमुळे भारताला आंतरराष्ट्रीय युद्धाची कोणतीही झळ बसत नव्हती;पण आता युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला जाऊन आले आणि त्यांचा पुरस्कार स्वीकारला. त्यामुळे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाला खिळ बसली आहे. या युद्धाचे परिणाम भारतालाही भोगावे लागणार असून जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होणार असून शेअर बाजार आधीच ढासळलेल्या अवस्थेत असून तो आणखी ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगासह भारतातही जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे.

Leave a comment