Kejriwal acquitted- केजरीवाल सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता

भारतीय जनता पक्षाच्या काळात म्हणजे 2014 पासून सुमारे पाच हजारहून अधिक सीबीआय आणि इडीचे खटले दाखल झाले आहेत. पण या सर्व खटल्यातील केवळ तीनच खटले असे आहेत की त्यात ते दोषी आढळले आहेत. बाकीच्या अन्य कोणत्याही खटल्यामध्ये कोणीही दोषी आढळलेले नाहीत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्यावर मद्य खरेदी विक्रीतून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता; पण दिल्ली न्यायालयामध्ये या खटल्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि इतर सर्व आरोपींना न्यायाधीशाने निर्दोष मुक्तता करून भारतीय जनता पक्षाला चांगलीच चपराक दिली आहे. सीबीआय आणि इडीचे हे सर्वात मोठे अपयश आहे.खोटे खटले दाखल करणे हे किती लोकशाहीच्या घातक आहे या निकालावरून स्पष्ट होते.

Leave a comment