Iran Supreme Leader India relations-इराणचा सर्वोच्च नेता आणि भारत सहसंबंध

गेली 46 वर्षे इराणवर एकहाती सत्ता गाजवणारा इराणचा सर्वोच्च नेता आणि इराणचे राजकीय, धार्मिक नेतृत्व म्हणजे अय्यातुल्ला अली खामनेई यांचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल अमेरिकेच्या माऱ्यात अंत झाला. हे जरी खरे असले तरी भारत आणि इराण यांच्यामध्ये खूप जिव्हाळ्याचे राजकीय, व्यापारी संबंध होते. आजही भारतीय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये इराणचे साठ हजार कोटी रुपये पडून आहेत.यावरून इराणचे दातृत्व आणि भारत प्रेम स्पष्ट होते.

इराणचे राष्ट्रपती तथा सर्वेसर्वा

डिसेंबर 1979 रोजी इराणचे सर्वोच्च राष्ट्रपती म्हणून अय्यातुल्ला अली खामनेई यांनी हातात सूत्रे घेतली .तेव्हापासून ते आज आजतागायत इराणवर सत्ता राखण्यासाठी यशस्वी झाले होते. त्यांच्या देशप्रेमाचा आणि कुशल नेतृत्वामुळे हे शक्य झाले. खामनेई यांच्याकडे सत्तेची सूत्रे आल्यापासून इस्राइल आणि अमेरिका नेहमीच इराणचा द्वेष करू लागलेत.इराणला पाण्यात बघू लागलेत.इराणचा उत्कर्ष होऊ नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या काळात इराण द्वेष शिगेला पोचला आणि त्याचा परिणाम म्हणून 28 फेब्रुवारी 2026 पासून इराण-इस्रायल अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. त्यात खामनेई यांचा मृत्यू झाला असला तरी इराणने केलेला प्रति हल्ला पाहून अमेरिका आणि इस्रायल तोंडात घातली आहेत. खामनेई यांच्यावर धर्मांधतेची टीका होत असली तरी त्यांनी इराणच्या जनतेचे प्रचंड प्रेम मिळवले आहे. अमेरिका आणि इस्राइलसमोर ते झुकत नाहीत हेच मुख्य कारण द्वेषाचे होते.त्यामुळेच अमेरिका आणि इस्रायल वारंवार इराणला पाण्यात बघत होते.

भारत इराण परस्पर संबंध

खामनेई यांच्या काळात भारत आणि इराण यांच्यातील संबंध खूप घनिष्ठ निर्माण झाले होते. पाकिस्तानने काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर हाताळण्याची मागणी केली तेव्हा भारताने आपले दूत पाठवले आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्यावेळी इराणने आपल्या देशासह अन्य सत्तावन्न देशाशी संपर्क साधून भारताच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे काश्मीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नाही. तो भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील प्रश्न आहे. इराणचे एवढे मोठे उपकार भारतावर आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग यांच्या सर्वांच्या काळात भारत आणि इराण यांच्यात व्यापार वृद्धिंगत झाला. या गोष्टीचा भारताला जेवढा फायदा झाला तसाच तो इराणलाही झाला; पण 2014 नंतर मात्र भारत इराण संबंधाला ओहोटी लागली.नरेंद्र मोदी यांचे अमेरिका आणि इस्रायल प्रेम भारत इराण संबंधाला ब्रेक देणारे ठरले.यामध्ये भारताचे खूप मोठे नुकसान भविष्यात होणार आहे.

Leave a comment