India T20 World Cup victory-भारताने सलग दुसर्‍यांदा M T-20 विश्वचषक जिंकला

2024 सालानंतर 2026 साली सुद्धा भारताने पुरुषांची T-20 विश्वचषक स्पर्धा जिंकून विक्रम प्रस्थापित केला. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय न्यूझीलंडला चांगलाच महाग पडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 255 धावांची भक्कम आघाडी घेतली. यामध्ये सॅमसंग,अभिषेक शर्मा ईशांत किशन यांनी उत्तम खेळ करून भारताचा पाया मजबूत केला. न्यूझीलंडची फलंदाजी एकापाठोपाठ एक कोसळत गेली आणि 96 धावांनी भारताने न्युझीलंडवर मात करून विश्वचषक पटकावण्याचा मान मिळवला. अहमदाबाद येथील क्रीडांगणावर बऱ्याच वेळा भारताला अपयश आले होते. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते; पण अखेर भारताने हा सामना उत्तम पद्धतीने खेळल्यामुळे हा सामना जिंकला.

Leave a comment