अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजे एक विक्षिप्त माणूस आहे. असेच म्हटले पाहिजे. कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेणारा राष्ट्राध्यक्ष अशी नोंद त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये घेतली तरी लोकांना योग्यच वाटेल.असाच निर्णय अमेरिकेने इस्रायलच्या सल्ल्यावरून इराणसी युद्ध पुकारण्याचा घेतला आहे.युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला खामनेई यांची हत्या करण्यास अमेरिका यशस्वी झाली. अमेरिकेला आता जग जिंकल्यासारखे वाटले;पण इराण हरले नाही. इराणने नवीन राष्ट्राध्यक्ष निवडला आणि दुप्पट वेगाने इस्राईल आणि अमेरिकेशी युद्ध चालू ठेवले. एवढेच नाही तर या दोन्ही राष्ट्रांना अक्षरशः जेरीस आणले.युद्ध थांबता थांबेना अशी परिस्थिती आता निर्माण झालेली असून काहीही असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही लक्षात आलेले आहे की आपण इराणसी वैर करून खूप मोठी चूक झालेली आहे; पण ते आपली चूक उजळ माथ्याने कधीही कबूल करणार नाहीत आणि त्यांचा स्वभावही तसा नाही. एका डोनाल्ड ट्रम्पमुळे तीन देशातील लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. आणि त्याचबरोबर जगातील अनेक देशांवर आर्थिक संकट येत आहे. त्याला जबाबदार इराण नव्हे तर अमेरिका आणि इस्रायल आहे. आणि जे देश या दोन राष्ट्रांचे गुलाम बनले आहेत त्यांनाही त्याची फळे भोगावे लागत आहेत.अमेरिकेतील लोकांच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध होत आहे.मोठा विरोध होत आहे. हे युद्ध थांबवायला हवे या मागणीचाही जोर वाढत आहे. सर्वार्थाने ट्रम्प आता मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती ट्रम्प यांची झालेली आहे.