America softens war proposal-अमेरिका नरमली: युद्ध थांबवण्यासाठी ओमानकडे प्रस्ताव

गेले पंधरा दिवस इराण विरुद्ध अमेरिका- इस्राईल असे युद्ध चालू आहे.या युद्धात इराणबरोबरच इस्रायल आणि अमेरिकेचेही प्रचंड नुकसान झालेले आहे.अमेरिकेला असे वाटत होते की दोन-तीन दिवसातच इराण शरणागती पत्करेल आणि आपला विजय होईल; पण गेले पंधरा दिवस इराणने दिलेला लढा पाहून अमेरिकेला आता जाणीव झालेली आहे की युद्ध थांबवणे खूप गरजेचे आहे. आखाती देशात युद्धाचे वादळ निर्माण झाले तर त्याचे परिणाम अमेरिकेलाच भोगावे लागतील.अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडेल याची जाणीव अमेरिकेला चांगलीच आहे. म्हणूनच अमेरिकेने ओमानकडे युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. इराणने हार्मुझ सामुद्रधुनीवर तेलाच्या बोटिंची केलेली कोंडी आणि त्याचा परिणाम अमेरिकेसह अनेक राष्ट्रांवर होत आहे. ही स्थिती अशीच आणखी काही दिवस राहिले तर अनेक देशांना गॅस मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.

*युद्ध होऊ नये म्हणून ओमानचे प्रयत्न Oman’s efforts to avoid war*

इराणला युद्ध नको होते.अमेरिकेला आणि इस्रायलला युद्ध हवे होते. हे युद्ध होऊच नये म्हणून ओमानने मध्यस्थी केली होती आणि युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 2026 रोजी ओमानने अमेरिकेला सांगितले होते की इराणने आपण ठेवलेल्या जवळजवळ सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे युद्ध व्हायला नको अशी परिस्थिती निर्माण करावी असा संदेश देऊनही अमेरिकेने इराणवर पहिला हल्ला केला आणि त्यात इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा खून केला. या गोष्टीमुळे युद्ध भडकले आणि ते पुढे पंधरा दिवस चालत राहिले.आता परिस्थिती उलटली आहे इराणने तेलाबरोबरच आखाती देशातील पाण्याची नाकेबंदी करण्याची योजना आखली आहे. आणि असे झाले तर त्याचा परिणाम आखाती देशांना चांगलाच भोगाव लागणार.

*अमेरिकेचा प्रस्ताव: इराणच्या अटी US proposal to stop war: Iran puts forward conditions*

हे युद्ध थांबत नाही हे अमेरिकेच्या लक्षात आल्यावर अमेरिकेने ओमानच्या माध्यमातून युद्ध थांबण्यासाठी प्रस्ताव ठेवला;पण इराणचे तो धुडकावला आणि युद्ध थांबवायचे असेल तर आमच्या तीन अटी आहेत त्या तुम्ही मान्य करा असे सांगितले आहे.इराणने ठेवलेली पहिली अट म्हणजे अमेरिका आणि इस्रायलने या युद्धात जे काही इराणचे नुकसान केलेले आहे, ते नुकसान येत्या दहा वर्षात टप्प्याटप्प्याने भरून द्यावे. दुसरी अट म्हणजे नजीकच्या साठ दिवसात अमेरिकेने आखाती देशातील सर्व लष्करी तळ हलवावे. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे आतापर्यंत अमेरिकेने जे जे इराणवर निर्बंध लादले आहेत ते सर्व निर्बंध उठवावेत. ह्या अटी मान्य असतील तरच युद्ध थांबेल असे इराणने ठणकावून सांगितले आहे .अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या पिण्याचे पाणी निर्माण करणाऱ्या कारखान्यावर हल्ला करून तो कारखाना उद्ध्वस्त केला. इराणने त्याच वेळी सांगितले की तुम्ही नवीन पायंडा पाडत आहात. आता इराणने धमकी दिली आहे की तुम्ही केलेली चूक निस्तारण्यासाठी तुम्हाला आखाती देशांवर मोठे संकट पाहायला मिळेल. आम्ही जर नजीकच्या काळात आखाती देशातील पिण्याच्या पाण्याच्या निर्मितीचे कारखाने उध्वस्त केले तर आखाती देशाला पिण्यासाठी पाण्याचा थेंबही मिळणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होईल आणि याला जबाबदार इस्राईल आणि अमेरिका असेल. इराणने आणखी एक गोष्ट सांगितली आहे की आम्ही नजीकच्या काळात रशिया आणि चीनला लष्करी तळ इराणमध्ये उभारण्यास परवानगी देत आहोत. याचा अर्थ तिसऱ्या महायुद्धाची नांदी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a comment