अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण अशा जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या अंकित असलेल्या सर्वच देशांना रशियाकडून 30 दिवसांसाठी कच्चे तेल खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिकेने भारताला यापूर्वीच रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली होती. आता ती इतर देशांनाही दिलेली आहे. जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मोज्तबा यांनी हार्मुझ सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करण्यास अडथळा निर्माण करण्यात येईल अशी स्पष्ट घोषणा केली आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल इराणवरील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत हार्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार अशी घोषणा केलेली आहे. याचा परिणाम म्हणजे तेलाचा भाव सध्या वाढलेलाच आहे.तो 100 डॉलरच्या घरात गेलेला आहे. भविष्यात तो आणखी काही दिवस युद्ध चालले तर प्रति बॅरल 200 डॉलरवर जाईल आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढेल म्हणून अमेरिकेने जागतिक बाजारपेठेमध्ये महागाई वाढू नये यासाठी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. अर्थात संपूर्ण जगाचा रोश आपल्यावर येऊ नये म्हणून अमेरिकेने काढलेली ही पळवाट आहे. पण जगातील अनेक देशांना हे लक्षात आले आहे की हे युद्ध अमेरिका आणि इस्रायलमुळेच झालेले आहे.
*भारतासह इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी देणारा अमेरिका कोण?*
भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे 80 वर्षे पूर्ण होत आहेत. या 80 वर्षाच्या कालावधीत भारताला कधीही कोणाकडून कोणती वस्तू खरेदी करायची याची परवानगी अमेरिकेकडून घ्यावी लागलेली नाही. पण आत्ताच कशी काय अमेरिका तेल खरेदी करण्यास परवानगी देत आहे? म्हणजे भारताचा रिमोट कंट्रोल अमेरिकेकडे आहे की काय?असा प्रश्न भारतीय समाजातील नागरिकांना पडत आहे. या रिमोट कंट्रोलचा आणि एपस्टीन फाईलचा काही संबंध आहे का हाही प्रश्न लोकांना पडत आहे. भारतासह इतर देशांनाही अमेरिका रशियाकडून तेर खरेदी करण्यास परवानगी देत आहे.खरे तर ही बाब गुलामगिरीची आणि दुर्दैवाची आहे.