Sonam Wangchuk released-सोनम वांगचुक यांची अखेर सुटका Sonam

भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ, रॅम्सन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांची 170 दिवसांनी अखेर सरकारने सुटका केली आहे.
सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सोनम वांगचुक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.सोनम वांगचुक हे तर आपल्या लड्डाख परिसरातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून लढा देत होते. त्यांच्या या लढ्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून केंद्र सरकारने त्यांनाच राष्ट्रद्रोही ठरवून अटक केले. सोनम वांगचुक हे केवळ शास्त्रज्ञ नाहीत, तर ते शिक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत. मुलांना ज्या त्या भागातील परिस्थितीनुसार शिक्षण देण्यात यावे आणि हे शिक्षण कृतीशील असावे असा त्यांचा अट्टाहास होता. आणि असे छोटे मोठे प्रयोग करूनही सोनम वांगचुक यांनी आपल्याला परिसरातील मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. एवढेच नाही तर त्यांनी सैनिकांसाठी बर्फाळ प्रदेशात उबदार स्वेटर कसे निर्माण करावे किंवा उबदार कुटी कशी निर्माण करावी याचेही तंत्रज्ञान अवगत केले होते. त्याचा खूप मोठा फायदा भारतीय लष्कराला झाला.अशा सोनम वांगचुकला अचानक उचलून तुरुंगात टाकले. हे सरकारला शोभनीय आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकाल आपल्या उलट जाईल आणि आपली नाचक्की होईल या भीतीनेच सोनम वांगचुक यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेऊन सरकारने त्यांना मुक्त केले आहे. हा एक लोकशाहीचा विजय झाला असे म्हणता येईल.

Leave a comment