आयसीसीने मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी जाहीर केलेल्या ताज्या महिला वनडे क्रमवारीत टीम इंडियाची स्टार सलामीवीर आणि तडफदार फलंदाज उपकर्णधार स्मृती मानधनाने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही सातव्या स्थानावर आहे पहिल्या टॉप टेन मध्ये दोन भारतीय फलंदाज आहेत. स्मृती मानधनाने पहिला क्रमांक पटकावताना 790 रेटिंग गुण मिळवले, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेली दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड हिने 782 गुण मिळवले. स्मृती मानधना ही महाराष्ट्राची कन्या असून ती सांगलीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रवाशीयांना तिचा अभिमानच आहे. दिवसेंदिवस स्मृती मानधनाची फलंदाजी बहरत असून तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाचा तिने आपल्या फलंदाजीवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. हा एक स्मृती मानधनांकडून चांगला गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे. आयसीसी क्रमवारीत टॉप टेन मध्ये ऑस्ट्रेलियाचे तब्बल चार फलंदाज आहेत.