Strait of Hormuz closure news-होर्मुझची सामुद्रधुनी बंदच ठेवणार: मोज्तबाचा इशारा.तर भारतात गॅस साठा पुरेसा

इराणीचे राष्ट्राध्यक्ष अय्यातुल्ला खामनेई यांची हत्या झाल्यानंतर नूतन राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हातात घेतलेले मोज्तबा यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच ठेवणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. इराण विरुद्ध इसरायल-अमेरिका युद्ध हळूहळू विकोपाला गेले असून जागतिक गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हार्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या गॅस वाहतूक जहाजांना इराणने परवानगी दिलेली नाही किंवा कुणी वाहतूक केलीच तर इराण त्यावर हल्ला करून जहाजा नष्ट केल्या जातील असा इशारा दिला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांवर नजीकच्या काळात गॅस टंचाईची शक्यता वर्तवली जाते. भारत सरकार भारतात गॅस टंचाई नसल्याचे कितीही सांगत असले तरी सत्य लपवता येत नाही. अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाल्यामुळे हॉटेल्स, खानावळी बंद पडत आहेत. हे उघड्या डोळ्यांनी सरकारला दिसत नाही का? सरकारने वस्तूस्थिती काय आहे हे लोकांसमोर ठेवावे अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षानेही वस्तुस्थिती बाबत विचारणा केली आहे. त्याला उत्तर देताना हरदीप पुरी यांनी भारतात पुरेसा गॅस असल्याचे सांगितले आहे; पण ते वास्तव नाही. ऐन युद्धाच्या तोंडावर गॅसचे दर वाढले आहेत.सरकार तिकडे डोळेझाक करत आहे.

Leave a comment