Iran attack on American warship-इराणचा अमेरिकेन युद्ध नौकेवर हल्ला: इराणचाही प्रस्ताव

अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने पाच दिवस सीझ फायर केल्यानंतर इराणकडे 15 कलमी प्रस्ताव पाकिस्तानमार्फत पाठवला होता. हा प्रस्ताव इराणने धुडकावून लावून अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केला. अब्राहम लिंकन ही सर्वात श्रेष्ठ असलेली युद्धनौका आहे. याच युद्धनौकेवर इराणने हल्ला केल्याचा दावा केला. मात्र अमेरिकेने त्याला तिजोरा दिला नाही. अमेरिकेने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणने आपलाही प्रस्ताव अमेरिके पुढे ठेवला आहे.

इराणचा अमेरिकेपुढे प्रस्ताव

इराण आणि अमेरिकेतील तणाव नष्ट करण्यासाठी चर्चा चालू असताना अचानक अमेरिकेने इराणवर हल्ला करून इराणच्या राष्ट्रप्रमुखाला मारले होते. इराणने त्याचा बदला घेऊन अमेरिकेवर असंख्य बॉम्ब वर्षाव केले आहेत. सध्या अमेरिकेने पाच दिवसांसाठी सीझ फायर केले आहे; पण इराणने अमेरिकेने दिलेला प्रस्ताव धुडकावला आहे. उलट त्यांनी हल्ला करून अमेरिकेला आपला प्रस्ताव दिला आहे. आपले युद्धात झालेले नुकसान अमेरिकेने भरून द्यावे आणि हार्मुझ समुद्रधुनीतील आपले सार्वभौमत्व अमेरिकेने मान्य करावे असा प्रस्ताव इराणने दिला आहे. आता युद्ध केव्हा बंद करायचे हे आम्ही ठरवू. युद्ध तुम्ही सुरू केले आहे, तुम्हीच बंद करू शकत नाही. अशी इराणने अमेरिकेला धमकीच दिली आहे.

इस्रायल इराण युद्ध सुरूच

अमेरिकेने पाच दिवसांसाठी युद्धविराम केला असला तरी इसराय आणि इराण यांच्यात युद्ध चालूच आहे. दोन्हीकडून शस्त्रास्त्र हल्ला होत आहेत.

Leave a comment