Ajit Pawar case latest update-अजित पवार अपघाताची कर्नाटकात झिरो एफआयआर: महाराष्ट्र सरकारला घाम फुटला

अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी त्यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुंबई, बारामती या ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यासाठी जंग जंग पछाडले; पण त्यांचा एफआयआर नोंदवून घेतला नाही. हे करण्यामागे कुणाचा दबाव होता, हे महाराष्ट्रातील जनता चांगलीच ओळखून आहे.अखेर रोहित पवार यांनी राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांची भेट घेतली.राहुल गांधी, संजय सिंग, अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय त्यांनी कर्नाटकात झिरो एफ आय आर दाखल केला. अर्थात हा झिरो एफ आय आर दाखल झाल्यामुळे हा एफ आय आर कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केला आहे. या एफ आय आर ची चौकशी करणे महाराष्ट्राला भागच आहे.जर महाराष्ट्र सरकारने चौकशीत टाळाटाळ केली, काय चौकशी केली? काय चौकशीत मुद्दे मांडले? कोणकोणत्या बाबी तपासल्या?या सर्व बाबी या एफ आय आर चौकशीमध्ये नोंदणी करावी लागेल त्यामुळेच महाराष्ट्र सरकारला आता धाम फुटला आहे. आज त्यांचे सरकार आहे. उद्या सरकार बदलेल तेव्हा ही फाईल ओपन होईल आणि चुकीच्या पद्धतीने जर चौकशी केली असेल तर त्याची पुन्हा चौकशी होईल म्हणूनच महाराष्ट्र सरकारचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र सरकारने एफ आय आर दाखल करून घेतला नाही, पण कर्नाटक सरकारने एफ आय आर दाखल करून घेतला. त्यामुळे जनतेच्या मनात आणखीनच संशय बळावत आहे. कुठेतरी पाणी मुरते आहे अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला येत आहे.

अजित पवार अपघाताची कसून चौकशी केली जाईल: फडणवीस

कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारकडे अजित पवार अपघाताची एफ आय आर ची फाईल वर्ग केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार अपघाताची कसून चौकशी केली असेल आणि जो कोणी दोषी आहे त्याला सोडणार नाही,अशी दर्पोक्ती केली आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांनी असे कडक शब्दात बोलायला हवे होते; पण त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे सारे वातावरण संशयास्पद निर्माण झाले आहे.

Leave a comment