Donald Trump protest America-अमेरिकेत ट्रम्प विरोधात 80 लाख लोक रस्त्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला शांतीदूत म्हणवून घेत आहेत; पण खरे तर त्यांनीच इराण- इस्रायल-अमेरिका, आखाती देशात आणि युरोपात अशांतता पसरवली आहे.त्यांचे परराष्ट्रीय धोरण हेकेखोरपणा आणि एकहाती सत्ता वापरण्याचे तंत्र यांच्यामुळे अमेरिकेचे भविष्य धोक्यात येत आहे.खरे तर या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. म्हणूनच अमेरिकेतील 80 लाख नागरिकांनी रस्त्यावर येऊन ट्रम्प यांच्या विरोधात मोर्चा काढला. अमेरिका युरोपमध्ये सुमारे 3300 ठिकाणी निदर्शने झाली. इराण युद्ध आणि महागाईच्या मुद्द्यावरून ट्रम्पला पदावरून हटवण्याची मागणी वाढत आहे.

अमेरिकेत नो किंग्जची घोषणा Declaration of No Kings in America

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या भूमिकेचा फटका अमेरिकेतील जनतेला बसत आहे. त्यामुळे 80 लाख लोकांनी मोर्चा काढून नो किंग्स ची घोषणा देत आपला निषेध नोंदवला. अमेरिकेची जनता जागृत आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प सारख्या विकृत माणसाला राष्ट्राध्यक्षपदी बसवले ही मोठी चूक आहे हे आता त्यांना उमगले आहे. म्हणूनच त्यांनी मोर्चा काढून निदर्शने केली. हा मोर्चा एक दिवसाचा नसून अमेरिकेतील जनता पुन्हा पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोर्चे, आंदोलने काढून त्यांना खुर्चीवरून हटवण्यासाठी प्रयत्न करतील. आणि अमेरिकेची एका राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या हुकूमशहा पासून सुटका करून घेतील अशी आशा आहे.

Leave a comment