petrol diesel excise duty cut India-पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपये कपात: दरवाढ तूर्त टळली

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आखाती देशात चाललेल्या युद्धाचा परिणाम सर्वात जास्त तेलावर होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात गुरुवारी प्रति लिटर दहा रुपयांची कपात केली. या निर्णयामुळे इंधनाच्या किरकोळ विक्री दरातील संभाव्य वाढ टळली असून सर्वसामान्यांसाठी पंपावरील किमती स्थिर राहिल्या आहेत. आखाती देशात हे युद्ध असे चालू राहिले तर भविष्यात पेट्रोलचा तुटवडा येण्याची शक्यता आहे; पण तू तुर्त संपूर्ण भारतात पेट्रोल उपलब्ध आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण हे इराणशी अत्यंत चांगल्या पद्धतीने होते;पण नरेंद्र मोदी सरकारच्या काळात इस्रायल आणि अमेरिकेशी असलेली भारताची मैत्री आता तेलाच्या किमतीने चुकवावी लागत आहे. भारताची अनेक जहाजे होर्मुझच्या खाडीत अडकलेली आहेत. इराण गरजेपुरतेच भारताला मदत करत आहे. प्रत्येक वेळी दोन ते तीन जहाजे सोडत आहे .भारत इराण संबंध पूर्वीप्रमाणेच असते तर तेलाचा भारताला कधीही तुटवडा आला नसता. आजही नाही आणि भविष्यातही नाही अशी स्थिती झाली असती. आखाती देशातील युद्ध लवकरात लवकर थांबो आणि जगातील सर्वच देशांची या महागाईतून सुटका होवो हीच अपेक्षा आहे.

Leave a comment