Gulf war latest updates 2026-युद्ध थांबता थांबेना: आखाती देशात युद्धाचा ओणवा कायम

28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका, इराण,इस्रायल यांच्यात चालू झालेले युद्ध आजही तितक्याच तीव्रतेने चालू आहे. अमेरिकेचा असा समज होता, की हे युद्ध जास्तीत जास्त एक आठवडाभर चालेल आणि अशाच स्टाईलने अमेरिकेने इराणवर पहिल्याच दिवशी हल्ला करून इराणचे राष्ट्राध्यक्ष खामनेई यांची हत्या केली होती. त्यामुळे युद्ध लवकरच थांबेल आणि सर्वांची यातून सुटका होईल असे वाटत होते. पण एक महिन्याहून अधिक काळ होऊनही युद्ध थांबण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक वेळी आपल्या सोयीनुसार वक्तव्य केली आहेत. एकदा तर त्यांनी या युद्धातून माघार घेण्याची ही घोषणा केली होती;पण इराण आता गप्प बसणार नाही. इराणला अमेरिकेने डिवचले आहे. त्यामुळे इराणची अशी मागणी आहे की आमचे झालेले नुकसान भरून दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी गोची झाली आहे. इकडे इस्रायलचेही भरमसाठ नुकसान झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू या दोन व्यक्तीमुळे संपूर्ण जगाचे नुकसान होत आहे. अशा व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर बसतात हीच गोष्ट मुळे दुर्दैवाची आहे.

मध्यस्थीविना लांबलेले युद्ध

अमेरिकेतील जनतेमध्ये युद्ध लादल्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे अमेरिकेला हे युद्ध नकोच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचीही तशीच इच्छा आहे;पण तशी इच्छा ते बोलून दाखवू शकत नाहीत. कारण त्यांनी स्वतःहून हे युद्ध ओढवून घेतलेले आहे. इकडे इराणच्या बाबतीतही तेच आहे. इराणला सुद्धा युद्ध नको आहे. इराण स्वतःहून कधीही दुसऱ्या राष्ट्रावर हल्ला करत नाही.असा इराणचा इतिहास आहे. असे असले तरी अमेरिका आणि इस्रायलने आपल्यावर हल्ले केल्यामुळे इराणला नाही लाइलाजाने प्रति हल्ले करावे लागत आहे.हे जरी खरे असले तरी इराणलाही हे युद्ध थांबावे असे वाटते; पण थांबण्यासाठी योग्य वाटाघाटी होणे आवश्यक आहे. इस्राइल हा आडमुठी देश आहे. तेथील नेतृत्वच मुळी अडमुठे असल्यामुळे त्यांच्याकडून युद्ध थांबण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. नुकसानीची परवा न करता त्यांची युद्धखोरी वृत्ती त्यांना एक दिवस जमिनीत गाढणार आहे. सध्या अमेरिकेचीही गोची झाली आहे की पाकिस्तान सारख्या क्षुल्लक देशाला मध्यस्थी करण्यास सांगितले आहे आणि पाकिस्तानकडून मध्यस्थी होऊनही युद्ध थांबेल असे वाटत नाही. हे युद्ध आणखी किती दिवस लांबेल, याचा कुणालाही अंदाज नाही. अशा अवस्थेत हे युद्ध पोचलेले आहे. अनेक युरोपियन राष्ट्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही या शब्दात भाग घेणार नाही. अनेक छोटी राष्ट्रेही त्याच विचाराची आहेत. भारत यापूर्वी अनेक युद्धांच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावत होता; पण आता भारत एकाकी पडला आहे. भारताचे कमकुवत नेतृत्व आणि कमकुवत परराष्ट्र धोरण यामुळे भारताला या युद्धातून आणि युद्धाच्या जवळजवळ वगळल्यासारखे वाटत आहे;ही पण बाब दुर्दैवाचे आहे.

Leave a comment