महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri

भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे..

महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration)

आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why we celebrate Mahashivratri?)

महाशिवरात्री तारखेनुसार साजरी केली जात नाही. तिथीनुसार केली जाते. महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरी केली जाते. म्हणजेच महाशिवरात्री भारतीय सौरवर्षा प्रमाणे दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला येते. ग्रेगेरियन वर्षाप्रमाणे महाशिवरात्री फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडयात किंवा मार्च महिन्यात येते.

शिवाचा कार्यकाल हा इ.स. पूर्व 10,000 वर्षापूर्वीचा मानला जातो. रामायण काळात शिवाची उपासना केली जात होती.महापराक्रमी राजा रावण हा शिवभक्त होता. याचा अर्थ रामायण पूर्व काळात शिव-पार्वती यांचा जन्म झालेला आहे. महाभारत काळात ही शिवाची उपासना केली जात होती.बळीवंशातील अनेक राजे शिव-पार्वतीचे उपासक होते. या सर्व घटनांवरून शिव-पार्वतीचे भारतीय समाजात किती स्थान आहे हे लक्षात येते.

शिवाचा जन्म आणि वंश:(Birth and Descent of Shiva)

शिवाची आई कोण?(Who is mother of lord Shiva?)  शिवाचे वडील कोण?(Who is father of lord Shiva हे निश्चित सांगता येत नाही.अवतार ही संकल्पना भ्रामक असून शिव कुणाचाही अवतार नाही. तसेच शिवाचाही कोणीही अवतार नाही.शिवाचा जन्म हिमालयात तिबेटियन प्रदेशात झालेला आहे, असे मानले जाते. कैलासपर्वत हे शिवाचे निवासस्थान आहे. असे असले तरी शिवाने भारत पर्यटन केले आहे. शिवाची संपूर्ण भारतात, नेपाळमध्ये’, बांग्लादेशात, अफगाणिस्थानात मंदिरे आहेत, शिवाच्या गळ्यातील प्रतीकावरून म्हणजेच नागावरुन शिव हा नाग कुळातील असावा. नागासंस्कृतीतील लोक शिवाचे उपासक आहेत. शिवाच्या उपासकांना शैव म्हणतात.आजही भारतात शैवपंथीय लोक  आहेत.

शिव हा स्वतंत्र विचाराचा होता. आर्य संस्कृतीने निर्माण केलेल्या अनेक चालीरीतीविरुद्‌ध शिवाने संघर्ष केला. कारण था चालीरीती अनिष्ट होत्या. शिवाचे दक्षिणेत आगमन झाल्यावर त्याला अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा दिसल्या. त्याविरुद्‌ध त्याने संघर्ष करून नवीन भारतीय संस्कृतीची पुनर्स्थापना केली.शिवाचे वय किती?(Age of lord) Shiva …याचा कुठेही उल्लेख आढळत नाही

शिव-पार्वती विवाह:(Shiva-Parvati Marriage)

 

पार्वती हीच सती असून सती हे तिचे मूळ नाव आहे.शिवाबरोबर सतीचा विवाह झाल्यावर तिचे वास्तव्य पर्वतात होऊ लागले. यावरून तिला पार्वती हे नाव प्राप्त झाले.

दक्ष राजाची सर्वगुण संपन्न आणि सुंदर अशी कन्या म्हणजे सती होय. दक्ष राजाला प्रजापती दक्ष असे म्हटले जात असे. दक्ष हा मनु संस्कृतीतील होता; तर शिव हा नागा संस्कृतीतील होता, दोन भिन्न संस्कृतीतील या युवक आणि युवतीचा विवाह जगन्मान्य झाला असला तरी दक्षाला हा विवाह मान्य नव्हता. शिव हा रानटी आहे आणि माझी मुलगी मी त्याला देणार नाही, असा दक्षाचा निश्चय होता; पण पार्वतीच्या प्रेमापुढे दक्षाचा निश्चय कोलमोडून पडला.

प्राचीन काळात भिन्न संस्कृतीत विवाह होत होते. याचे प्रतीक म्हणजे शिव-पार्वती विवाह होय.दक्षाने शिव-पार्वतीः विवाहाला मनापासून कधीच संमती दिली नसली, तर समाजाने या विवाहाचे आनंदाने स्वागत केले.

शिवाचे वादयः(Shiva Vadya)

डमरू हे शिवाचे आवडते वाद्य असले तरी शंख वाजवण्याची कला शिवाला अवगत होती. शंख या नावावरून शंकर हे नाव प्राप्त झाले.

शिवाचे तांडव नृत्य:(Tandav Dance of Lord Shiva)

 

तांडवनृत्य हे शिवाचे आवडते नृत्य होते. शिव स्वतः तांडवनृत्य करायचा. आजही हे तांडवनृत्य लोकप्रिय आहे. शिवाला जेव्हा एखा‌द्या गोष्टीचा राग येत होता, तेव्हा तो राग शमवण्यासाठी शिव तांडव नृत्य करायचा. आनंदाच्या क्षणी सु‌द्धा शिव तांडव नृत्य करून आपला आनंद व्यक्त करायचा. आजही नटराज अवस्थेतील शिवाच्या मूर्ती अनेक मंदिरात पाहायला मिळतात. नटराज’ हे संगीत, कलेचे प्रतीक मानले जाते.

समुद्रमंथन आणि महाशिवरात्री – एक आख्यायिका(Samudramanthan and mahashivratri legend story)

 

प्राचीने काळी देव (ब्राह्मण) आणि राक्षस (रक्षक- रक्षणकरणारे यांनी समुद्रमंथनाचा करार केला. चा समुद्र मंथनातून अमृत, ऐरावत हत्ती, लक्ष्मी, धन्वंतरी, कामधेनू गाव, , उच्चैःश्रवा अव, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, रंभा आसरा, वारुणी (मध्य), चंद्र, पांचजन्य शंख, पारिजात, शारंग धनुष्य, अमृत, हलाहल विष इत्यादी रत्ने प्राप्त झाली. पण या रत्नांची वाटणी पक्षपातीपणे झाली. अमृत देवाने पळवले. उच्चै:श्रवा घोडा बळीराजाला मिळाला.बळी राजाच्या मृत्यूच्या पश्चात तो घोडा इंद्राने पळवला.ऐरावत नावाचा पांढरा हत्ती इंद्राने पटकावला. कौस्तुभ मणी विष्णूने पळवला. कल्पवृक्ष इंद्राने मिळवले. अप्सरा इंद्राच्या दरबारात नर्तिकांन्चे काम करू लागल्या. वारुणी म्हणजे म‌द्य दानवांना दिले. शंख विष्णूकडे राहिला. पारिजात इंद्राकडे राहिले. शारंग धनुष्य विष्णूकडे,तर हलाहल नावाचे विष कोणीच घेईना. शेवटी हे विष विष शिवाने प्राशन केले. त्यामुळे शिवाचा कंठ निळा झाला. त्यामुळेच त्याला नीलकंठ म्हटले जाते.

समुद्रमंथन ही दंतकथा असली तरी या मंथनातून बाहेर पडणारी रत्ने वाटून घेतांना देवांनी किती पक्षपातीपणा केला हे लक्षात येते. शिवाने हलाहल विष प्राशन करून सर्व वाईट गोष्टी पचवण्याची ताकद शिवाकडे होती,आंतरिक शक्ती होती हे त्याने सि‌द्ध केले.

विष्णुपुराणात सांगितलेल्या या दंतकथेतही शिवच श्रेष्ठ ठरतो. विष प्यायल्याने तर शिवाला आराम मिळावा म्हणून जागरण केले तो दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय
असेही मानले जाते .

शंकराचे शस्र:(Weapon of Lord Shiva)

त्रिशुल हे शंकराचे आवडते शरत्र होते. जगाच्या कल्याणासाठी आणि संपूर्ण भारतभूमीवर समता प्रस्थापित करण्यासाठी शंकराला शस्त्र हातात घ्यावे लागले. त्रिशूल चालवण्यात शंकर वाकबगार होता.

 

शंकराचे वाहन:

शंकराचे वाहन नंदी होते. नंदी म्हणजे बैल. प्रत्यक्षात मात्र नंदी हा शंकराचा आवडता शिष्य होता. तो शंकराची आज्ञा जशीच्या तशी पाळणारा भक्त होता. म्हणूनच आजही समाजात हो ला हो मानणाऱ्या माणसाला ‘नंदीबैल म्हणतात.

शंकराचे पुत्र:(Sons of Lord Shiva)

कार्तिकेय हा शंकराला पार्वतीपासून झालेला पुत्र आहे. तो खूप पराक्रमी होता, कार्तिकेयने संपूर्ण पृथ्वी प्रद‌क्षिणा घातली होती.

गणपती (Shri Ganesh)

 

गणपती बद्‌धल अनेक आख्यायिका आहेत. गणपती हा पार्वतीच्या अंगावरच्या मळीपासून बनला आहे , अशीही आख्यायिका (दंतकथा) आहे; पण ते न पटण्यासारखे आहे. गणपतीचे नाक खूप लांब होते. कान मोठे होते.पोट मोठे होते. गणपतीचे तोंड हत्तीच्या तोंडासारखे दिसायचे .म्हणून त्याला गजानन म्हणायचे. एकदा पार्वती अंघोळीला गेली असता गणपतीला रक्षक म्हणून प्रवेशद्वारावर उभे केले होते. गणपतीले कुणालाच प्रवेश दिला नाही. शेवटी शिव आला. त्यालाही गणपतीने अडवले. शिव आणि गणपती यांच्यात घनघोर यु‌द्ध झाले. त्यात शिवाने गणपतीचे मुंडके उडवले. ही गोष्ट पार्वतीला समजल्यावर तिने आक्रोश केला. शेवटी शिवाने गजाचे (हत्तीचे) मुंडके कापून आणून ते गणपतीला लावले व त्याला जिवंत केले. ही गोष्ट म्हणजे एक आढयाधिका असून ती कुणालाच न पटण्यासारखी आहे.

गणपती हा पार्वतीला पूर्वपतीपासून झालेला मुलगा आहे. असे प्राचीन इतिहासावर संशोधन करून लेखन करणारे आधुनिक काळातील लेखक आमिष जांचे म्हणणे आहे. तसा त्यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. पार्वतीला आणि तिच्या पूर्वपतीला दीर्घायुष्ण वाढवणारे औषध दिले जायचे. त्याचा side effect मणून गणपतीचा देह इतरांपेक्षा वेगळा झाला. शिवाने गणपतीला जसा आहे तसा स्वीकारले. त्याला आपलाच पुत्र मानले आणि सन्मानाने आपल्या मांडीवर बसण्याचा हक्क दिला (आमिष)

शिवमंदिरे:(Temples of Lord Shiva)

शिवमंदिरे केवळ भारतातच नाहीत; तर अन्य देशातही आहेत. भारतात सर्वांत जास्त मंदिरे शिवाची आहेत. यावरून शिवाचे कर्तृत्व स्पष्ट होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्त होते. महाराज युद्धात नेहमी “हर हर महादेव” ची ललकारी देऊन युद्‌धाला प्रारंभ करत. शिवशंकराच्या समतावादी विचाराने शिवाजी महाराज प्रभावित झाले होते. शिवशंकराचा हा विचार पुढे चालवण्यासाठी शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले. महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर शिव मंदिर पाहायला मिळते.

शिवशंकराची स्वयंभू रुपातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरे भारतात प्रसि‌द्ध आहेत. ती पुढील प्रमाणे—-

 

1) सोमनाथ – काठियावाड, गुजरात.

2) श्री शैल मल्लिकार्जुन – कृष्णा नदीच्या काठी, चेन्नईजवळ,तामिळनाडू.

3) महाकालेश्वर – उज्जैन , मध्य प्रदेश

4) ओम्‌कारेश्वर – नर्मदा नदीच्या काठी, गुजरात. 5) नागेश्वर द्वारकाधाम जवळ, मध्य प्रदेश.

6.) वैजनाथ- झारखंड

7) भीमाशंकर – स्वराष्ट्र पुण्याजवळ, महाराष्ट्र

8) त्र्यंबकेश्वर – नाशिक, महाराष्ट्र.

9) घृष्णेश्वर – वेरुळ, महाराष्ट्र

10) केदारनाथ- हिमालय, उत्तराखंड

11. काशी विश्वनाथ – बनारस, उत्तर प्रदेश

12) रामेश्वरम ज्योतिर्लिंग – रामेश्वरम, तामिळनाडू.

शिवाची विविध नावे.(Different Names Of Lord Shiva)

शिव, शंकर, भोला नाथ (नावाप्रमाणे), रुद्र (जो अधूनमधून भयानक रूप धारण करतो, सांब, पार्वती, अत्री, अंबरीश हर-हर महादेव, रुद्र, शिव, अंगीरागुरु, अंतक, अंडधर, अंबरीश, अकंप, अक्षतवीर्य, अक्षमाली, अघोर, अचलेश्वर, अजातारि, अज्ञेय, अतीन्द्रिय, अत्रि, अनघ, अनिरुद्ध, अनेकलोचन, अपानिधि, अभिराम, अभीरु, अभदन, अमृतेश्वर, अमोघ, अरिदम, अरिष्टनेमि, अर्धेश्वर, अर्धनारीश्वर, अर्हत, अष्टमूर्ति, अस्थिमाली, आत्रेय, आशुतोष, इंदुभूषण.

पार्वतीची विविध नावे:(Different Names Of Sati Parvati)

सती , पार्वती, माहेश्वरी, उमा, अपर्णा’, गिरिजा, ललिता, दुर्गा, चामुंडा, अंबिका, अंबा, भवानी, काली, चंडी, कात्यायनी

शिव आणि पार्वती हे दोन्ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग आहेत. त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून तर दर वर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Leave a comment