1. जगन्नाथ शंकरशेठ:(Nana Shankar Sheth)
• पूर्ण नाव : जगन्नाथ शंकरशेठ(नाना शंकर शेठ )मुरुकटे
जन्म (Birth) : 10 फेब्रुवारी 1803. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव.
मृत्यू (Death) : 31 जुलै 1865.
काम : (Social Work)
इ. स. 1823 मध्ये ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना. या संस्थेद्वारे अनेक शाळा उघडल्या.
1840 ते 1856 पर्यंत ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन'(Board of Education)चे सदस्य.
एलफिन्स्टन कॉलेज व ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू.
इ. स. 1846 मध्ये मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनवर नियुक्ती.
इ स 1852 मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने ‘बॉम्बे असोसिएशन'(Bombay Association) ची स्थापना केली.
इ स 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून नियुक्ती.
पुरस्कार : ‘जस्टीस ऑफ द पीस’ (1835)
विशेषता : आधुनिक मुंबईचे निर्माते, मुंबईचे शिल्पकार.
2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर :(Aacharya Balshastri Jambhekar)
• पूर्ण नाव : बाळ गंगाधर जांभेकर
• जन्म(Birth): 1810
मृत्यू (Death): 17 मे 1846
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य:(Social Work)
इ स 1930 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी. दोन वर्षांनी ‘नेटिव्ह सेक्रेटरी.’
इ स 1832 साली ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र चालू केले.
इ स 1840 साली ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक चालू केले.
• अभ्यासक्रमातील पहिली पाठ्यपुस्तके लिहिण्याचा मान त्यांना मिळाला.
3. दादोबा पांडुरंग :(Dadoba Pandurang)
• पूर्ण नाव : दादोबा पांडुरंग तर्खडकर
जन्म (Birth): 9 मे 1814 (मुंबई)
मृत्यू (Death): 17 ऑक्टोबर 1882
दादोबा पांडुरंग यांचे कार्य:(Social Work)
इ. स. 1844 मध्ये सुरत येथे ‘मानवधर्म सभा’ संस्थेची स्थापना.
मानवधर्म सभेच्या प्रचारासाठी धर्म विवेचन ग्रंथाचे लेखन.
‘ज्ञानप्रसारक सभा’ 1848 मध्ये स्थापन झाली.या सभेचे ते पहिले अध्यक्ष होते.
इ स 1848 साली ‘परमहंस सभा’ स्थापना. या सभेच्या मार्गदर्शनासाठी ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’ हा काव्य ग्रंथ लिहिला.
इ स 1857 साली सरकारकडून ‘रावबहादूर’ किताब प्रदान.
• मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध. त्यांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ असे संबोधले जायचे.
4. गोपाळ हरी देशमुख :(Gopal Hari Deshmukh)
• पूर्ण नाव : गोपाळ हरी देशमुख मूळ आडनाव – सिद्धये
जन्म (Birth): 18 फेब्रुवारी 1823
मृत्यू (Death) : 9 ऑक्टोबर 1892
गोपाळ हरी देशमुख यांचे कार्य:(Social Work)
इ स 1848 मध्ये ‘प्रभाकर’ हे साप्ताहिक सुरू केले. या वृत्तपत्रातून
‘लोकहितवादी’ नावाने देशबांधवांना शंभर पत्रे लिहिली. तीच पत्रे ‘शतपत्रे’ नावाने प्रसिद्ध.
१८८२ साली ‘लोकहितवादी’ नावाने मासिक सुरू. याच नावाने त्रैमासिक सुरू.
ग्रंथसंपदा :
• लक्ष्मीज्ञान, पानिपत, ग्रामरचना, शतपत्रे, पृथ्वीराज चव्हाण.
पुरस्कार :
• ‘जस्टीस ऑफ पीस’ आणि ‘रावबहादूर’ हे किताब सरकारने दिले.
5. डॉ. भाऊ दाजी लाड :(Dr. Bhau Daji Lad)
• पूर्ण नाव : रामचंद्र विठ्ठल लाड. जन्मस्थळ : मांजरी
जन्म (Birth): 1824
मृत्यू (Death) : 31मे 1874
डॉ.भाऊ दाजी लाड यांचे कार्य:(Social Work)
इ स 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव.
इ स 1859 मध्ये ‘लायसेन्स बिल’च्या विरोधात भाषणे.
इ स 1966 मध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ च्या मुंबई शाखेत सदस्य.
• स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग.
6. विष्णुबुवा ब्रह्मचारी:(Vishnubua Brahmachari)
• पूर्ण नाव : विष्णू भिकाजी गोखले.
जन्मस्थळ : शिरवली (जि. रायगड)
जन्म (Birth): 20 जुलै 1825
मृत्यू (Death):18 फेब्रुवारी 1871
.विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचेकार्य:(Social Work)
• वैदिक धर्माचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने.
• पुनर्विवाह, घटस्फोट, प्रौढविवाह इ. प्रश्नांसाठी पुरोगामी विचार मांडले.
ग्रंथसंपदा:
भावार्थ सिंधू,वेदोक्त प्रकाश ,बोधसागराचे रहस्य.
विशेषत:
ब्रह्मचारी बुवा या नावाने प्रसिद्ध.
7. विष्णुशास्त्री पंडित :(Vishnushastri Pandit)
जन्म (Birth): 1827
मृत्यू (Death) : 1876
• पूर्ण नाव: विष्णुशास्त्री परशरामशास्त्री पंडित. जन्मस्थळ : सातारा
विष्णुशास्त्री पंडित यांचे कार्य:(Social Work)
1864 मध्ये मुंबईच्या ‘इंदूप्रकाश’ साप्ताहिकाचे उपसंपादक.
1865 मध्ये ‘पुनर्विवाहोत्तेजक मंडळ’ स्थापन.
1869 साली विधवा पुनर्विवाह घडवून आणला.
1874 साली पत्नीचे निधन. कुसाबाई या विधवेशी विवाह.
विष्णुशास्त्री पंडित यांचे ग्रंथ:
• नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर, हिंदुस्थानचा इतिहास भाग -3, इंग्रजी-मराठी कोश, विधवा विवाह.
8. महात्मा जोतिबा फुले :(Mahatma Jotiba Phule)
• पूर्ण नाव : जोतिबा गोविंदराव फुले.
जन्मस्थळ : पुणे
जन्म (Birth): 11 एप्रिल 1827
मृत्यू (Death) : 28 नोव्हेंबर 1890
महात्मा फुले यांचे कार्य:(Social Work)
सावित्रीबाई फुले हिच्याशी विवाह. सावित्रीबाईंना सुशिक्षित केले.
मराठी सत्तेचा उदय
शिक्षिका म्हणून काम करण्यास सावित्रीबाई फुले यांना प्रवृत्त केले.
इ स 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
इ स 1851 साली पुण्यातच मुलींची दुसरी शाळा काढली.
इ स 1852 साली अस्पृश्य मुलांसाठी दोन शाळा काढल्या.
इ स 1855 साली प्रौढांसाठी रात्रीची शाळा काढली.
इ स 1863 साली ‘बालहत्या प्रतिबंधक गृहां’ची स्थापना.
काशीबाई या विधवेच्या ‘यशवंत’ या मुलाला दत्तक घेतले.
ग्रंथसंपदा :
• सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसम, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत.
• महाराष्ट्राचा ‘मार्टिन ल्यूथर किंग’ असे संबोधले जाते.
9. सावित्रीबाई फुले :(Savitribai Phule)
• पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतिराव फुले
• जन्म (Birth): 3 जानेवारी 1831
मृत्यू (Death) : 10 मार्च 1897
सावित्रीबाई फुले यांचे कार्य (Social Work)
• भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून कार्य.
• ‘बालहत्या प्रतिबंधक गृहात’ कार्य.
• अनाथालयातील ‘यशवंत’ मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेतले.
• त्यांचा जन्मदिन ‘बालिका दिन’, ‘स्त्री मुक्ती दिन’ म्हणून पाळला जातो.
10. बाबा पद्मनजी:(Baba Padmanji)
• पूर्ण नाव : बाबा पद्मनजी सुरतकर जन्मस्थळ : बेळगाव
• जन्म (Birth): 1831
मृत्यू (Death): 1906
बाबा पद्मनजी यांचे कार्य:(Social Work)
• ख्रिश्चन धर्माचा स्वीकार व प्रसार
इ स 1857 साली ‘यमुना पर्यटन’ ही पहिली सामाजिक कादंबरी लिहिली.
• ग्रंथसंपदा : यमुना पर्यटन.(Yamuna Tourism)
11. न्यायमूर्ती रानडे :(Nyaymurti Ranade)
• पूर्ण नाव : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
• जन्म (Birth) : 18 जानेवारी 1842
मृत्यू (Death) : 16 जानेवारी 1901
जन्म : निफाड (जि. नाशिक).
न्यायमूर्ती रानडे यांचेकार्य:(Social Work)
• ‘इंदूप्रकाश’ या इंग्रजी वृत्तपत्रातून सुधारणात्मक लेखन.
इ स 1870 साली सार्वजनिक काकांबरोबर सार्वजनिक सभेची स्थापना.
इ स 1893 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
• नामदार गोखल्यांचे गुरू म्हणून प्रसिद्ध.
• ग्रंथसंपदा : मराठी सत्तेचा उदय
12. गोपाळ गणेश आगरकर:(Gopal Ganesh Agarkar)
• पूर्ण नाव : गोपाळ गणेश आगरकर, जन्मस्थान : टेभु (जि. सातारा)
जन्म (Birth) : 14 जुलै 1856
मृत्यू (Death): 17 जून 1895
आगरकर यांचे कार्ये:(Social Work)
लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याबरोबर 1880 सत्र ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
इ स 1881साली ‘केसरी’चे पहिले संपादक म्हणून कार्य.
इ स 1884 साली टिळक-आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
इ स 1888 ‘सुधारक’ हे स्वतंत्र वृत्तपत्र काढले.
पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते.
• ग्रंथसंपदा : विकारविलसित (शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चे भाषांतर).
13. महर्षी धोंडो केशव कर्वे :(Maharshi Dhondo Keshav Karve)
पूर्ण नाव : धोंडो केशव कर्वे जन्मस्थान : शेरवली (जि. रत्नागिरी)
जन्म (Birth): 18 एप्रिल 1858
मृत्यू (Death) : 9 नोव्हेंबर 1962
कर्वे यांचे कार्य:(Social Work)
इ स 1893 ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ची स्थापना.
इ स 1896 मध्ये ‘अनाथ बालिकाश्रम’ची स्थापना.
इ स 1907 मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना.
इ स 1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ’ची स्थापना.
1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना.
● पुरस्कार: पद्मविभूषण (Padma Vibhushan)(1955), भारतरत्न(Bharat Ratna) (1958), डी.लिट. (पुणे विद्यापीठ).
• हिंगण्याला कर्वेनगर असे नाव.
14. पंडिता रमाबाई:(Pandita Ramabai)
• पूर्ण नाव: रमाबाई बिपिनबिहारी दास
• जन्मस्थान: गंगामूल (कर्नाटक).
जन्म (Birth): 23 एप्रिल 1858
मृत्यू (Death) : 5 एप्रिल 1922
पंडिता रमाबाईयांचे कार्य:(Social Work)
पुणे येथे ‘आर्य महिला समाज’ स्थापना.
• निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांसाठी 1889 मध्ये मुंबई येथे ‘शारदा
घराची स्थापना केली.
• ‘मुक्तिसदन’ ची स्थापना
• ग्रंथसंपदा : ‘बायबल’चे मराठीत भाषांतर.
15. सयाजीराव गायकवाड :(Sayajirao Gayakwad)
• पूर्ण नाव : गोपाळ काशिनाथ गायकवाड
• जन्मस्थान : कवळाणे (जि. नाशिक)
जन्म (Birth): 17 मार्च 1863
मृत्यू (Death) : 6 फेब्रुवारी 1939
सयाजीराव गायकवाड यांचे कार्य:(Social Work)
• बडोद्याच्या संस्थानास दत्तक. दत्तक नाव- सयाजीराव गायकवाड.
• प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे भारतातील पहिले राज्य.
• अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे, वाचनालये काढली.
विधवा विवाह, मिश्र विवाह, अस्पृश्यता बंदी, बालविवाह बंदी इत्यादी कायदे करून घेतले.
इ स 1904 साली ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’ चे अध्यक्ष.
• पंडित मदन मोहन मालवीय यांनी ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ असा गौरव केला.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणास चालना.
16. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे :(Maharshi Vitthal Ramaji Shinde)
• पूर्ण नाव : विठ्ठल रामजी शिंदे
जन्मस्थान : जमखंडी (कर्नाटक)
जन्म (Birth): 23 एप्रिल 1873
मृत्यू (Death) : 2 एप्रिल 1944
महर्षी शिंदे यांचे कार्य: (Social Work)
इ स 1898 प्रार्थना समाजाची दीक्षा.
• अस्पृश्यांसाठी कार्य करण्यासाठी ‘डिस्प्रेस्ड् क्लासेस मिशन’ची स्थापना.
इ स 1910 साली जेजुरी येथे ‘मुरळी प्रतिबंधक’ सभा.
17. राजर्षी शाहू महाराज :(Rajarshi Shahu Maharaj)
• मूळ नाव : यशवंतराव जयसिंगराव घाटगे, कोल्हापूर संस्थानात दत्तक
• जन्म (Birth): 26 जून 1874
मृत्यू (Death): 6 मे 1922
• दत्तक नामकरण : राजर्षी छत्रपती शाहू महाराज
शाहू महाराज यांचेकार्य:(Social Work)
• ग्रामीण भागातील मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना.
इ स 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गासाठी 50% आरक्षणाचा निर्णय.
इ स 1917 साली ‘प्राथमिक शिक्षण मोफत’ची घोषणा.
कोल्हापूर संस्थानातील प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे.
विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहाला मान्यता.
इ स 1920 साली माणगाव येथे अस्पृश्यांसाठी परिषद भरवली.
• विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडून ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ असा गौरव.
• त्यांच्या जन्मदिनी ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा केला जातो.
18.संत गाडगेबाबा :(Sant Gadage Baba)
• पूर्ण नाव : डेबूजी झिंगराजी जाणोरकर
• जन्मगाव : शेणगाव, जि. अमरावती.
• जन्म (Birth): 23 फेब्रुवारी 1876
मृत्यू (Death) : 20 डिसेंबर 1956
संत गाडगेबाबा यांचे कार्य:(Social Work)
• कीर्तनाद्वारे जनजागृती. अज्ञान, अंधश्रद्धेविरुद्ध टीका.
• ‘देवकीनंदन गोपाला’ हे आवडते भजन.
त्यांच्याच कार्यातून स्वच्छतेचा संदेश.
19. सेनापती बापट :(Senapati Bapat)
पूर्ण नाव : पांडुरंग महादेव बापट
जन्म (Birth):12 नोव्हेंबर 1880
मृत्यू (Death): 28 नोव्हेंबर 1967
सेनापती बापट यांचे कार्य:(Social Work)
इंग्रजांविरुद्ध लढा. बॉम्ब बनवण्याचे पुस्तक भारतात पाठवले.
मुळा नदीवरील ‘मुळशी’ येथील धरणाला विरोध. त्या वेळी ‘सेनापती’
पदवी मिळाली.
चले जाव, गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आंदोलन.
• संदर्भग्रंथ: ‘दिव्य जीवन’ ‘चैतन्य गाथा’
20. रघुनाथ धोंडो कर्वे :(Raghunath Dhondo Karve)
• पूर्ण नाव : रघुनाथ धोंडो कर्वे जन्मस्थान : मुरूड
जन्म (Birth): 1882
मृत्यू (Death) : 1953
रघुनाथ कर्वे यांचे कार्य:(Social Work)
• लैंगिक शिक्षण व संततीनियमन याबद्दल स्पष्ट विचार व प्रत्यक्ष कार्य करणारे पहिले भारतीय.
• संतती नियमनासाठी ‘राईट एजन्सी’ हे केंद्र मुंबईत सुरू केले.
1927 साली ‘समाज स्वास्थ्य’ नावाचे मासिक सुरू.
• ग्रंथसंपदा : 1921 साली ‘संततीनियमन’ हे पुस्तक लिहिले.
21. कर्मवीर भाऊराव पाटील :(Karmvir Bhaurao Patil)
• पूर्ण नाव : भाऊराव पायगोंडा पाटील
• जन्मस्थान : कुंभोज (जि. कोल्हापूर.)
जन्म (Birth): 22 सप्टेंबर 1887
मृत्यू (Death) : 9 मे 1951
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य:(Social Work)
इ स 1910 साली ‘दुधगाव विद्याप्रसारक मंडळ’ स्थापन.
• या संस्थेमार्फत ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ सुरू.
इ स 1919 साली ‘रयत शिक्षण संस्थे’ची स्थापना. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालये सुरू.
• ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनक.
• ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य.
• पुरस्कार: पद्मभूषण, डी. लिट.
22. प्रबोधनकार ठाकरे :(Prabodhankar Thakre)
• पूर्ण नाव : केशव सीताराम ठाकरे
जन्म (Birth): 17 सप्टेंबर 1885
मृत्यू (Death) : 20 नोव्हेंबर 1973
• प्रबोधनात्मक व समाजसुधारणात्मक लेखन.
प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्य:(Social Work)
• संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाचे नेते.
• ग्रंथसंपदा : ‘कुमारिकांचे शाप,भिक्षुकशाहीचे बंड
23. डॉ. बाबासाहेब आंबेडकर :(Dr. Babasaheb Ambedkar)
• पूर्ण नाव : भीमराव रामजी आंबेडकर
जन्म (Birth): 14 एप्रिल 1891
मृत्यू (Death): 6 डिसेंबर 1956
• बाबासाहेबआंबेडकर यांचे कार्य:(Social Work)
• दलितांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढले.
. ‘शिकून व संघर्ष करून दलितांनी आपले हक्क मिळवावेत’ अशी त्यांचे शिकवण होती.
• दलितांच्या उन्नतीसाठी ‘बहिष्कृत हितकारिणी’, ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थांची स्थापना,
• ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ इ. वृत्तपत्रे काढली. • या वृत्तपत्रांद्वारे दलितांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला.
• ‘चवदार तळे सत्याग्रह’, ‘काळाराम मंदिर प्रवेश आंदोलना’च्या माध्यमातून दलितांचे संघटन.
• भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.
• पुरस्कार : ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार,
24. ताराबाई मोडक :(Tarabai Modak)
• पूर्ण नाव : ताराबाई मोडक
जन्म (Birth): 1892
मृत्यू (Death) : 1973
ताराबाई मोडक यांचे कार्य:(Social Work)
• भारतातील माँटेसरी पद्धतीच्या बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक.
• ‘शिशुविहार’ या शिक्षण संस्थेची मुंबई येथे स्थापना.
• ‘कोसबाड’ येथे बालशिक्षणावर प्रयोग.
25. भाई माधवराव बागल :(Bhai Madhavrao Bagal)
जन्म (Birth): 1896
मृत्यू (Death): 1981
बागल यांचे कार्य :(Social Work)
• सत्यशोधक समाजाचे नेते.
• कर्मकांड, जातिभेदाविरुद्ध लढा.
• ‘हंटर’, ‘अखंड भारत’ या नियतकालिकांचे संपादक.
26. आचार्य विनोबा भावे:(Acharya Vinoba Bhave)
• पूर्ण नाव : विनायक नरहर भावे जन्मस्थान : गागोद (जि. रायगड)
जन्म (Birth) : 11सप्टेंबर 1895
मृत्यू (Death) : 15 नोव्हेंबर 1982
कार्य: (Social Work)
• महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही.
1924 मध्ये ‘महाराष्ट्र धर्म’ नामक वृत्तपत्र सुरू.
• भूदान चळवळीचे प्रणेते.
• वर्धा जिल्ह्यात ‘पवनार’ येथे परमधाम आश्रम स्थापन.
• ‘सर्वोदय समाज’ स्थापन केला.
• ग्रंथसंपदा : ‘गीताई’, ‘गीता-प्रवचने’, ‘मधुकर’, ‘कुराणसागर’.
• पुरस्कार : मॅगसेसे पुरस्कार (1958), ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार (1983).
27. डॉ. पंजाबराव देशमुख (1898 ते 1965):(Dr. Panjabrao Deshmukh)
• पूर्ण नाव : पंजाबराव शामराव देशमुख
• जन्मस्थान : पापळ (जि. अमरावती)
जन्म (Birth) : 27 डिसेंबर 1898
मृत्यू (Death) : 10 एप्रिल 1965
• पंजाबराव देशमुख यांचे कार्य: (Social Work)
1926 मध्ये अमरावती येथे ‘श्रद्धानंद छात्रालय’ सुरू करून सर्व जातिधर्मांच्या मुलांची सोय केली.
1927 साली ‘शेतकरी संघा’ची स्थापना.
• ‘महाराष्ट्र केसरी’ हे वृत्तपत्र चालवले.
1932 साली अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.
1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना
• ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघा’ची स्थापना.
28. क्रांतिसिंह नाना पाटील (1900 ते 1976):(Krantisinh Nana Patil)
• पूर्ण नाव : नाना रामचंद्र पाटील
जन्म (Birth) : 3 ऑगस्ट 1900
मृत्यू (Death): 6 डिसेंबर 1976
जन्मस्थान : बहे-बोरगाव, जि. सांगली.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य: (Social Work)
1930 सविनय कायदेभंग चळवळीत व 1942 च्या वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग.
1942 च्या ‘लेट्स गो’ आंदोलनादरम्यान ब्रिटिश राजवटीविरुद्ध
सातारा येथे ‘प्रति सरकार’ (पत्री सरकार) स्थापन केले.
प्रति सरकारच्या कार्यामुळेच नानांना ‘क्रांतिसिंह’ म्हणून ओळखले जाऊ लागले
29. कर्मवीर दादासाहेब गायकवाड (१९०२ ते १९७१):(Karmvir Dadasaheb Gayakwad)
पूर्ण नाव : भाऊराव कृष्णराव गायकवाड
जन्मस्थान : नाशिक
जन्म (Birth): 1902
मृत्यू (Death) : १९७१
दादासाहेब गायकवाडयांचे कार्य: (Social Work)
इ स 1927 च्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात व 1930 च्या नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनात सहभाग.
० भूमिहीन शेतमजुरांसाठी सरकारविरुद्ध चळवळ.
• पुरस्कार: पद्मश्री.
30. एस. एम. जोशी (1904 ते 1989):(S.M. Joshi)
• पूर्ण नाव : श्रीधर माधव जोशी जन्मस्थान : जुन्नर (जि. पुणे)
जन्म (Birth): 12 नोव्हेंबर 1904
मृत्यू (Death) : 1 एप्रिल 1989
एस एम जोशी यांचे कार्य: (Social Work)
• ‘एस्. एम.’ या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध.
इ स 1929 मध्ये पर्वतीला अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी सत्याग्रह.
इ स 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग.
1934 च्या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेत सहभाग.
1942 च्या ‘चला जाऊया’ आंदोलनात सहभाग.
• ‘राष्ट्रसेवा दल’ संघटनेची स्थापना.
इ स 1977 च्या आणीबाणीला विरोध.
31. संत तुकडोजी महाराज (Sant Tukdoji Maharaj)
जन्म (Birth): 30 एप्रिल 1909
मृत्यू (Death): 11 ऑक्टोबर 1968
संत तुकडोजी महाराज यांचे कार्य: (Social Work)
भाषण, कीर्तन, भजन माध्यमातून राष्ट्रजागृती. 1935 मध्ये मोझरी येथे ‘गुरुकुंज’ची स्थापना.
1942 च्या ‘चला जाऊया’ आंदोलनात सहभाग.
• ग्रंथसंपदा : ग्रामगीता.
• पुरस्कार : ‘राष्ट्रसंत’ दर्जा.
32. अनुताई वाघ (1990 ते 1992): (Anutai Wagh)
• पूर्ण नाव: अनुताई वाघ जन्मस्थळ : पुणे
जन्म (Birth): 1910
मृत्यू (Death) : 1992
• अनुताई वाघ यांचे कार्य: (Social Work)
• ताराबाई मोडक यांच्यासोबत 1945 ते 1956 या काळात बोर्डी येथे बाल शिक्षा केंद्राचे कार्य.
1956 पासून कोसबाड जि. ठाणे येथे विकासवाडीचा प्रयोग.
1973 साली बाल शिक्षा केंद्राच्या संचालिका बनल्या.
‘शिक्षापत्रिका’ व ‘सावित्री’ मासिकाच्या संपादिका.
• ग्रंथसंपदा : ‘बालवाडी कशी चालवावी?’, ‘कुरणशाळा’
• पुरस्कार: आदर्श शिक्षा (महाराष्ट्र सरकार), दलितमित्र (महाराष्ट्र सरकार), पद्मश्री (भारत सरकार).
33. बाबा आमटे (1914ते 2008) :(Baba Amte)
• पूर्ण नाव : मुरलीधर देवीदास आमटे
जन्म (Birth) : 26 डिसेंबर 1914
मृत्यू (Death) : 9 फेब्रुवारी 2008
• जन्मस्थळ : हिंगणघाट (जि. वर्धा)
• बाबा आमटे यांचे कार्य : (Social Work)
• कुष्ठरोग्यांसाठी कल्याणकारी कार्य.
• महारोगी सेवा समितीची स्थापना. त्याद्वारे खालील प्रकल्प.
आनंदवन – वरोडा, सोमनाथ – मूल (चंद्रपूर),
अशोक वन – नागपूर, हेमलकसा.
नर्मदा बचाव आंदोलनात ‘मेधा पाटकर’ यांना पाठिंबा.
• ग्रंथ संपदा : ‘ज्वाला आणि फुले’, ‘उज्ज्वल उद्यासाठी’
• पुरस्कार: रॅमन मॅगसेसे (1985), पद्मविभूषण (1986), जे.डी. डॉ. बिर्ला पुरस्कार, मानवाधिकार पुरस्कार (1988), महात्मा गांधी शांतता पुरस्कार), महाराष्ट्र भूषण (2003). •
34.अण्णा हजारे (1940) :(Anna Hajare)
• पूर्ण नाव : किसन बाबूराव हजारे
जन्म (Birth): 1940
• काम : (Social Work)
1960 भारतीय सैन्यदलात भरती. चीनच्या युद्धात सहभाग.
1965 च्या पाकिस्तानच्या युद्धात सहभाग.
• राळेगणसिद्धी येथे ‘आदर्श ग्राम’ योजना कार्यान्वित.
० भ्रष्ट्राचाराविरुद्ध आंदोलन.
• ‘माहितीचा अधिकार’ कायदा अंमलबजावणीसाठी आंदोलन.
• ग्रंथसंपदा : ‘माझे गाव-माझे तीर्थ’ (आत्मचरित्र).
• पुरस्कार : कृषिभूषण (महाराष्ट्र शासन), पद्मश्री, पद्मविभूषण (भारत सरकार).