गणेश चतुर्थी आणि उकडीचे मोदक / Ganesh Chaturthi and Ukadiche Modak

उकडीचे मोदक

गौरी गणपती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य असा सण आहे.तिबेटमध्ये जन्मलेल्या शिवशंकराची पार्वतीच्या जीवनात एण्ट्री झाली आणि पार्वती-गणेशाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. प्राचीन भारतातील पार्वती आणि शंकर यांचा पहिला लोकप्रिय आणि लोकमान्य आंतरजातीय विवाह होय. शिवशंकर, गणेश हे अवैदिक संस्कृतीचे होते.म्हणूनच ते अवैदिक(बहुजन) समाजात आजही लोकप्रिय आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवशंकर हेच श्रद्धास्थान होते. म्हणूनच लढाईच्या वेळी, विजयाच्या वेळी किंवा आनंदाच्या वेळी हरहर महादेव ही घोषणा दिली जात असे.

शिवशंकराने खूप मोठा संघर्ष करून भारतातील विविध समाज घटकांना सामावून घेतले आणि मूळ भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे चालू ठेवला.म्हणूनच भारतीय संस्कृतीत गौरी गणपती या सणाला विशेष महत्त्व आहे.

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो.पार्वतीपुत्र गणपतीला मोदक खूप आवडत असत.गणेशाचा जन्म हा पुराण काळात झाला.गणेश हा एका गणाचा पती (राजा) होता.म्हणूनच त्याला गणपती हे नाव पडले.अत्यंत कीर्तिवंत, पराक्रमी, बुद्धिमान, चौदा विद्या आणि चौसष्ठ कला अवगत असलेल्या या गणपतीला प्रथम पूजेचा मान दिला जातो.गणपतीची नावे पाच हजारांहून अधिक आहेत.उकडीचे मोदक गणपतीला फक्त दाखवायचे आहेत आणि आपणच खायचे आहेत.तांदळाचे पीठ, गूळ, ओले खोबरे, आले, बदाम, पिस्ता, काजू इत्यादी साहित्य मोदक बनवण्यासाठी वापरतात.काही ठिकाणी तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो.मोदक हे खूप रूचकर आणि पौष्टिक असल्याने आबालवृद्धांनी मोदकांवर ताव मारायला हरकत नाही.केवळ गणेश चतुर्थीच्या दिवशीच मोदक न बनवता अधूनमधून बनवून मोदकाचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

भाकडकथा.. दंतकथा

पुराणांमध्ये अनेक भाकडकथा सांगून तत्कालीन लेखकांनी बहुजन, सर्वसामान्य लोकांना विचाराने पंगू बनवले आहे.माणूस सद्सद्विवेकबुद्धी वापरतो, तेव्हा या कथा तथ्यहीन आणि निरर्थक वाटतात.अशीच एक गणपती बाबतची दंतकथा आहे. म्हणे..भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती उंदीर या वाहनावरून जात असताना खाली पडला.हे दृश्य चंद्राने पाहिले आणि चंद्र खो खो हसू लागला.चंद्र हसला म्हणून गणपतीने त्याला शाप दिला की या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तुझे तोंड कोणीही पाहणार नाही.आजही अनेक खेड्यात ही कथा आहे.आणि ती पाळली जाते.आता विचार करा. गणपती उंदराच्या पाठीवरून जाईल का?.उत्तर येईल नाही. चंद्र हा कोणी राजा किंवा सजीव प्राणी नाही.तो एक उपग्रह आहे.तो एक उपग्रह आहे, त्यामुळे त्याचे तोंड बघणे न बघणे प्रश्नच नाही.लहानपणी आम्ही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मुद्दामहून चंद्र पाहून अंधश्रद्धा मोडीत काढण्याचा प्रयत्न असे..

2 thoughts on “गणेश चतुर्थी आणि उकडीचे मोदक / Ganesh Chaturthi and Ukadiche Modak”

  1. खूप छान माहिती आहे सर अशीच माहिती आम्हाला सांगत रहा धन्यवाद सर 🙏😊

    Reply

Leave a comment