सुवर्ण मंदिर/हरमंदिर साहिब-अमृतसर / Golden temple

भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यांत धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये, म्युझिअम्स यांचा स‌मावेश होतो. भारत हा देश सर्वधर्म समभव पुरस्कृत आहे. भारतात विविधतेत एकता आहे. भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती पारशी लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात.असेच एक शीख धर्माचे प्रार्थनास्थळ असलेले ठिकाण म्हणजे अमृतसर येथे असलेले Golden temple होय. या सुवर्ण मंदिराबाबत आपण अधिक माहिती घेणार आहे.

सुवर्ण मंदिर [हरमंदिर साहिब] कोठे आहे ? Where is Suvarna Mandir? [Harmandir Sahib]

भारतातील गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या लढाऊ बाणा जपणाऱ्या पंजाब राज्यातील अमृतसर या शहरात मध्ययुगीन काळात निर्माण केलेले हरमंदिर साहिब हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा कळस, आतील पिलर, बाहेरील भिंती अंतर्बाह्य सोन्याच्या मुलाम्याने झाकोळले आहेत. म्हणूनच हे मंदिर सुवर्ण मंदिर या नावाने संपूर्ण भारतभर ओळखले जाते.

सुवर्ण मंदिर पाहायला कसे जाल ? How to go to see Suvarnamandir [Harmandir Sahib] ?

Golden temple

अमृतसरच्या बसस्थानकापासून अवघ्या 1.8 किलोमीटर अंतरावर हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) आहे. येथून कॅबने किंवा रिक्षाने जाता येते.

2. दिल्लीहून अमृतसर 450 किलोमीटर अंतरावर आहे.

3. हिमाचल प्रदेश मधील शिमला येथून हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) 300 किलोमीटर अंतरावर आहे.

4. हरियाणातील चंदीगड येथून हरमंदिर साहिब 228 किलोमीटर अंतरावर आहे.

5. मुंबईहून अमृतसर 1660 किलोमीटर अंतरावर आहे. विमान किंवा रेल्वेने जाऊ शकता.

* हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर)ची स्थापना : Establishment of Harmandir Sahib [Suvarnamandir]

शीख धर्माची अस्मिता असलेले हे हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) अमृतसर या शहरात आहे. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात डिसेंबर 1585 मध्ये झाली. हे मंदिर बांधून पूर्ण होण्यासाठी 19 वर्षे म्हणजे ऑगस्ट 1604 मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले. या सुवर्ण मंदिराचे वास्तुविशारद गुरु अर्जुनदेव होते. गुरु अर्जुददेव यांच्या कल्पक योजनेतून इ स 1604 मध्ये हे हरमंदिर साहिब पूर्ण झाले.

हरमंदिर साहिब( सुवर्ण मंदिर) ची स्थापत्य कला: Architecture of Harmandir Sahib (Suvarna Mandir)

शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुनदेव यांच्या कल्पनेतून आणि विशाल दृष्टिकोनातून बांधलेले हे मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. अशी प्रवेशद्वार इतर कोणत्याही मंदिर किंवा मशिदीला नसतात. शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुनदेव यांना मंदिराला चार प्रवेशद्वार ठेवण्यामागे एक विशाल द्वाष्टिकोन ठेवलेला आहे. हे हरमंदिर साहिब केवळ शीखांसाठीच खुले आहे असे नाही, तर इतर कोणत्याही जाति-धर्मातील लोकांसाठी हे मंदिर खुले आहे, हे दर्शवण्यासारी चारी बाजूला प्रवेशद्वार ठेवलेले आहेत. आमचा शीख धर्म भेदभाव विरहित आहे. हाच अर्जुनदेव यांना संदेश द्यायचा आहे. म्हणून त्यांनी चार दरवाजे ठेवले आहेत. मंदिर बांधले तेव्हा तांब्याचा किंवा सोन्याचा मुलामा दिलेला नव्हता. मुघल, सुलतान यांच्या आक्रमणात अनेक वेळा मंदिराची नासधूस झाली; पण शीखांनी जिद्‌दीने मंदिराची पुन्हा पुन्हा पुनर्बांधणी केली.

हरमंदिर साहिबचा जीर्णोद्धार : Restoration of Harmandir Sahib [Suvarna Mandir]

अठराव्या शतकात हरमंदिर साहिबचा (सुवर्ण मंदिर) पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराची पुनर्बाधणी करताना सरदार जस्सा सिंग यांच्या देखरेखीखाली 1764 मध्ये सुरु झाले. 1776 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार ‌ म्हणजे पुनर्बाधणीच पूर्ण झाली. त्यानंतर महाराजा रणजित सिंग यांनी आणखी सुधारणा केल्या. मंदिरासाठी संगमरवरी दगड वापरून काही ठिकाणी तांबे वापरून मंदिराला झळाळी आणली. महाराजा रणजित सिंग यांनी 1802 मध्ये सुमारे 162 किलोग्रॅम 24 कॅरेट सोने वापरून मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. मंदिराच्या गर्भगृहाला ही सोन्याचा मुलामा आहे.

राणा रणजित सिंग यांनी दिलेल्या सोन्याच्या झळाळीमुळे हरमंदिर साहिब हे मंदिर जगभर सुवर्ण मंदिर या नावाने ओळखू लागले आहे.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घोट्याएवढ्या पाण्यातून चालत यावे लागते. याचा अर्थ आपले पाय स्वच्छ करूनच मंदिरात प्रवेश करायचा असतो.

जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

हरमंदिर परिसर : Har Mandir Sahib Premises

हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) च्या परिसरात मोठे जलाशय आहे. या जलाशयाला अमृत’ सरोवर किंवा अमृत झील म्हणतात. या सरोवराच्या मध्ये एक मानव निर्मित बेट तयार केले आहे. या बेटावर मंदिर बनवले आहे. हे मंदिर सोन्याच्या मुलाम्याने मढवले आहे. या सरोवराच्या काठाला अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रे आहेत. हे सरोवर आणि तीर्थक्षेत्रे शीखांची श्रद्धास्थाने आहेत. संख्याकाळी मंदिर परिसर रोषणाईमुळे झळाळून जाते. संध्याकाळचे मंदिराचे नयनरम्य दृश्य पाह‌ण्यासारखे असते.

शीखांचे दहा गुरु : Ten Gurus of Shiks:

शीखांनी कोणत्याही अज्ञात, अदृश्य शक्तीला किंवा पृथ्वीतलावर अस्तित्व नसलेल्या देवाचे अस्तित्व नाकारले आहे .ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले. ज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांनाच त्यांनी गुरु मानले आणि या गुरुंनाच त्यांनी देव मानले. शीख धर्मात वेगळा असा देव नाही या शीखांच्या दहा गुरुंची आपण ओळख करून घेऊया.

1. गुरु नानक – शीख धर्माचे संस्थापक:

गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक असून यांचा जन्म 1469 साली झाला. गुरु नानक यांचा मृत्यू 1539 साली झाला. त्यांनी अज्ञात ईश्वरी रुपाला नाकारले .मानवतावादी विचारांचा नवा धर्म स्थापन केला. गुरु नानक हे तत्त्वज्ञानी होते. योगी होते. धर्मसुधारक, समाजसुधारक देशभक्त होते. यांची शिकवण लोकांना आवडू लागली. आपले काम प्रामाणिकपणे करा, दान करा आणि नेहमी गुरुला स्मरा .हे गुरुनानक यांच्या उपदेशाचे सार होते. गुरु नानक यांचा जन्म गुरुद्वारा येथे झाला तर मृत्यू करतारपूर येथे झाला. ही दोन्हीही ठिकाणे सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1469,तर मृत्यु 22 सप्टेंबर 1539 रोजी झाला..
2. गुरु अंगद हे शीखाचे दुसरे शुरु होय. 3. गुरु अमर हे शीखांचे तिसरे गुरु होय.
4. गुरु रामदास हे शीखांचे चौथे गुरु होय.
5. गुरू अर्जुन हे शीखांचे पाचवे गुरू होय.
6. गुरु हरगोविंद हे शीखांचे सहावे गुरु होय.
7. गुरु हर राय हे शीखांचे सातवे गुरु होय.
8. गुरु हर कृष्णन् हे शीखांचे आठवे गुरु होय
9. गुरु तेग बहादूर है शीखांचे नववे गुरु होय.

10. गुरु गोविंदसिंग:

गुरु गोविंद सिंग हे शीखांचे दहावे आणि अंतिम गुरु होत. 22 डिसेंबर 1666 मध्ये त्यांचा पाटणा येथे जन्म झाला. गुरु गोविंद‌सिंग यांनी गुरु ग्रंथसाहिब या शीखांच्या ग्रंथाचे संकलन आणि लेखन केले. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. गुरु गोविंद सिंग यांनी शीखांच्या संरक्ष‌णासाठी खालसा दल स्थापन केले. ज्ञानदे‌वे रचिला पाया तुका झाला से कळस’ असे आपण म्हणतो. तसेच शीख धर्मात-

गुरु नानके रचला पाया। गुरु गोविंद झालासे कळस ॥

असे म्हणायला हरकत नाही .गुरु गोविंद‌सिंग यांच्यावर 7 ऑक्टोबर 1708 मध्ये प्राणघातक हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.महाराष्ट्रात नांदेड येथे शीखांचे पवित्र मंदिर आहे.

शीखांचा पवित्र ग्रंथ-गुरु ग्रंथ साहिब : Holy book of Sikhs : Guru Granth Sahib:

शीखांचे दहावे गुरु गुरु गोविंद‌सिंग यांनी शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब याचे लेखन आणि संकलन केले. गुरु गोविंद‌सिंग यांनी संकलन आणि लेखन केले असले तरी गुरु नानक यांच्यापासून ते गुरु गोविंद सिंग यांच्या पर्वत दहा गुरूंनी जे उपदेश दिले आहेत, त्या उपदे‌शांचे संकलन गुरु गोविंद सिंग यांनी केलेले आहे. हा ग्रंथ शीखांचा आदिग्रंथ मानला जातो. शिवाय गुरु ग्रंथ साहिब हाच शीखांचा धर्मग्रंथ आहे.

गुरु ग्रंथसाहिब या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथात संत कबीर, संत नामदेव, संत रविदास, शेख फरीद यांचे अभंग, रचना, काव्य यांचाही समावेश करून गुरु गोविंदसिंगांनी एक सर्वव्यापक असा ग्रंथ संकलित केला आहे.

 

Leave a comment