नगरचा भुईकोट किल्ला / Bhuikot Fort Ahemadnagar

नगर जिल्ह्यातील गड

गडाचे गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे तीन प्रकार पडतात. त्यापैकी Bhuikot Fort Ahemadnagar हा भुईकोट किल्ला या प्रकारात येतो. आता आपण या भुईकोट किल्ल्याची माहिती घेणार आहोत.

किल्ल्याचे नाव : नगरचा किल्ला, भिंगारचा किल्ला.

समुद्रसपाटीपासून उंची : 657 मी.

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : अहमदनगर शहरात, महाराष्ट्र

जिल्हा : नगर [अहिल्यानगर]

सध्याची अवस्था : चांगली

स्थापना: इ. स. 1553

नगरला कसे जाल ?How to go to Nagar?

सभोवताली तट बांधून जमिनीवरच बांधलेल्या किल्ल्याला ‘भुईकोट’ किल्ला असे म्हणतात. हा किल्ला नगर शहराच्या पूर्व बाजूला आहे. नगर शहरात आल्यानंतर बसने, टॅक्सीने किल्ला पाहण्यास जाता येते.

* पुण्याहून विमाननगर-लोणीकंद-शिक्रापूर- शिरूर-राळेगणसिद्धी-सुपे मार्गे अहमदनगर 121 किलोमीटर आहे.

* नागपूरहून छत्रपतीं संभाजी नगरमार्गे नगर 587 किलोमीटर असून छत्रपती संभाजीनगरहून 114 किलोमीटर आहे.

* शिर्डीहून अहमदनगर 160 किलोमीटर अंतरावर आहे.

इतिहास:

पंधराव्या शतकाच्या शेवटी इ. स. 1486 मध्ये महान बहमनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यातील अहमदनगरची निजामशाही एक आहे. मलिक अहमदशाह बहिरी या निजामशहाने इ. स. 1490 मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ एक नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. मलिक अहमदशहाच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले.आता या शहराचे नाव धाराशिव असे ठेवले आहे इ. स. 1494 मध्ये शहराची नगररचना पूर्ण झाली आणि निजामशहाने आपली राजधानी येथे बसवली.

अहमदनगरची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या व्यापारी शहरांशी केली जात असे. या निजामशाहीवर अहमदशाह, बुन्हाणशाह, चाँदबिबी इत्यादींनी आपली सत्ता गाजवली. ही निजामशाही इ. स. 1636 मध्ये नष्ट झाली. दिल्लीचा मुघल बादशाह शाहजहान याने इ. स. 1636 मध्ये येथे आपली सत्ता स्थापन केली.

शहाजीराजे भोसले यांनी निजामशाही वाचवण्यासाठी कित्येक वेळा प्रयत्न केले होते;पण निजामशाहाच्या नियोजनशून्य धोरणामुळे अखेर निजामशाहीची सत्ता संपुष्टात आली.

इ. स. 1759 साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला. त्यानंतर इ. स. 1803 मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला.

अहमदनगरचा हा भुईकोट किल्ला हुसेन निजामशाह याने इ. स. 1553 मध्ये बांधण्यास सुरुवात केली.

मुघल बादशाह अकबरने आपल्या राज्याचा दक्षिणेस विस्तार करण्याच्या उद्देशाने दनियाल, मिर्झा युसूफखान आणि खान खनन यांना 1598/99 च्या दरम्यान दक्षिण मोहिमेवर पाठवले होते.

इ. स. 2599 मध्ये दनियालने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. चांदबिबीने अहमदनगरचा किल्ला वाचवण्यासाठी निकराने लढा दिला. चांदबिबी ही हुसेन निजामशहाची पहिली बेटी होय. ती कर्तबगार होती तिने निजामशाही आणि कुतुबशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले. निजामशाहीला वाचवण्यासाठी तिने सम्राट अकबरला विरोध केला. अहमदनगरमध्ये शिरकाव करण्यास मोगल सेनेला विरोध केला; पण अंतर्गत बंडाळीमुळे आणि फितुरीमुळे चांदबिबीचा टिकाव मोगलांपुढे लागला नाही. चांदबिबीलाही या लढाईत प्राण गमवावा लागला. इ. स. 1600 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

चांदबिबीच्या पश्चात पुढे मोगलांच्या ताब्यात असलेला किल्ला पुन्हा निजामशाहीच्या ताब्यात गेला. शहाजहानने 1636 मध्ये केलेल्या आक्रमणात निजामशाही संपुष्टात आली.

अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

इ. स. 1759 मध्ये पेशव्यांनी अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला. मोगलांचा पराभव करून आपली सत्ता प्रस्थापित केली. 12 ऑगस्ट 1803 रोजी लॉर्ड वेलस्लीने अहमदनगरचा किल्ला पेशव्यांच्या ताब्यातून घेतला.

इंग्रजांनी अहमदनगरच्या या भुईकोट किल्ल्याचा उपयोग भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील राजकैद्यांना तुरुंगात टाकण्यासाठी केला.

1942 च्या चलेजावच्या आंदोलनाच्या काळात इंग्रज सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, पी. सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेत्यांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात डांबून ठेवले होते.

तुरूंगातच जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, प्रफुल्लचंद्र घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हे ग्रंथ लिहिले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ आजही लोकप्रिय आहे. भारताचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीने या ग्रंथात मांडला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात गेला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे :

तटबंदी व खंदक:

जवळजवळ दोन-अडीच किलोमीटर परिघामध्ये जमिनीवरच अहमदनगरचा किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या सभोवताली तटबंदी असून सर्व बाजूंनी खोल खंदक आहे. खंदकाच्या बाहेर मातीच्या उंच टेकड्या आहेत. या टेकड्या किल्ल्याच्या संरक्षणासाठीच उभारल्या होत्या. टेकड्यांमुळे दोन गोष्टी साध्य होत असत. एक म्हणजे किल्ला सहजासहजी दृष्टिक्षेपास येत नसे.
दुसरे म्हणजे टेकड्यांमुळे शत्रूला बुरुजांवर तोफांचा मारा करता येत नसे.

बावीस बुरूज:

गडावर एकूण बावीस बुरूज आहेत. अहमद निजामशहाने आपल्या कर्तबगार सेनापतींची, प्रधानांची नावे बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

किल्ल्याच्या तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते. गगन महाल, सोन महाल, मीना महाल, बगदाद महाल, मुल्क आबाद अशी त्यांची नावे होती. इमारतीच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. मदरशामध्ये राजघराण्यातील मुलांना शिक्षण दिले जात असे. या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत एक छोटेखानी गावच वसलेले होते. येथे राहणाऱ्या लोकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून चार विहिरी खोदल्या होत्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी विहिरींना नावे दिलेली होती.

सध्या किल्ल्यातील अनेक वास्तू, विहिरी दिसत नाहीत. काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्या.

सध्या भुयारी मार्ग, नेता कक्ष (स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी येथे कैदी म्हणून ठेवलेले नेते) कमानी असलेले प्रवेशद्वार इत्यादी बाबी पाहायला मिळतात.

चांदबिबीचा महाल :

नगर शहरापासून अगदी एक-दीड किलोमीटर अंतरावर अष्टकोनी आकाराचा असलेला महाल म्हणजे ‘चांदबिबीचा महाल’ होय. सोळाव्या शतकापासून सुमारे पाचशे वर्षे हा महाल अभंग अवस्थेत आजही ऊन, वारा, पाऊस सहन करत ताठ मानेने उभा आहे.

या महालात सलाबतखान आणि त्याची पत्नी यांच्या समाध्या आहेत. इंग्रजांनी सुद्धा या महालाचा उपयोग प्रशासकीय कामकाजासाठी आणि नंतर आरोग्यधाम म्हणून केला होता. परंतु पुरेशा पाण्याच्या अभावामुळे ही इमारत ओस पडली.

हुसेन निजामशहाची मुलगी चांदबिबी ही कर्तबगार होती. विजापूरचा अली आदिलशहा हा तिचा पती. त्यामुळे निजामशाही आणि आदिलशाही वाचवण्यासाठी चांदबिबीने केलेले प्रयत्न आणि दाखवलेले धाडस यामुळे हा महाल ‘चांदबिबीचा महाल’ या नावाने ओळखला जातो. चांदबिबीचे काही काळ या महालातच वास्तव्य होते. चांदबिबी हुशार आणि कर्तबगार होती. तिला मराठी, कन्नड, उर्दू इत्यादी भाषा अवगत होत्या. 1596 आणि 1600 मध्ये अहमदनगरवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी चांदबिबी या महालातच होती. या महालातूनच तिने युद्धाची सूत्रे हलवली. त्यामुळेच या महालाला चांदबिबीचा महाल असे नाव पडले.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

अहमदनगरचा भुईकोट किल्ला शहरातच असल्यामुळे शहरात राहण्यासाठी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. मुक्कामाची आणि जेवणाची उत्तम सोय या शहरात होऊ शकते.

सध्या या किल्ल्यामध्ये भारतीय लष्कराची वसाहत असल्यामुळे किल्ल्याचा काही भाग आपणास पाहायला मिळतो. चांदबिबीचा महाल पाहण्यास कोणतीच अडचण नाही.

आवर्जून वाचावे असे काही

  1. रायरेश्वर-Raireshwar
  2. पांडवगड: Pandavgad Fort

Leave a comment