अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

एके काळी गोवा आणि पोर्तुगीज असे समीकरण होते. सुमारे साडेचारशे वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवणारे पोर्तुगीज धर्माने ख्रिस्ती असले तरी चिवट आणि दूरदृष्टीचे होते.गोव्याच्या किल्ल्यांचे वर्णन करताना पोर्तुगीजांचा परिचय येतोच. गोव्याच्या प्रशासकीय हद्दीत असलेला आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असलेला अंजदीव किल्ला Anjediva island  या छोट्याशा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याला अंजदिवे किल्ला असेही म्हटले जाते. आता आपण अंजदीव किल्ल्याचा परिचय करुन घेणार आहोत.

गडाचे नाव: अंजदीव / अंजदिवे

किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग

स्थापना : 1505

समुद्रसपाटीपासून उंची: 10 मीटर

चढाईची श्रेणी: सोपी

सध्याची अवस्था : बरी
जाण्याचा मार्ग. :जलमार्ग, बोटीने

जिल्हा : दक्षिण गोवा ,
राज्य : गोवा

अंजदीवला कसे जाल ? How to go to see Anjediva fort?

* अंजदीव किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला कारवार समुद्र किनाऱ्यावर गेले पाहिजे. तेथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर अंजदीप बेट आहे. या बेटावर अंजदीव किल्ला आहे. कारवार किनाऱ्यावरून बोटीने अंजदीव किल्ल्यावर जाता येते.

* दक्षिण गोवा सागरी किनाऱ्यावरून अंजेदि‌वा द्वीप (किल्ला) 1.8 किलोमीटर आहे.

अंजदिवे किल्ल्याचा इतिहास : History of Anjediva fort

इ.स. 1498 साली वास्को-द-गामा भारतात आला होता. त्यावेळी अंजदीप बेटावर येऊन गेला. त्यावेळी गयारामाचा पूर्वज कोणीतरी होता. त्याला मोठ्या रकमेचं आमिष दाखवून वास्को-द-गामाने ख्रिस्ती धर्मात सामील करून घेतले. त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारून गॅस्पर-द- गामा हे नवीन नाव धारण करून घेतले. गॅस्पर पोर्तुगीज आरमारात मोठा नाविक अधिकारी बनला. इ.स. 1502 मध्ये वास्को-द-गामा वाद‌ळात सापडल्यावर त्याला अंजदीव बेटावर आश्रय घ्यावा लागला. इ.स. 1505 मध्ये याच बेटावर पोर्तुगीजांनी किल्ला बांधून घेतला. इटालियन प्रवासी बर्थेमा याच्या प्रवास वर्णनात या किल्ल्याचा संदर्भ आलेला आहे. तेव्हापासून 1961 पर्यंत अंजदीव किल्ला पोतुगीजांच्या ताब्यात होता.

अंजदीव किल्ल्याला अंजेदिव, अंजदिवे, अंजदीव अंजदीप बेट, अंजदीप द्वीप इत्यादी नावे भाषेतील अपभ्रंशामुळे पडलेली आहेत. हा किल्ला 1.5 चौरस किलोमीटर परिक्षेत्रात व्यापलेला आहे. या किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे 1600 मीटर असून पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 260 मीटर आहे. या किल्ल्याचे जे बेट आहे, ते बेट ग्रॅनाइट आणि जांभा खड‌कापासून बनलेले आहे.

इ.स. 1661 साली इंग्रजांना मुंबई आंदण मिळाली होती.आंद‌ण म्हणजे बक्षीस किंवा देणगी रुपात मिळालेली वस्तू. त्यावेळी काही काळ इंग्रजांनी या किल्ल्यावर आश्रय घेतला होता. त्यावेळी वाईट हवामान आणि रोगराई‌मुळे 500 पैकी सुमारे 350 माणसे मृत्यूमुखी पडली होती या घटनेचा परिणाम असा झाला की पुढे पोर्तुगीज या किल्ल्याचा उपयोग कैदी टेवण्यासाठी, गुन्हे‌गार ठेवण्यासाठीच करू लागले. कै‌द्यांना आणि गुन्हेगारांना या बेटावर दिलेली शिक्षा म्हणजे काळ्या पाण्याचीच शिक्षा होती.

इ.स. 1674 साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीजांशी पत्रव्यवहार करून त्यांना खरमरीत ताकीद दिली होती. पोर्तुगीजांचा कोकणातील वाढता प्रभाव राखण्यासाठी शिवरायांनी हा उपाय केला होता. पोर्तुगीज शिवरायांना लचत असत. गोव्याच्या आग्वाद आणि अंजदीव किल्ल्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी आपले गोव्यातील बस्तान भक्कम केले होते.

विजापूरच्या आदिलशाहाने सुद्‌धा पोर्तुगीजांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अंजदीव बेटावर हल्ला केला; पण नियोजनाचा अभाव, पुरेशी साधनसामग्री आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षा यांच्या अभावामुळे विजापूरच्या आदिलशाहाला हा किल्ला जिंकता आला नाही. या हल्ल्यामुळे पोर्तुगीज सावध झाले .त्यांनी आपली बाजू अधिक भक्कम करण्यासाठी किल्ल्याची डागडुजी करून घेतली. किल्ल्यावर भरपूर दारु‌गोळा व साधनसामग्री ठेवली.आधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्धनीती यांत पोर्तुगीज सरस होते. त्यामुळे ते गोव्याचे निर्विवाद सम्राट म्हणून वावरत असत.

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती जानेवारी 1981 मध्ये झाले. त्यांची धडाकेबाज युद्धनीती सगळीकडे लौकिकात होती. मुघल, आदिलशाहा, पोर्तुगीज, इंग्रज आणि स्वकीय अशा सर्व पातळ्यांवर त्यांची घोडदौड चालू होती.सगळेच स्वराज्याच्या नव्या छत्रपतींना दचकून होते. औरंगजेबचा वकील काफीखान तर म्हणायचा, “संभाजी तर शिवाजीपेक्षा दसपट भारी आहे.त्याच्यावर विजय मिळवणे अशक्य.”

इ स. 1683 मध्ये पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्यावर आक्रमण करून फोंडा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयल सुरु केले. ही बातमी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांना समजली. स्वतः संभाजी महाराज 3000 फौजेनिशी फोंडयाच्या दिशेने रवाना झाले. गडावर जोरदार मुसंडी मारुन पोर्तुगीजांचा पाडाव केला.

यावेळी पोर्तुगीजांचा व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को दि ताव्होरा होता. फ्रान्सिस्कोला फोंड्याचा किल्ला सोडून पळता भुई थोडी झाली. संभाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग चालूच ठेवला. पोर्तुगीजांचा बिमोड केल्याशिवाय मागे फिरायचे नाही, असे संभाजी महाराजांनी जणू प्रणच केले होते. पोर्तुगीज गोव्यात पोचले. पाठोपाठ आपल्या सैन्यानिशी संभाजी महाराजही गोव्यात पोहोचले. बघता बघता महाराजांनी जुवे बेट काबीज केले.

मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तुंबळ लढाई झाली. यांत पोर्तुगीजांचे मोठे नुकसान झाले. फ्रान्सिस्को जखमी झाला. त्याने तहासाठी वाटाघाटी सुरु करण्याचे आवाहन केले; पण संभाजी राजेना पोर्तुगीजांचा पूर्ण बिमोड करायचा होता.इतक्यात वाईट बातमी कानावर आली .मुघल स्वराज्यात घुसले होते.इकडे नाइलाजाने पोर्तुगाजांशी वाटाघाटी करून, खंडणी गोळा करून आणि पोर्तुगीजांवर जरब बसवून संभाजी महाराज माघारी परतले.

पुढे म्हैसूर संस्थानाचा सम्राट हैदर अलीने अंजदीव बेट आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही.

19 व्या शतकात भारतात इंग्रजीची सत्ता होती. पण त्यांनी कधीच पोर्तुगीजांशी दुश्मनी पत्करली नाही. त्यामुळे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आबादित राहिला.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला;पण गोवा पारतंत्र्यातच राहिला.

इ.स.1788 ला पोर्तुगीजांविरुद्‌ध विद्रोह झाला; पण तो टिकला नाही. 1928 ला गोवा स्वतंत्र होण्यासाठी गोवा मुक्ती आंदोलन झाले. यात टी. बी.कुन्हा आणि सुधाताई जोशी होत्या.

भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व केले. 1953 साली पोर्तुगीजांनी भारतातील दूतावास बंद केले. 15 ऑगस्ट 1955 रोजी सुमारे 5000 जमावाने गोव्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यात 30 जनांना शहीद व्हावे लागले.

अंतिम संग्राम:

19 डिसेंबर 1961 रोजी भारताच्या तिन्ही सेना दलाने गोव्यावर हल्ला केला.तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने संपूर्ण शरणागती पत्करली. गव्हर्नर मॅन्यू आंतोनियो सिल्वा याने गोव्याची सर्व सूत्रे भारताकडे सोपवली आणि गोवा मुक्त झाला. 451 वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यात होता. गोव्याने मोकळा श्वास घेतला.

अंजदिवे बेट :एक पर्यटन स्थळ :

अंजदिवे बेटावर किल्ल्याचे अवशेष फक्त आहेत. किल्ला गोवा सरकारच्या ताब्यात आहे.गोवा सरकारने या बेटाला पर्यटन रुपात विकसित केले तर पर्यटकांची गर्दी निश्वितच वाढेल. सिंगापोर सरकारने अशा बेटांचे सुंदर पर्यटन स्थळे बनवली आहेत. त्यामुळे सिंगापोर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ झाले आहे.

अंजदिवे बेट असेच सुंदर आहे. चहूबाजूंनी समुद्र आहे. त्यामुळे पर्यटनाला चांगली संधी आहे..

Leave a comment