निसर्ग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतो. मनाला आनंद देणारा असतो. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने मनःशांती मिळते. Ooty हे असेच एक निसर्ग रम्य, अप्रतिम सौंदर्याने नटलेले आणि तामिळनाडू राज्याचे वैभव आहे. Ooty म्हणजे उदगमंडलम.उदक म्हणजेच जलतरंग. उटीला ‘उदगमंडलम या दुसऱ्या नावाने ओळखते जाते. उटीचे ‘ओट्टकल मांडू’ असेही पूर्वीचे नाव होते. त्याच उटीबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
ठिकाणाचे नाव : उटी
ठिकाणाचा प्रकार: गिरिस्थान, थंड हवेचे विकाण.
समुद्रसपाटी पासून उंची: 2240 मी.
चढाईची श्रेणी : मध्यम
जवळचे विकाण: कोईमतूर, 85 किमी.
ठिकाणाची इतर नावे : उदगमंडलम, ओट्टकल मांडू
उपमा: प्रतिकाश्मीर.
राज्य: तामिळनाडू
उटीला कसे जाल ? How to go to see Ooty?
* उटी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध ठिकाण आहे. उटीला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. कोईमतूर पासून उटी 85 किलोमीटर अंतरावर आहे.
* कर्नाटक राज्यातील म्हैसूर हे ठिकाण तुम्ही पाहायला गेला असाल तर म्हैसूर पासून उटी 125 किलोमीटर अंतरावर आहे.
* बंदीपूर नॅशनल पार्क कर्नाटक राज्यात आहे. बंदीपूर येथून उटी 48 किलोमीटर अंतरावर आहे.
* कडनद (Kadanad) पासून उटी 24 किलोमीटर अंतरावर आहे.
उटी म्हणजे काय ? What is Ooty ?
उटी हे तामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. उटी म्हणजे ओट्टकल मांडू किंवा उदगमंडलम, ओट्टकल मांडू किंवा उदगमंडलम ही तमिळी भाषेतील उटीची जुनी नावे आहेत. उदग किंवा उदक म्हणजे पाणी, जल, तसे उदगमंडलम म्हणजे जलतरंग, जलतरंग हा गर्भित अर्थ उटीच्या सौंदर्याबद्दल बरेच काही सांगून जातो, म्हणून उटीला प्रति काश्मीर असे म्हटले जाते.
उटीमध्ये काय प्रसिद्ध आहे ? What is famous in Ooty?
उटी हे निलगिरी पर्वतातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. निलगिरी पर्वत म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू राज्यात पसरलेला पश्चिम घाट होय. या उटीमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
1) निलगिरी पर्वत रेल्वे (टॉय ट्रेन यात्रा) २) उटी सरोवर (Ooty zeal) 3) डोड्डाबेट्टा चोटी [Doddabetta Hill Station] 4) पायकारा धबधबा – Pyakara water falls 5) बोटॅनिकल गार्डन Botanical Garden 6) कामराज सागर झील – Kamraj Sagar Zeal. 7) फर्नहिल महाल – Pharnhill Palace. अशी अनेक ठिकाणे उटीमध्ये आहेत .त्यांची आपण आता माहिती घेऊया,
1) निलगिरी पर्वत रेल्वे [Toy Train/Nilgiri Mountain Rail]
उटीमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना तो आनंद अधिक द्विगुणित होण्यासाठी Nilgiri Mountain Train चा प्रवास अनिवार्य आहे. ही टॉय ट्रेन मेट्टुपलायम येथून सुटते. येथूनच डोळे उघडे ठेवत कल्लर, एडडर्जी, हिलग्रोव, रन्नीमीड, कुन्नूर, वेलिंग्टन, अरवणकाड्डू, लवडेल, फेर्नहिल आणि उदगमंडलम ही ठिकाणे पाहत जायचे . शेवटचा स्टॉप म्हणजे उदगमंडलम. म्हणजेच उटी होय. या निलगिरी पर्वत रल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने या रेल्वे जंक्शनची नोंद घेतली आहे. 2005 साली युनेस्कोने दार्जिलिंग हिमालय रेल्वेचे विस्तारित रूप म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
इ.स. 1854 मध्ये ब्रिटिश सरकारने उटीचे सौंदर्य पाहून मेट्टूपलायम ते निलगिरी पर्वत पर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्लॅन बनवला होता. प्रत्यक्ष 1839 मध्ये या रेल्वे मार्गाला गती मिळाली. सप्टेंबर 1908 मध्ये मेट्टूपलायम ते उटीपरीत रेल्वे सुरु झाली. ब्रिटिश सरकारच्या काळात सुरु झालेली ही रेल्वे आजही चालू आहे
2) उटी सरोवर-Ooty Zeal:
तामिळनाडू राज्यातील उटी हे निसर्ग सौंदर्य लाभलेले ठिकाण निलगिरी पर्वतात आहे. याच निलगिटी पर्वतात उटी सरोवर आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 2200 मीटर उंचीवर असलेल्या उटी सरोवराचे दृश्य पाहताना निसर्गची किमया काय असते, याची प्रचिती येते. या सरोवराच्या काठावर उभे राहून उटीचे सौंदर्य मनमुरादपणे लुटायचे. मार्च, एप्रिल, मे या महिन्यात तुम्ही उटीला गेला असाल किंवा हिरवा शालू परिधान केलेल्या उटीच्या धरतीमातेला पाहायला ऑक्टोबर महिन्यात आला असाल तर नक्कीच तुम्ही आनंद लुटाल. कोईमतूर पासून 86 किलोमीटर दूर असले तरी हे सरोवर टॉय ट्रेनला जोडलेले असल्यामुळे आपला प्रवास सुखाचा होतो.
3) डोड्डाबेट्टा चोटी: Doddabetta Peak:
डोड्डाबेट्टा चोटी तामिळनाडू राज्यात निलगिरी पर्वत रांगेत येते.हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. या शिखराची समुद्रसपाटीपासून 2637 मीटर उंची आहे. महाराष्ट्रातील कळसूबाई शिखरची उंची 1646 मीटर आहे. यावरून डोड्डा बेट्टा शिखर किती उंच आहे, याची आपल्याला कल्पना येते. हे क्षेत्र वनक्षेत्रात येते. निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर हे डोड्डाबेट्टा हेच आहे .उटीला गेल्यावर उटी कोटागिरी रोडवर उटीपासून 9 किलोमीटर अंतरावर हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. डोड्डाबेट्टा हा कन्नड शब्द असून त्याचा अर्थ मोठे शिखर असा आहे. तुम्ही उटीला गेला आहात किंवा जाणार असाल तर निश्चितच डोड्डाबेट्टाला पाय लावून या.
4) पायकारा धबधबा – Pykara Water Falls, Ooty:
तामिळनाडू राज्यातील पायकारा नदीवर उटीपासून सुमारे 19 किलोमीटर दूर असलेला पायकारा धबधबा शुद्ध, शुभ्र पाण्यासाठी जसा प्रसिद्ध आहे. तसाच तो निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.ही पायकारा नदी मुफुर्थी पर्वत शिखरातून अगम पावते. या ठिकाणी पायकारा मंदिर पण आहे. तामिळनाडूतील लोक या नदीला खूप पवित्र नदी मानतात. म्हणूनच येथे पायकारा मंदिर उभारलेले आहे. पायकारा धबधब्यांची उंची सुमारे 61 मीटर आहे. हा धबधबा पाहायचा असेल तर आपले वाहन मुख्य रस्त्यावर लावून 6 किलोमीटर चालत जावे लागते . या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर महिना सर्वात उत्तम आहे.
5) बॉटनिकल गार्डन, Botanical Garden, Ooty:
भारतात अनेक ठिकाणी बॉटनिकल गार्डन आहे. पण त्यांतील काहीच सौंदर्यसंपन्न आहेत.त्यातीलच एक म्हणजे उटी येथील बॉटनिकल गार्डन होय. ही बॉटनिकल गार्डन शासकीय बॉटनिकल गार्डन आहे. या गार्डनची निर्मिती 1847 साली इंग्रजांनी केली. भारतातील अनेक थंड हवेच्या ठिकाणांची निर्मिती, सोयी सुविधा इंग्रजांनी केल्या आहेत .ही बाग जवळजवळ 55 एकरात पसरलेली आहे तुम्ही उटीला आला आहात आणि बॉटनिकल गार्डन न पाहता गेला असाल तर तुम्ही आनंदाचे क्षण मिस केलात असे समजा. या बागेचे एकूण पाच विभाग आहेत. येथील फर्न हाऊस मध्ये फर्नच्या 127 प्रजाती आहेत. याशिवाय इटालियन गार्डन, फुलांचा गालिचा असे सर्वच विभाग पाहण्यासारखे आहेत.
(6) कामराज सागर डॅम :kamaraj Sagar Dam:
तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतात उगम पावलेल्या पायकारा नदीवर हा कामराज सागर डॅम आहे. येथील परिसर सरोवर, निसर्ग, वृक्षवल्ली सारेच अद्भुत आहे .हे ठिकाण अभयारण्य कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे येथे प्राणी सुद्धा नजरेस पडू शकतात. या प्रदेशाला वनौषधींचा खजिना असे म्हटले आहे.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय: Living and Eating Facilities
उटी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थळ असल्याने उटी परिसरात भरपूर रेस्टॉरंट आहेत. इथे आपल्याला हवे तितके दिवस राहता येते. आपल्या आवडीप्रमाणे खाद्य पदार्थ बनवायला सांगू शकतो. एक ना एक दिवस तरी आपण प्रति काश्मीर असलेले उटी पाहिले पाहिजे.
उटीच्या प्रवासाला पर्यटकांना कोटी कोटी शुभेच्छा !