भारतातील राजस्थान राज्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे Mount Abu होय. अर्बुदांचल हे माऊंट आबूचे जुने नाव असून राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेत येणारे थंड, शुद्ध हवा देणारे असे हे नयगरम्य ठिकाण आहे.याच माऊंट आबूच्या परिसरात नखी सरोवर, गुरु शिखर, महादेव मंदिर, संगमरवरी जैन मंदिरे आहेत. शिवाय ब्राह्मकुमारी पंथाचे मुख्य केंद्र माऊंट आबूतच आहे. अशी अनेक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आपणाला माऊंट आबूलाजावे लागणारः चला तर मग, माउंट आबू विषयी आपण माहिती घेऊया.
माउंट आबूची ठळक माहिती : Highlights of Mount Abu
ठिकाणाचे नाव : माउंट आबू
ठिकाणाचा प्रकार: गिरिशिखर
समुद्र सपाटीपासून उंची : 1722 मीटर
जवळूचे ठिकाण : दिलवाडा मंदिर
जिल्हा : सिरोही
राज्य : राजस्थान
सिरोही पासून अंतर :32 किलोमीटर
ठिकाण प्रकार: थंड हवेचे ठिकाण
चढाईची श्रेणी : मध्यम, काही अवघड
डोंगररांग: अरवली पर्वत.
• माउंट आबूला कसे जायचे ? How to go to see Mount Abu?
* उदयपूर या राजस्थानमधील प्रसिद्ध शहरापासून माउंट आबू 164 किलोमीटर अंतरावर आहे.
सिरोही या जिल्ह्याच्या ठिकाणाहून माउंट आबू 82 किलोमीटर अंतरावर आहे माउंट आबूच्या पायथ्यापर्यंत बसने जाता येते.
* गुजराथमधील अहमदाबाद शहरापासून माउंट आबू 228 किलोमीटर अंतरावर आहे; तर गांधीनगर पासून 216 किलोमीटर अंतरावर आहे
* किवरली, जि. सिरोही पासून माउंट आबू 28 किलोमीटर आहे. • दिलवाडा मंदिर पासून माउंट आबू 2.5 किमी वर आहे. माउंट आबू पर्वत शिखर परिसरातच दिलवाडा मंदिर आहे.
* काय आहे माउंट आबू ? What is Mount Abu?
माउंट आबू हे एक राजस्थान राज्यातील अरवली पर्वतातील प्रसिद्ध शिखर [Famous Peak] आहे. राजस्थानातील हे सर्वांत उंच ठिकाण असून याच आबू डोंगरावर एक उंच पोटशिखर आहे. त्याला शुरुशिखर [1722 मीटर) म्हणतात. हे ठिकाण थंड हवेसाठी जसे प्रसिद्ध आहे, तसेच ते हिंदू, जैन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
माउंट आबूचे जुने नाव काय? Old/Original Name of Mant Abu.
माउंट आबूचे पर्वतशिखर पूर्वी अर्बुद पर्वत या नावाने ओळखला जात असे. अर्बुद म्हणजे उंचवटा, अवाळू (बोंगा). आपल्या शरीरावर एखाद्या ठिकाणी मोठा अवाळू (आवाळ) येतो, तसाच पृथ्वीवर आलेला हा अवाळू होय. अवाळू म्हणजे या ठिकाणी उंचवटा या अर्थाने मला आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडे पसरलेल्या अरवली पर्वतातील हा सर्वात मोठा अर्बुद म्हणजेच उंचवटा होय. अर्बुद हा शब्द पुढे अपभ्रंश होऊन अबू आबू असा झाला ब्रिटिशांनी याच अर्बुद शिखराला माउंट आबू [Mount Abu] असे नाव दिले.
• माउंट अबूतील प्रसिद्ध ठिकाणे : Famous Places in Mount Abu.
1. गुरुशिखर: Guru Peak: Mount Abu:.
माउंट अबू पर्वतातील सर्वांत उंच शिखर म्हणजे गुरु शिखर होय. खरे तर अरवली पर्वत हा मुख्य पर्वत आहे. त्या पर्वतातील सर्वात उंच शिखर माउंट अबू आहे. याच माउंट अबू शिखरावर एक पोट शिखर आहे. तेथे दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरावरून या शिखराला म्हणजे माउंट अबूच्या एका भागाला गुरु शिखर असे म्हटले जाते. माऊंट अबू पासून 14 किलोमीटर अंतरावर गुरु शिखर आहे.
याच गुरु शिखराला दत्तात्रेय शिखर असेही म्हणतात .दत्तात्रेय हा कपिल मूनी यांची कन्या अनसूया आणि अत्रि ऋषी यांचा पुत्र म्हणजे दत्तात्रेय होय. कपिलमुनी हे बळीराजाचे चुलते असून त्यांनीच आपल्याला आश्रम व्यवस्था (ब्राह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, सन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम) दिली आहे. तुम्ही राजस्थानमधील सर्वोच्च शिखरावर पोहोचाल, तेव्हा तुम्हाला अरवली पर्वताच्या समुद्राच्या लाटांसारख्या रांगा आणि सभोवार निसर्गाचे अवर्णनीय दृश्य दिसेल. एक वेळ गुरु शिखरावर जाऊन हा अनुभव घ्यायला हरकत नाही.
2. दिलवडा मंदिर: Dilwara Mandir:
दिलवाडा मंदिर पासून माउंट अबू केवळ अडीच किलोमीटर अंतरावर आहे. दिलवाडा मंदिर पाहून पुढे माउंट अबूला जाता येते. हे मंदिर मध्ययुगीन काळातील असून इ.स. 1230 मध्ये तत्कालीन गुजरातचे शासक वस्तुपाल आणि तेजपाल या दोन पोरवाड भावांनी बांधलेले आहे. हे भगवान नेमिनाथ यांचे मंदिर आहे. जैन मंदिर आहे. मंदिराच्या समोरील मंडपात तीर्थकरांच्या 360 मूर्ती आहेत. या ठिकाणी संगमरवरीच्या 10 हत्तींच्या मूर्ती आहेत. त्यामुळे या ठिकाणाला हत्तीशाळा किंवा हत्ती घर असे म्हणतात.
या दिलवाडा मंदिरात जैन धर्माचे बाविसावे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांची मूर्ती आहे. येथे परिसरात एक कीर्तिस्तंभ आहे. हा कीर्तिस्तंभ मेवाडचा सुप्रसिद्ध राजा राणा कुंभ याने (1433 ते 1468) बनवला आहे. मंदिराचे नक्षीकाम आणि सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
3. अचलगड किल्ला: Achalgad Fort:
अचलगड किल्ला दिलवाडा मंदिर [Dilwara Mandir] पासून 14 किलोमीटर अंतरावर अरवली पर्वत शिखरावर आहे. हा एक दुर्मिळ किल्ला असला तरी या किल्ल्याला सुद्धा एक इतिहास आहे. इ.स नवव्या- दहाव्या शतकात महाराष्ट्र, गुजरात राजस्थान प्रदेशात परमार घराण्याची सत्ता होती. याच घराण्यातील राजांनी सिरोही गावाजवळच हा अचलगड किल्ला इ.स. 910 च्या दरम्यान बांधला होता. परमार घराण्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी आणि सत्ता वर्चस्वासाठी हा अचलगड बांधला होता.
इ.स. आठव्या शतकात मेवाडचे राजघराणे उदयास आले. या राजघराण्याने आपली सत्ता विस्तारण्यासाठी राजधानीचे ठिकाण चित्तोडला आणले. चित्तोडचा कर्तबगार राजा राणा कुंभा याने (इ स 1433 से इ.स. 1468) चित्तोडगडाची पुनर्बांधणी केलीच. त्याचबरोबर अचलगड पुनर्स्थापित केला. हा अचलगड पाहून पुढे माउंट अबूला आता येते.
4. नक्की झील [Nakki Lake]
राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील माउंट अबूच्या परिसरात राजस्थान मधील सर्वांत उंच ठिकाणी असलेले हे सरोवर नैसर्गिकरीत्या तयार झालेले आहे हे नक्की झील पर्यटकांचे आवडते सरोवर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. येथे बोटिंगची [ Boating) सोय असल्याने अनेक पर्यटक नक्की झीलमध्ये Boating चा आनंद लुटतात. सिरोही या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 84 किलोमीटर अंतरापर नक्की झील आहे. नक्की झीलला सूर्यास्त पॉईट [Sunset Point] असेही म्हणतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी अनेक पर्यटक सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेतात. सूर्यास्ताच्या वेळी निसर्गाचे बदलणारे चित्र आपल्याला कॅमेरात कैद करता येते. कोणी तरी पूर्वजांनी नखांनी खोदून हे सरोवर निर्माण केल्याची दंत कथा ऐकिवात आहे. पण हे विश्वासार्ह वाटत नाही. हे झील नैसर्गिक रीत्याच तयार झाले आहे. येथे संगमरवरी दगडापासून बनवलेल्या खूप सुंदर सुंदर सूर्ती मिळतात.
5. अचलेश्वर महादेव मंदिर: Mahadev Temple, Mount Abu
माउंट अबू पासून 11 किलोमीटर अंतरापर हे शिव मंदिर [Shiv Mandir] आहे. अचलगडा शेजारीच अचलेश्वर पर्वत रांगेत हे शिवमंदिर आहे. भगवान शिव हे भारतीय संस्कृतीतील महान पात्र असून भगवान शिवने सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावली होती. म्हणूनच संपूर्ण भारतात सर्वात जास्त मंदिरे त्यांचीच आहेत.
या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच दोन्ही बाजूला दोन नंदी आहेत. हे नंदी आपल्या स्वागतासाठी आहेत. मंदिरात गेल्यावर पितळी भव्य नंदी गर्भगृहाकडे तोंड करून बसलेला दिसतो .हा मंदिर पंच धातूचा आहे असे मानले जाते.
6) ब्रह्मकुमारी आश्रम, माउंट अबू : Brahma Kumaris, Mount Abu
माउंट अबू परिसर निसर्गाने जसा नटलेला आहे, तसाच तो शुद्ध हवा आणि शांततामय परिसरासाठी लोकप्रिय आहे. येथील रमणीय वातावरणामुळे शिव मंदिर, जैन मंदिर, ब्राह्मकुमारी आश्रय येथे पाहायला मिळतात. माउंट अबू पासून ब्राह्मकुमारी आश्रम (Brahma Kumaris Peace Place) 32 किलोमीटर अंतरावर आहे.
ब्रह्य कुमारीची दीक्षा कोणीही विवाहित, अविवाहित घेऊ शकतात. पण दीक्षा घेतल्यानंतर अखंड ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. मांसाहार वर्ज्य करावा लागतो. कांदा, लसूण टाळावा लागतात.
ब्रह्मकुमारी पंथामध्ये श्रीकृष्णाने कलियुगाच्या प्रारंभाला शंख वाजवून अर्जुनाला गीता तत्त्वज्ञान सांगितले होते. हेच तत्त्वज्ञान ब्रह्मचारी आश्रमात सांगितले जाते.