नाशिक- पंचवटी:Panchavati Nashik

रामायण काळातील श्री रामाचा वनवास आणि Panchavati Nashik निकटचा संबंध आहे.रामाच्या राज्याभिषेकाच्या आद‌ल्या दिवशी कैकयीने दशरथ राजाकडे तीन वर मागितले आणि रामाच्या राज्याभिषेकावर पाणी पडले. कैकयीच्या वचन पूर्तीसाठी रामाला 14 वर्षे वनवास भोगावा लागला. वनवासातून फिरत फिरत राम, लक्ष्मण, सीता पंचवटीला आलेत आणि येथेच काही दिवस राहिले. येथूनच रावणाने सीतेचे हरण केले. त्याच पंचवटी-नाशिकची आपण माहिती घेणार आहोत.

नाशिकमध्ये पाहण्यासारखे काय आहे? What is there to see in Nashik ?

महाराष्ट्र राज्यातील नाशिक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. या नाशिकमध्ये आणि नाशिक शहराच्या परिसरात पाहण्यासारखी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत. ती पुढील प्रमाणे –

(1) काळाराम मंदिर Kalaram Mandir

(2) पंचवटी Panchavati

(३) मुक्तिधाम Muktidham.

(5) तपोवन Tapovan

(5) सीता गुफा Seeta cave

(6) गोदावरी नदी काठ Gadavari bank

(2) रामकुंड Ramkund

(8) सोमेश्वर मंदिर.Someshwar Mandir

नाशिकला कसे जायचे ?How to go to see Nashik?

* मुंबईतून नाशिक 166 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईतून बसने नाशिकला जाता येते.

* कोपरगावहून नाशिक 90 किलोमीटर अंतरावर आहे.

* त्र्यंबकेश्वर ते नाशिक 36 किलोमीटर अंतर आहे.

* शिर्डीपासून नाशिक 94 किलोमीटर आहे.

* मालेगावहून नाशिक 104 किलोमीटर आहे.

* संगमनेरहून नाशिक 68 किलोमीटर आहे.

यांपैकी तुम्ही ज्या शहरात असाल. त्या शहरातून नाशिकला जाता येईल.

पंचवटी: Panchvati, Nashik

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरालगतच पंचवटी हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाण आहे. पंचवटी म्हणजे पाच वटांचा समूह. वट म्हणजे वड. या ठिकाणी पाच वड मिळून एकच महावृक्ष म्हणजे वटवृक्ष झाला आहे. म्हणूनच या ठिकाणाला पंचवटी असे म्हटले आहे. रामायण काळात सुद्धा या ठिकाणाला पंचवटी असेच संबोधले जायचे. म्हणजे त्यावेळी याच वडांच्या समुहाचा एक मोठा वटवृक्ष बनला , असा त्याचा अर्थ आहे. वडाच्या झाडाचे आयुष्य एक हजार ते दीड हजार वर्षे गृहीत धरले तर सध्या पंचवटीत अस्तित्वात असलेले वटवृक्ष रामायण कालीन असण्याची शक्यता नाही. वटवृक्षांचा आणखी एक गुणधर्म आहे, तो म्हणजे वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकतात. मुळे जमिनीत खोलवर रुजतात आणि त्यापासून अंकूर फुटून नवीन वटवृक्ष तयार होतो. यामुळे मूळ वटवृक्ष जरी मृत झाला , तरी त्यापासून नवीन वृक्ष तयार होतात.

पैठण एक पर्यटन स्थळ. Paithan

अयोध्येचा राजा सम्राट चक्रवर्ती अणि तत्कालीन व्यापारी कुबेर [श्रीलंकेचा राजा] यांच्यात पश्चिम भारतात घनघोर युद्‌ध झाले. कुबेराचा सेनापती रावण होता. कुबेर हा लंकेचा राजा होता. या युद्धात दशरथाचा दारुण पराभव झाला. जखमी अवस्थेत असलेल्या दशरथाला कैकयीने युद्धभूमीवरून

रथात घालून सुरक्षित आणले. या कैकयीच्या कामगिरीबद्दल दशरथाने तीन वर मागायला सांगितले होते. कैकयी वेळ आल्यावर मांगेन असे म्हणाली.

* कैकयीने मागितलेले वर

1) रामाचा राज्याभिषेक थांबवायचा.

2) रामाला 14 वर्षे वनवासात पाठवायचे.

3) दशरथाला युवराज घोषित करून त्याचा राजाभिषेक करायचा.

कैकयीची खास मैत्रीण मंथराने कैकयीला फिथवून हे सर्व करवून घेतले. राम, सीता, लक्ष्मण वनवासात असताना आयोध्येपासून सुमारे 3000 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचवटी येथे फिरत फिरत आले. पंचवटीतच काही काळ राहिले. येथे सुरक्षिततेसाठी गुहा पण आहे. ही गुहा सीतेची गुहा म्हणून प्रसिद्ध आहे.

सीता गुहा: Seeta Cave.

मारिच राक्षसाला मारण्यासाठी राम त्याचा पाठलाग करत पंचवटी पासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी लक्ष्मण पण गेला. सीता एकटीच गुहेत होती. त्याच वेळी लंकेचा राजा रावण तेथे आला. त्याला लक्ष्मण रेखा ओलांडता आली नाही. म्हणून त्याने सीतेला बाहेर येऊन भिक्षा द्यायला भाग पाडले.साधूच्या वेशातील रावणाच्या जाळ्यात सीता अडकली.

या घटनेपूर्वी रावणाची बहीण तेथे आली होती. तिचे नाव शूर्पनखा होते. तिने लक्ष्मणाला लग्नाची मागणी घातली होती. लक्ष्मणाने चिडून जाऊन तिचे नाक कापले आणि लग्नास नकार दिला. शूर्पनखेने लंकेस जाऊन आक्रोश केल्यामुळे रावणाने आपल्या बहिणीचा बद‌ला घेण्यासाठीच सीतेला पळवून नेले होते.

सीतेला पळवून नेताना नागा वंशीय जटायू हा रामाचा मित्र होता. त्याने रावणाला विरोध केला. घनघोर युद्ध झाले. या युद्धात जटायू अखमी झाला. जटायूला त्याच अवस्थेत टाकून रावण पुष्पक यानातून निघून गेला. जटायुनेच राम, लक्ष्मणाला घडलेली सर्प हकीकत संगिताली आणि प्राण सोडला.

वेडीवा‌कडी वळणे असलेली ही सीता गुहा (Seeta cave) खूप लांब आणि सुरक्षित आहे. आजही ही गुहा आपल्याला पाहता येते. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वास्तव्यामुळे आणि सीताहरण या घटनेमुळे पंचवटीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही पंचवटी एकदा पाहावी. येथील गुहा पाहावी अशीच आहे.

काळाराम मंदिर नाशिक: Kalaram Mandir Nashik

राम, सीता आणि लक्ष्मण यांचे पंचवटी आणि नाशिक परिसरात वनवास काळात वास्तव्य होते. म्हणूनच या ठिकाणी राजा रामाचे मंदिर बांधलेले आहे. राम हा रंगाने काळा होता. म्हणूनच या मंदिराला काळाराम मंदिर असे म्हणतात. सध्या जे मंदिर अस्तित्वात आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी जुने मंदिर होते. याच ठिकाणी नवीन मंदिर इ.स. 1782 साली बांधले आहे. ‘सरदार रंगराव ओढेकर यांच्या पुढाकाराने हे काळाराम मंदिर उभारलेले आहे. हे मंदिर उभारण्यासाठी 2000 कारागीर 12 वर्षे कष्ट करत होते. 245 फूट लांब व 145 फूट रुंद असलेल्या मंदिरात २ फूट उंचीची रामाची मूर्ती. आहे. या मंदिरात सीता, लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे काळाराम मंदिर कलाकुसर केलेले आणि मजबूत आहे.

काळाराम मंदिर आणि सत्याग्रह: Kalaram Tample and Satyagrah

स्वातंत्र्य पूर्व काळात काळाराम काही लोकांना अस्पृश्य समजले जाई आणि त्यांना मंदिर प्रवेशासाठी नाकारले जाई. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरावर मोर्चा काढला. त्यांच्या सोबत दादासाहेब गायकवाड हेही नेतृत्व करत होते. सुमारे 15000 अनुयायांसह डॉ आंबडेकर, दादासाहेब गायकवाड यांनी आंदोलकांसोबत काळाराम मंदिरात प्रवेश केला. या दिवसापासून काळाराम मंदिर सर्वासाठी खुले करण्यात आले.

मुक्तिधाम मंदिर, नाशिक: Muktidham Mandir, Nashik:

नाशिकमध्ये असलेले आणखी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे मुक्तिधाम मंदिर होय. काळाराम मंदिर पासून जवळच असलेले हे मंदिर 1971 च्या कुंभमेळ्या निमित्त बांधलेले आहे.

नाशिकच्या मुक्तिधाम मंदिराचे बांध‌काम संगमरवरी दगडात केले असून भिंतींवर ‘गीते’ चे अठरा अध्याय कोरलेले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतीही येथे पाहायला मिळतात.

कुंभमेळा : नाशिक: Kumbh Mela, Nashik:

भारतात दर बारा वर्षानी चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर) आणि हरिद्वार या ठिकाणी कुंभ मेळे भरतात. एका ठिकाणी कुंभमेळा भरायला बारा वर्षे लागतातः म्हणजे दर तीन वषींनी कुंभमेळा येतो आणि रोटेशन प्रमाणे मेळ्याचे ठिकाण बदलत राहतो.

नाशिकच्या मुक्तिधाम मंदिराचे बांध‌काम संगमरवरी दगडात केले असून भिंतींवर ‘गीते’ चे अठरा अध्याय कोरलेले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतीही येथे पाहायला मिळतात.

रामकुंड: नाशिक Ramkund, Nashik:

रामकुंड हा गोरावरी नदीपात्रात नाशिक शहरात असून हा रामकुंड सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव यांनी 1696 मध्ये बांधलेला आहे. राजा राम येथे स्नान करत होता. त्यामुळे हा कुंड पवित्र मानला जातो.

रामाचा वंश/कुळ : Ram’s kul:

राजा राम हा रघुकुळातील मानला जातो. इक्ष्वाकु वंशीय राम आहे. असे अमीश या प्रसिद्ध पुराणकथा लेखकाचे मत आहे.

Leave a comment