पुणे तिथे काही नाही उणे. अशी या शहराबाबतीत एक प्रसिद्ध म्हण आहे. पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. पुण्याला शिक्षणाची पंढरी असे म्हटले जाते. सध्या पुण्याला उद्योगाची नगरी असे म्हटले जाते. पुण्यात अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.या स्थळांना भेट दिल्यानंतर इतिहासाच्या पाऊलखुणा उमगतात. इतिहासाची आणि परंपरांची जाण येते. असेच एक पुण्यातील ऐतिहासिक स्थळ म्हणजे Shaniwar wada होय. या शनिवार वाड्याची आपण माहिती घेणार आहोत.
शनिवारवाडा कोठे आहे? Where is Shaniwar Wada?
शनिवार वाडा पुण्यात आहे. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणात आहे. आज जेथे शनिवारवाडा आहे, ते जुने पुणे होय. शनिवार वाडा बांधला त्यावेळी पुण्याला कसबा पुणे असे नाव होते. इ. स. आठव्या शतकात पुण्याचे नाव पुन्नक असे होते; तर दहाव्या शतकापासून पुण्याला ‘पुनवडी’ असे नाव पडले. शिव काळात कसबा पुणे असे झाले. इंग्रज काळात पुणा झाले. आता पुणे आहे. याच पुण्यातील शनिवार पेठेत शनिवार वाडा आहे.
शनिवार वाडा पाहायला कसे जायचे ? How to go see Shaniwar wada ?
1. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकापासून शनिवार वाडा जवळच आहे. स्वारगेट ते शनिवारवाडा 2.5 किलोमीटर अंतर आहे. स्वारगेट पासून चालत, रिक्षाने, कॅबने जाता येते.
2. कात्रज बस स्थानकापासून शनिवार वाडा 9 किलोमीटर अंतरावर आहे. कात्रजहून बसने स्वारगेट पर्यंत आणि पुढे रिक्षा किंवा कॅबने जाता येते.
3. पिंपरी चिंचवडहून 15 किलोमीटर अंतरावर शनिवार वाडा आहे.
4. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून शनिवार वाडा 11 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने (City Bus), कॅबने, रिक्षाने शनिवार वाड पाहायला जाता येते.
5. तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर शनिवार वाड्याला सर्वांत जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे शिवाजी नगर रेल्वे स्टेशन होय. शिवाजी नगर (Shivaji Nagar) रेल्वे स्टेशन पासून शनिवार वाडा (Shaniwar wada) अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे.
शनिवार वाडा कोणी बांधला ? Who built Shaniwar wada?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर राणी येसूबाई व पुत्र शाहू औरंगजेबच्या नजर कैदेत होते. इकडे महाराणी ताराबाईनी आपला स्वराज्याचा लढा चालूच ठेवला होता. औरंगजेब मृत्युनंतर त्याच्या पुत्राने-दारा शुकोह याने शाहू व येसूबाईना सोडून दिले. स्वराज्यात कलह निर्माण व्हावा, हा दाराचा मूळ हेतू होता. तसेच घडले. पेशवा बाळाजी विश्वनाथ याने शाहूला साथ दिली आणि शाहू विरुद्ध ताराराणी असा सामना सुरु झाला. यांत राज्याची विभागणी झाली. दोन गाद्या निर्माण झाल्या. शाहू स्वभावाने सौम्य असल्यामुळेच बाळाजी विश्वनाथची सातारच्या गादीवर पकड निर्माण झाली. पुढे हळूहळू पेशवाईने आपले बस्तान पुण्यात बसवले आणि पुण्यातूनच राज्यकारभार करायला सुरुवात केली. इ.स. 1713 मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ मराठा साम्राज्याचे पहिले पंतप्रधान झाले.
2 एप्रिल 1720 रोजी पेशवा बाळाजी विश्वनाथचा मृत्यू झाला आणि त्याचा पुत्र बाजीराव वयाच्या 19 व्या वर्षी मराठ्यांच्या गादीचा पंतप्रधान झाला. याला पहिला बाजीराव किंवा बाजीराव बल्लाळ किंवा थोरले बाजीराव असे म्हणतात. पेशवा पहिला बाजीराव हा 20 वर्ष मराठी सत्तेचा पंतप्रधान होता. बाळाजी विश्वनाथने हळूहळू स्वतंत्र कारभार करायला सुरुवात केली होती. छत्रपती नाममात्र राहिले होते. बाजीरावच्या काळात तर मराठ्यांची सत्ता पेशवाई भोवतीच फिरु लागली. छत्रपती नामधारी प्रमुख राहिले. सर्व कारभार पुण्यातूनच होऊ लागला
पहिला बाजीराव पेशवा याने पुण्यात राज्यकारभाराच्या सोयीसाठी 1736 मध्ये 13 खोल्यांचा भव्य वाडा बांधला. या वाड्याचे विशेष म्हणजे या वाड्याच्या बांधकामाचा शुभारंभ झाला तो वार शनिवार होता. या शनिवार वाड्यात प्रवेश झाला तो वार सुद्धा शनिवार होता.त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले. सध्या वाडा ज्या परिसरात आहे, त्या परिसराचे मूळ नाव कसबा पुणे होते. याचे कसबा पेठ झाले. आता हा परीसर कसबा पेठ किंवा शनिवार पेठ या नावाने ओळखला जातो. पहिला बाजीराव पेशवाने या शनिवार वाडयातून 4 वर्षे राज्यकारभार केला इ.स. 1740 मध्ये पहिला बाजीराव पेशव्याचा मृत्यू झाला.
शनिवार वाड्याचे बांधकाम आणि रचना: Construction and Design of Shaniwar wada:
पहिला बाजीराव पेशव्याने छत्रपती शाहू यांची आज्ञा (हुकुम) घेऊनच इ.स. 1736 मध्ये शनिवार वाडा बांधला. सध्या शनिवार वाड्याजवळ गेल्यावर भव्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराला लागूनच दोन्ही बाजूला संरक्षक भिंत दिसते. ही संरक्षक भिंत आजही मजबूत स्थितीत आहे.
प्रवेश द्वाराला बसवलेल्या विशाल लाकडी दरवाजाला भले मोठे मोठे खिळे ठोकलेले आहेत. दरवाजा लाकडी आहे. त्यावर मजबूत लोखंडी पत्रा मारुन एक ते दीड इंच जाडीचे टोकदार खिळे ठोकलेले आहेत. या दरवाजाचे नाव दिल्ली दरवाजा [Delhi Darawaja] असे नाव आहे. हा मुख्य दरवाजा होय. या दरवाजाची उंची 21 फूट आणि रुंदी 14 फूट आहे. या दरवाजासाठी वापरलेल्या लाकडाच्या फळीची रुंदी 8 ते 9 इंच आहे. या दिल्ली दरवाजाच्या समोरच पहिला बाजीराव पेशव्याचा घोड्यावरील पुतळा आहे. येथे संरक्षक भिंत आणि काही बुरुज आजही पाहायला मिळतात.
संरक्षक भिंतीला एकूण पाच दरवाजे आहेत. त्यांची नावे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, गणेश (रंगमहाल) दरवाजा, नाटक शाळा अशी या दरवाजांची नावे आहेत. यांतील दिल्ली दरवाजावर नगारखाना आहे.
गणेश रंग महाल – Ganesh Mahal.
शनिवार वाड्यातच वेळोवेळी बांधकामे झालेली आहेत. या वाड्यातच नानासाहेब पेशव्यांनी गणेश महाल बांधला आहे. या महालात गणेश मूर्ती आहे. या महालाला रंग महाल असेही नाव आहे. येथे एका वेळी 100 नर्तकी नृत्य करण्याची सोय होती.
मस्तानी वाडा: Mastani Mahal:
शनिवार वाड्याला लागूनच पहिला बाजीराव पेशव्याने मस्तानी महाल बांधला होता. इ. स. 1729 मध्ये बुदेलखंडच्या लढाईत राजा छत्रसालचा पराभव झाला. पराभवानंतर छत्रसालने आपली अनौरस मुलगी बाजीरावाला दान केली.बाजीरावाने ती रखेली म्हणून ठेवली आणि तिच्यासाठी वाडा बांधला हाच तो मस्तानीचा वाडा.
शनिवार वाड्याचा इतिहास : History Of Shaniwar wada.
छत्रपती शाहू आणि महाराणी ताराबाई यांच्यात वारणा येथे तह झाला आणि स्वराज्याचे दोन भाग पडले.सातारच्या गादीवर पेशव्यांनी आपली निष्ठा दाखवली. काही काळातच पेशव्यांचे सत्ता केंद्र पुणे बनले. पहिला बाजाराव पेशवा उर्फ थोरले बाजीराव याने आपल्या कारकीर्दीत (1720 ते 1740) राज्यकारभाराच्या सोयीसाठी इ.स. 1736 मध्ये पुण्यात एक भव्य वाडा बांधून घेतला. या वाड्याच्या बांधकामाचा शुभारंग शनिवारी झाला आणि प्रवेश सुद्धा शनिवारीच झाला. त्यामुळेच या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले. बाजीरावाने या वाड्यात चार वर्षे राज्यकारभार केला आणि त्याचा मृत्यू 28 एप्रिल 1740 रोजी झाला.
बाजीरावाचा मृत्यू झाल्यानंतर रघुनाथरावची इच्छा पेशवे पदावर होती; पण सातारच्या छत्रपती शाहूंनी रघुनाथरावाच्या विरोधाला न जुमानता 25 जून 1740 मध्ये बाजीराव पुत्र बाळाजी बाजीरावाला पेशवे पदाची वस्त्रे दिली. 1740 पासून पुण्याच्या शनिवारवाड्यातून पेशवा म्हणून बाळाजी बाजीराव राज्यकारभार पाहू लागला. याच काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. मराठ्यांचे साम्राज्य विस्तार वाढला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याच्या काळातच पानिपतची तिसरी लढाई (1761) झाली. त्यात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. याचा धसका घेऊन नानासाहेब पेशवेचा मृत्यू झाला. नानावाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र थोरले माधवराव पेशवे पेशवा झाला. 20 जुलै 1661 ते 18 नोव्हेंबर 1772 पर्यंत त्याने पेशवाईचा कारभार पुण्याच्या शनिवारवाडातून पाहिला.
नारायणराव पेशव्याचा मृत्यू: Death of Narayan Peshwa
नानासाहेब पेशव्याचा दुसरा मुलगा माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर पंतप्रधान पदाच्या गादीवर बसला. नारायणराव पेशवा अल्पकाळ पंतप्रधान होता.30 ऑगस्ट 1773 मध्ये नारायणरावांचा शनिवार वाड्यातच गारद्यांकरवी रघुनाथ रावाने खून केला आणि शनिवार वाडा रक्त रंजित झाला. त्यानंतर रघुनाथ रावाने पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली, पण त्याच्यावर नारायण रावाच्या खुनाचा ठपका ठेवल्यामुळे पेशवेपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर नारायराव पेशव्याचा मुलगा सवाई माधवरावाला लहान वयातच पेशवे पदाच्या गादीवर बसवले, त्याने 1795 पर्यंत पेशवे पदाचा राज्यकारभार शनिवार वाड्यातुन केला. त्याच्या काळात मराठ्यांनी (महादजी शिंदे) दिल्ली काबीज केली. या शनिवार वाडयाच्या साक्षीने खूप मोठा इतिहास घडला
आहे. सवाई माधवरावाचा मृत्यू शनिवार वाड्यातच झाला.
सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पेशवाईच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठा शाहीची उतरती कळा लागली. महादजी शिंदेच्या मृत्यूनंतर मराठेशाहीचा जरब राहिला नाही.
इंग्रजांनी 1818 साली पेशवाई बरखास्त केली .आणि पुण्याचा शनिवार वाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला.
27 फेब्रुवारी 1828 रोजी राजवाड्याला म्हणजे शनिवारवाड्याला मोठी आग लागल्यामुळे सुमारे 92 वर्षांच्या इतिहासाच्या या साक्षीदाराचे काहीच अवशेष शिल्लक राहिले. ते आजही आपलाला एक पाहायला मिळतात.
छान माहिती
Thanks