जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – George Washington Carver

जगाच्या पाठीवर अशी काही माणसे असतात, की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेले असते. त्यांचा सर्व प्रवास अफलातून असतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ. त्यांचाही जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जीवन कार्याबद्दल ‌ आपण अधिक माहिती घेणार आहोत.

जन्म आणि बालपण: Carver’s Birth and Childhood:

जे मूल बालपणी कधीच खेळले नाही. बागडले नाही, खोपटात जन्माला आले. खोपटातच वाढले आणि भविष्यात ते शास्त्रज्ञ बनले. अठराव्या – एकोणीसाव्या शतकात अमेरिकेत गुलामगिरी जोमाने फोफावली होती. 1860 च्या दरम्यान मोझेस कार्व्हर आणि सूझनबाई या शेतकरी जोडप्यानं मेरी आणि तिच्या तीन मुलांना 700 डॉलर्स देऊन विकत घेतले होते. मोझेस आणि सूझन या जर्मन जोडप्यांना गुलामगिरी मान्य नव्हती; पण शेतातील कामासाठी मदत मिळावी या हेतूने लांनी मेरीला विकत घेतले. त्यांनी मेरी आणि तिच्या तीन मुलांना आपल्या राहत्या घरा शेजारीच घर बांधून दिले. हे जोडपे मेरी आणि तिच्या मुलांशी प्रेमाने वागत.

त्यावेळी गुलामांना पळवून नेणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात फोफावल्या होत्या.अचानक एक टोळी आली आणि मेरी आणि तिच्या मुलांना पळवून नेले. शेवटी टोळीकडून दोन महिन्यांचा अपंग मुलगा म्हणजे कार्व्हरला परत मिळवण्यासाठी त्यांना शेताचा तुकडा विकावा लागला. मेरी आणि तिची एक मुलगी आणि मुलगा यांना त्यांनी सोडले नाही.

सुझनबाईनी मोठ्या कष्टाने त्या अपंग, निर्जीव मुलाचे पालन-पोषण केलं. डायमंड ग्रोव्ह आणि ओझार्कच्या टेकड्या पाहत, फुलझाडे न्याहाळत ते अपंग बाळ दहा वर्षाचं झाले. मोझेस आणि सूझन यांनी त्याचं नाव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन असे ठेवले. पुढे शाळेत नाव घालताना आपले आडनाव लावले. मग’ या मुलाचे पूर्ण नाव जॉर्ज वॉशिंग्टन काव्हर [George Washinton Carver असे ठेवले. त्याच नावानं हे अनाथ पोर वाढू लागले.मोझेस आणि सूझनने या छोट्या मुलासाठी जे काही केले. त्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. लवकरच हा जॉर्ज त्या परिसरात छोटा माळी [Little. Gardener] या नावाने सर्व परिचित झाला.

हा छोटा माळी सुझनबाईला नाना प्रश्न विचारत होता. आपली चौकस बुद्धी त्याला गप्प बसू देत नव्हती. कार्व्हरची बाग बघायला आजूबाजूचे लोक येत असत. आपल्या बागेतील झाडांना झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी या छोट्या माळ्याला ते घेऊन जात असत.

जॉर्जचा शाळेत प्रवेश: George Carver’s Admission in School

जॉर्ज कार्व्हर जेथे राहत होता, त्या घरात शेजारील म्यूलरबाई अधून मधून यायच्या .त्या कार्व्हर प्रेमाने वागायच्या त्यांनी जॉर्जला एक दिवस अंकलिपी दिली आणि येथूनच जॉर्जला शाळेत जायची गोडी लागली. स्विस शेती तज्ज्ञ वायगर हे द्राक्षाच्या बागा करत असत. ते नेहमी कामात मग्न असायचे .तेही एकदा असेच द्राक्षाचे मार्गदर्शन करण्यासाठी मोझेसच्या घरी आले होते. ते या छोट्या माळ्याला असलेल्या ज्ञानाबाबत एकदम खूश झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनातून जॉर्जने मोझेसच्या शेतात द्राक्षाची बाग फुलवली होती.

एकदा मोझेस बैलगाड्यातून जॉर्जला शाळेत नाव घालण्यासाठी घेऊन गेले. शाळा खूप दूर होती. त्यावेळी निग्रोंनी फक्त निग्रो शाळेतच शिकायचे, असे होते. थोड्या वेळाने ते दोघे वायगरच्या घरी पोहोचले.तेथे खूप गप्पा झाल्या. वायगरने जॉर्जला एक पुस्तक भेट दिले. आणि ते दोघे घरी परतले. घरी आल्यावर मोझेसने जॉर्जला विचारले,वायगरच्या

गावात (नीओशो) एक निग्रो शाळा आहे. तू तेथे शिकशील का? जॉर्ज त्या शाळेत जायला तयार झाला. दुसर्‍याच दिवशी जॉर्ज एकटाच चालत नीओशो’ ला गेला. तेथून पुढचा प्रवास त्याला एकट्यालाच करायचा होता. जिमने (मोठ्या भावाने) विरोध केला होता; पण जॉर्ज नाही थांबला. रात्री उशिरा कार्व्हर नीओशोत पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी त्याने शाळेत प्रवेश केला. हा त्याच्या आयुष्यातील शाळेतला पहिला दिवस होता. या ठिकाणी जॉर्जने एका पडक्या गोठ्यात राहून दिवस काढले. पोटापाण्यासाठी काम करायचे आणि शाळा शिकायची, असा जॉर्जचा नित्यक्रम होता.

जॉर्ज ज्या गोठ्यात राहत होता, तो गोठा एका मार्टिन कुटुंबाचा होता. त्यांनी त्याला घरी नेले आणि मार्टिन कुटुंबाची कामं करत जॉर्ज शाळेत शिकू लागला.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे मोझेस कुटुंब आणि शाळेच्या पहिल्याच टप्प्यात आधार देणारे मार्टिन कुटुंब यांनी जो आधार दिला, त्याची तुलना करता येत नव्हती. एकदा मार्टिनबाईंना ताप आला होता. तर कार्व्हर तिच्या उशाशी बसून राहिला. मार्टिन बाई बऱ्या झाल्या. मगच तो शाळेत गेला. त्याने मार्टिन बाईंची आजारपणात प्रामाणिकपणे सेवा केली होती. यथाकाळ मार्टिन कुटुंब स्थलांतरित झालं आणि जॉर्जचा पुढचा प्रवास सुरु झाला.

मिसाईल मॅन-अब्दुल कलाम / Apj Abdul kalam

कॅझन्स शाळेत प्रवेश: Carver’s admission in Gazans free state.

कॅझन्सच्या मुक्त शाळेत जॉर्जचे पुढील शिक्षण सुरु झाले. या मुक्त शाळेतच कार्व्हरच्या चित्रकलेचा विकास झाला. याच शाळेत तो मॅट्रिकची परीक्षा पास झाला.आणि आपल्याला जीवदान देणाऱ्या मोझेस कुटुंबियांना भेट‌ण्यासाठी गेला तेथे काही दिवस थांबला आणि पुढच्या प्रवासासाठी लागला. एक दिवस जॉर्ज कार्व्हरला हायलँड युनिव्हर्सिटीत [Highland University) प्रवेश मिळाल्याचा कॉल आला आणि कार्व्हर हरखून गेला.

पण तेथे गेल्यावर एक निग्रो म्हणून प्रवेश नाकारला.

उच्च शिक्षण: Carver’s Higher Education:

कार्व्हरने पुढे सिप्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि या कॉलेजात त्याने वनस्पतीशास्त्र, भूमिती, रसायन, प्राणिशास्त्र अशा विविध विज्ञान शाखांचा अभ्यास केला. त्याला रसायन शास्त्राची विशेष गोडी लागली.गाण्याची, चित्रकलेची ओढ जपत त्याने आपले शिक्षण चालू ठेवले.

1894 साली जॉर्ज कार्व्हरला आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पद‌वी मिळाली. आयोवातील सर्वात बुद्‌धिमान
मुलगा अशी त्याची ओळख झाली होती. पद‌व्युत्तर अभ्यासक्रमासाठी जॉर्ज कार्व्हरने मायकॉलॉजी (Mycology) म्हणजे कवकशास्त्र हा विषय निवडला. या विषयाच्या अभ्यासासाठी त्याने 20000 नमुने गोळा केले होते. त्याच्या या संशोधनात्मक चिकाटीचा सर्वत्र गवगवा निर्माण झाला. 1896 साली कार्व्हरने Agricultural and Bacterial Botany या विषयाची उच्च पद्‌वी (MS.) संपादन केली.

उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्व्हरने आता वैयक्तिक विकास सोडून दिला आणि आपल्या निग्रो बांधवांसाठी काहीतरी करण्यासाठी ॲलाबॅमा राज्यातील टस्कीगी कॉलेजमध्ये निग्रो विद्यार्थी शिकत होते. त्यांच्यासाठी प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी कार्व्हरचा प्रवास ॲलाबॅमा राज्याच्या दिशेने सुरू झाला. 8 ऑक्टोबर 1896 मध्ये कार्व्हर टस्कीगी कॉलेजवर उतरले. आणि त्याच्या नवीन कार्याला सुरुवात झाली.

कार्व्हरचे अध्यापन आणि संशोधन: Carver’s Teaching and Amendment/Discovery!

टस्कीगी कॉलेजात अध्यापन करत असताना यांनी मुलांना कृतियुक्त शिक्षणावर भर दिला. ते मुलांना नेहमी सांगत —-

“जो निसर्गाच्या प्रेमात पडतो त्याच्याशी निसर्ग गुजगोष्टी करतो”

अध्यापन चालू असताना त्यांचे संशोधनाचे (amendment) काम चालूच होते. कार्व्हर एकदा रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावर चिखल उडाला. तो जिथे उडाला त्या ठिकाणी कपड्यावर निळ्या रंगाचा डाग पडला. कार्व्हरचे लगेच संशोधन चालू झाले.त्याने त्या चिखलापासून निळा रंग बनवला आणि तेथील एक चर्च निळ्या रंगाने रंगवले.

मग कार्व्हर शेतीविषयक संशोधन करू लागला. शेतामध्ये आलटूनपालटून पीक घेतले तर उत्पादन वाढते ,हे त्याने प्रयोगाने
रताळे आणि कपाशीची पिके घेऊन सिद्ध केले. त्यामुळे शेतकरी खूश झालेत.पुढे त्यांनी अनेक प्रयोग केलेत. कापसाच्या बुंध्यांपासून
कागद, दोरखंड, घोंगडी बनवली. चिनी मातीपासून भांडी बनवली.

1899 साली कार्व्हरने फिरते कृषी वि‌द्यालय निर्माण केले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर शेतीची माहिती मिळू लागली. त्यावेळी टोमॅटो विषारी पदार्थ समजला जाई. त्यांनी टोमॅटोची लागवड करून त्यापासून 115 खाद्य पदार्थ बनवले. भुईमुगाचे प्रचंड उत्पादन झाल्यामुळे त्याचे काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. कार्व्हरने भुईमूगाच्या शेंगदाण्यापासून 105 खाद्‌यपदार्थ व इतर उपयुक्त पदार्थ बनवून शेतक-यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील बाजारपेठ निर्माण करून दिली.

पुढे कार्व्हरची ख्याती संपूर्ण अमेरिकेत, इंग्लंडमध्ये पसरली. त्यांना सरकारची अनेक मानांकने मिळाली. अनेक ठिकाणी सन्मानित सदस्यपद मिळाले.

आयुष्याच्या सर्वोच्च शिखरावर असताना कार्व्हर उपकारकर्त्यांना विसरला नव्हता. एक दिवस सवड काढून तो मोझेस बाबा आणि सुझनबाईंना भेटायला आला. त्यावेळी सुझनबाई हयात नव्हत्या.
त्यांनीच कार्व्हरला जगवले होतं. कार्व्हरला पाहून मोझेसबाबांचे डोळे पाणावले. ते सुखावले!

5 जानेवारी 1943 रोजी कार्व्हरचा मृत्यू झाला. कार्व्हरचा प्रवास वाचून तुम्ही सु‌द्धा थक्क व्हाल.!

मनावर परी कीर्तिरूपी उरावे!

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. Lal Mahal Pune
  2. Shaniwar wada Pune

Leave a comment