शिमला: Shimala

अखंड भारताचे वैभव म्हणजे हिमालय. जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ज्याची ओळख आहे, ते माउंट एव्हरेस्ट शिखर याच हिमालयात आहे. या भव्य आणि दिव्य हिमालयाच्या पर्वत रांगेत वसलेले भारताचे छोटेसे शहर म्हणजे Shimala होय. प्रचंड सृष्टिसौंदर्य आणि थंडगार हवेच्या जोडीला स्वच्छ, पारदर्शक पाणी आपल्याला सिमला या ठिकाणी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्यामुळे मनःशांती मिळते.
आनंद मिळतो. नवचैतन्य प्राप्त होते. म्हणूनच आपण थंड हवेच्या ठिकाणी आणि निसर्गाच्या सानिध्यात जातो. निसर्गाशी हितगुज करतो आणि निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटतो.सिमला हे असेच निसर्ग संपन्न ठिकाण आहे. त्या ठिकाणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया.

सिमल्याची संक्षिप्त माहिती: Brief Information about Shimala:

ठिकाणाचे नाव : शिमला.

अर्थ: निळे घर.

जिल्हा: शिमला / सिमला

राज्य : हिमाचल प्रदेश

समुद्र सपाटीपासून उंची: 2200 मीटर
प्रचि‌द्धी :थंड हवेचे ठिकाण

दिल्लीहून अंतर: 335 किलोमीटर.

कसे जायचे शिमला पाहायला ? How to go to see Shimala?

शिमल्यापासून 22 किलोमीटर अंतरावर जुबरहट्टी येथे विमानतळ आहे. दिल्लीहून जुबरहट्टीला विमानाने जाता येते.परिस्थिती प्रमाण 1000 रुपयांच्या आसपास विमानाचे भाडे असेल.

शिमल्याला रेल्वे स्टेशन आहे. ते शिमला रेल्वे स्टेशन या नावाने ओळखले जाते. दिल्ली, चंदीगड या ठिकाणांहून शिमल्याला रेल्वेने जाता येते.

मुंबईहून दिल्लीला जलद रेल्वेने जाता येते. 8 ते 10 तास लागतात. तेथून शिमल्याला परत रेल्वेने जाता येते.

दिल्ली ते शिमला बस सेवा पण सुरु आहे. बसने पण जाता येते.

मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali

शिमला म्हणजे काय ? Meaning of Shimala.Old name of Shimala.

शिमला या शहराला सिमला असेही म्हणतात. या शहराला पूर्वी शामालया किंवा शामालय असे म्हणत होते. शामालय (Shamalaya) म्हणजे शामा + आलय किंवा शाम + आलय, शाम याचा अर्थ सावळा, निळा या अर्थाने वापरला जातो. म्हणून शामालय म्हणजे निळ्या देवतेचे घर. शामालय म्हणजे निळे घर . असा अर्थ घेतला जातो. ही निळी देवता म्हणजेच काली माता होय. काली माता म्हणजे पार्वतीची बहीण होय.म्हणजेच गणपतीची मावशी.

त्या काळी विशिष्ट वनस्पतीचा रस तारुण्य टिकवण्यासाठी आणि दीर्घायुष्य (300 ते 600 वर्षे) लाभण्यासाठी घेतला जात असे. पार्वतीच्या आई वडिलांनी हे औषध घेतले होते. याचा side effect म्हणून त्यांची एक मुलगी काळी-निळी पडली. तीच ही कालिमाता होय. [तर्क व आधार- लेखक: अमिष] शिमल्यातील बँटोनी टेकडीवर कालिमातेचे मंदिर आहे. याच कालिमतेच्या मंदिरावरून शिमला असे नाव पडले आहे.

शिमला कशासाठी प्रसिद्ध आहे ? What is Shimala famous for?

शिमला Shimala हे भारतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. भारतातील अनेक लोक हौशी पर्यटक शिमल्याला हवा पालटण्यास‌ाटी जातात. शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. हिमाचल म्हणजे हिम+आचल. म्हणजे बर्फाने वस्त्र परिधान केलेले ठिकाण. काश्मीर सारखा येथे मोठ्या प्रमाणात बर्फ पडत नसला तरी हिव्याळ्यात येथे बर्फवृष्टी होते. हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये वसलेले हे हिमाचल प्रदेश आहे. शिमला हा पिकनिक स्पॉट (Picnic spot) असून येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1971 साली युद्ध झाले. या युद्धात पाकिस्तानचा नामुष्कीजनक पराभव झाला. पाकिस्तानचे दोन (पूर्व आणि पश्चिम) तुकडे झाले. बांगला देश नव्याने उद‌यास आला. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाने पाकिस्तानला हरवले होते. सॅम बहादूर या लष्कर प्रमुखाकडे युद्धाची सूत्रे होती. त्याच्या कुशल नेतृत्वाने भारताला विजय मिळवून दिला.या युद्धात पाकिस्तानचे 90000 सैनिक भारताने कैद केले होते.या पाकिस्तानी सैनिकांनी भारतापुढे गुडघे (शरणागती) टेकले होते. त्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंत‌प्रधान झुल्किकार अली भु‌ट्टो यांना भारतात येण्यास भाग पाडले होते.

शिमला करार: Shimala Agreement:

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या 1971 च्या युद्धात पाकिस्तानला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्याने तराकालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना दाती तृण धरून भारतात येण्यास भाग पाडले होते. हा सिमला करार (Shimala agreement) भारतातील थंड हवेचे ठिकाण सिमला येथे 2 July 1972 रोजी झाला. म्हणून हा करार सिमला करार या नावाने प्रसिद्ध आहे. या करारानुसार भारताने पाकिस्तानचे शरण आलेले 90000 हजार युद्ध कैदी पाकिस्तानास परत पाठवले. याशिवाय येथून पुढे, भारताशी कधीच युद्ध करणार नसल्याचे अभिवचन दिले .या करारावर दोन्ही पंतप्रधानांच्या सह्या झाल्या. यावेळी काश्मीर प्रश्नाबाबत ठोस निर्णय झाला नाही.

शिमल्यातील प्रसिद्‌ध ठिकाणे: Famous Places in Shimala.

1) थंड हवेचे ठिकाण: A Place of Cool Air, Shimala.

शिमला हे भारतातील थंड हवेचे ठिकाण आहे.उन्हाळ्यात संपूर्ण भारत तापलेला असतो, तेव्हा शिमला मात्र थंड असतो. 15 मार्च ते 15 जून हे शिमल्यासाठी खूप चांगले वातावरण आहे. जून महिन्यात पाऊस नसेल तर जून महिन्यांत सुद्धा शिमल्यामध्ये आल्हाद‌दायक वातावरण असते. म्हणूनच उन्हाळ्यात अनेक लोक हवा पालट‌ण्यासाठी शिमल्याला जातात. केवळ थंड हवा हे एकच कारणनाही.येथील हवा स्वच्छ, उत्साहवर्धक, आल्हाद‌दायक
आणि आरोग्यसंपन्न आहे. शिमल्याला गेल्यानंतर येथील द‌ऱ्याखोऱ्यात हिंडले पाहिजे. सुंदर आणि बर्फाच्छादित शिखरांचे निरीक्षण केले पाहिजे. हिवाळ्यात डिसेंबर ते 15 मार्च या काळात शिमल्याला प्रचंड थंडी असते. पावसाळ्यात काहीच पाहता येत नाही, म्हणून उन्हाळा किंवा ऑक्टोबर शिमल्यासाठी उत्तम महिना आहे.

2) काली माता मंदिर, Kali- Mata Temple, Bantoni

शिमल्याला शिमला किंवा सिमला हे नाव पडले. ते शिमल्यातील बँटोनी टेकडीवर असलेले कालिमातेच्या मंदिरावरुन शिमला म्हणजे श्यामालय (Shamalaya). म्हणजे निळ्या देवीचे वास्तव्य असलेले ठिकाण. ही निळी देवता म्ह‌णजेच कालिमाता होय. हे बँटोनी टेकडीवर असलेले कालिमातेचे मंदिर शिमला बसस्थानकापासून 2 ते अडीच किलोमीटर अंतरवर आहे. येथून अगदी अर्ध्या तासात चालत जाता येते. रिक्षानेही जाता येते. सध्या दिसत असलेले मंदिर 1845 साली बांधलेले आहे. एका बंगाली भक्ताने हे मंदिर पुनर्स्थापित केले आहे. या मंदिरात निळ्या रंगाची लाकडी कालीमातेची मूर्ती आहे.

(3) जाखू टेकडी, Jakhu Hill:

सिमला शहरातच बस स्थानका पासून दोन किलोमीटर अंतरावर जाखू टेकडीवर हे हनुमान मंदिर आहे. जाखू टेकडी हनुमान मंदिरासाठी प्रसिद्ध आहे .या टेकडीवर रामभक्त हनुमानाची भव्य मूर्ती उघड्या प्रांगणात आहे .ही मूर्ती 108 मीटर उंचीची आहे. राम-रावण युद्धात राम,लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर हनुमान संजीवनी वृक्ष शोधण्यासाठी हिमालयात आला होता. त्यावेळी तो या टेकडीवर विश्रांतीसाठी थांबला होता. या ठिकाणी यक्ष ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना हनुमानाने संजीवनी वृक्षासंबंधी विचारले.त्यांनी हा वृक्ष कोठे मिळेल, याची माहिती हनुमानाला दिली. यक्षा वरून याकू याकूवरुन याखू आणि याखूचे ‘जाखू’ असे अपभ्रंश होत गेले.मूळ यक्ष ऋषी वरुनच जाखू टेकडी असे नाव पडले. या टेकडीवर Trekking करण्यासाठी अनेक स्थानिक लोक येतात.

(4) टॉय ट्रेन Toy Train, Shimala.

कल्का ते शिमला आणि शिमला ते कल्का असा कोणताही एखादा प्रवास टॉय ट्रेन ने केल्यास ट्रीपचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. डोंगरदऱ्या, निसर्ग, बर्फ वृष्टी सारे काही आपल्याला पाहता येते, टॉय ट्रेनचे तिकीट 100रु ते 3000 रुपयांपर्यंत असू शकते. त्यासाठी advance Booking करावे लागते. चांगल्या नवीन ट्रेनमधून प्रवास कराण्यास हरकत नाही.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. .उटी: Ooty
  2. खजुराहो: Khajuraho

Leave a comment