भारत हा देश जसा डोंगर दऱ्यांचा आहे, तसाच तो नद्यांचा आहे. भारतात चार महिने पाऊस असतो, पण गंगा नदीला बारमाही पाणी असते. महाराष्ट्रातील गोदावरी नदी जशी सर्वात लांब नदी म्हणून आपण ओळखतो, तशी भारतातील सर्वांत लांब नदी म्हणजे गंगा नदी होय. या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे या नदीला बारमाही पाणी असते. म्हणून गंगेला उत्तर भारताची संजीवनी म्हणतात. गंगा ही दुभती गाय आहे. तिच्या खोऱ्यातील जमीन, शेतीवाडी बारमाही हिरवीगार असते. याच गंगा नदीचा उगम गंगोत्री [Gangotri],उत्तराखंड येथे झाला आहे. कुठे आहे हे Gangotri ठिकाण ? काय वैशिष्ट्य आहे या गंगोत्रीचे ? या बद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया.
गंगोत्रीची संक्षिप्त माहिती: Brief Information about Gangotri.
ठिकाणाचे नाव. : गंगोत्री / Gangotri
ठिकाणाचा प्रकार : भौगोलिक, सांस्कृतिक
ठिकाणाचे वैशिष्ट्य : गंगा नदीचे उगमस्थान
ठिकाण कोठे आहे : गंगोत्री, उत्तराखंड
हरद्वार पासून अंतर : 284 किलोमीटर
जिल्हा. : उत्तर काशी
राज्य : उत्तराखंड
डोंगररांग. :हिमालय,
गंगा नदीची लांबी : 2525 किलोमीटर
समुद्र सपाटीपासून उंची: 3140 मी.
कसे जायचे गंगोत्रीला? How to go to see Gangotri?
उत्तर काशीपासून गंगोत्री 17 किलोमीटर आहे.
डेहराडून पासून गंगोत्री 225 किलोमीटर आहे.
ऋषिकेश पासून गंगोत्री 258 किलोमीटर आहे. उत्तराखंड मध्ये डेहराडून, ऋषिकेशला रेल्वेने जाता येते. तेथून पुढचा प्रवास बसने करता येतो. गंगोत्रीपासून पुढे 19 किलोमीटर अंतरावर उगमस्थान आहे.
गंगोत्री कोठे आहे ? Where is gangotri in which state?
भारतातील सर्वात मोठा पर्वत म्हणजे हिमालय पर्वत होय. या हिमालय पर्वतात उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यात उत्तर काशी पासून 100 किलोमीटर अंतरावर गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री हे आहे. खरे तर गंगोत्रीपासून पुढे 19 किमी अंतरावर गंगा नदीचा उगमस्थान आहे .त्या ठिकाणाला गोमुख असे म्हणतात.गंगोत्रीचे आकाशातून ड्रोन द्वारे किंवा ड्रोन मॅप द्वारे निरीक्षण केल्यास गंगोत्रीच्या म्हणजे उत्तराखंडाच्या सभोवार हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश या राज्यांच्या आणि त्याच बरोबर चायना बॉर्डर, नेपाळ बॉर्डर या सर्व ठिकाणांपासून मध्यवर्ती ठिकाणी गंगोत्री आहे.
गंगोत्री कशासाठी प्रसिद्ध आहे? What is Gangotri famous for?
भारतातील सर्वांत लांब नदी म्हणजे गंगा नदी होय. या गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर आहे. या गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री येथे आहे. सौंदर्याची खान आणि स्वर्गभूमी म्हणून उत्तराखंड कडे आपण पाहतो. हिमालयाच्या डोंगररांगांचे प्रचंड सौंदर्य पाहण्याचा आनंद गंगोत्री येथे लुटता येते. बारमाही खळाळत राहणारे गंगोत्री नदीचे प्रवाह आपण पाहण्याचा आनंद लुटू शकतो. शॉक बसल्यासारखा थंडगार पाण्याचा स्पर्श येथे अनुभवता येतो. गंगोत्री येथे हिमालयाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांच्या सौंदर्याबरोबरच येथे असलेली गंगोत्री मंदिर [Gangotri Temple] केदार ताल ट्रेक (Kedar Tal Trek), सूर्य कुंड ( Surya Kund], भागिरथ शिला [Bhagirath Shila], गंगोत्री धाम [Gangotri Dham], गोमुख [Gomukh], केदारनाथ [Kedarnath] इत्यादी ठिकाणे पाहण्याचा आनंद घेता येतो.
गंगोत्रीला केव्हा जावे? When will you go to Gangotri
गंगोत्री म्हणजे प्रचंड थंडी असलेले ठिकाण. हिवाळ्यात तर बऱ्याच वेळा शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असते. रक्त गोठवणारी थंडी असते. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून महिना गंगोत्री साठी सर्वात उत्तम वेळ मानली जाते. या महिन्यात सुद्धा आपल्याकडे ऊबदार स्वेटर, हातमोजे, पायमोजे, शूज, कान टोपी उबदार शॉल जवळ असणे सर्वात सुरक्षित मानले जाते. गंगोत्रीचा आनंद घेण्यासाठी ऊबदार कपडे जवळ असणे गरजेचे आहे.
1. गोमुख Gomukh:
गंगा नदीचे उगमस्थान पाहण्यासाठी गंगोत्रीपासून 19 किलोमीटर पुढे जावे लागते. समुद्र सपाटीपासून सुमारे 4023 मीटर उंचीवर हे गोमुख आहे. गंगोत्री येथे गंगेला भागिरथी नदी येऊन मिळते. गंगोत्रीपासून पुढे गोमुख (Gomukh) ला जायला येथे घोडे, गाढवे भाड्याने मिळतात. ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांना या वाहनांचा उपयोग करता येतो. थंडगार वारे आणि खळाळणारे स्वच्छ आणि शुद्ध पाणी पाहायला मिळते. येथील पाणी प्यायला हरकत नाही गोमुखजवळ आल्यावर आपल्याला एका कपारीतून (गुहेसारखी) गंगेचा उगम झालेला दिसतो. तेथे अगदी कमी पाणी दिसते; पण प्रवाह पुढे जाईल तसे पाण्याची पातळी बर्फ वितळल्यामुळे वाढत जाते.
2. केदार ताल ट्रेक ( Kedar Tal Trek)
गंगोत्री पासून 14 किलोमीटर दूर केदार ताल ट्रेक आहे. हा प्रवास सुद्धा चालत करावा लागतो. किंवा घोडा, गाढव वाहन म्हणून वापरावे लागते. समुद्र सपाटीपासून जवळ जवळ 4600 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. येथे एक नैसर्गिक तलाव असून बर्फाच्छादित हिम शिखरे आणि हा छोटासा तलाव पाहून मन मोहून जाते.
3. गंगोत्री धाम Gangotri Dham:
गंगा नदीच्या उगम स्थानाच्या ठिकाणी म्हणजे गंगोत्री येथे उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री धाम ही एक देखणी आणि सौंदर्यसंपन्न इमारत आहे. भारतात प्रसिद्ध चार धाम आहेत. त्यांतील एक धाम म्हणजेच बद्रीनाथ धाम होय. हे उत्तराखंडात आहे. गंगोत्री धाम है गंगोत्री येथे आहे. शांत वातावरणात गंगोत्री धामच्या दर्शनाला गेलात तर मनाला अधिक समाधान वाटेल.
(4) भागिरथ शिला Bhagirath Shila:
भागीरथी नदी ही गंगा नदीची उपनदी आहे . गंगोत्री पासून 54 किलोमीटर अंतरावर या नदीचे उगमस्थान असून ही नदी खूप उथळ आहे. त्यामुळे हिचा खळाळणारा आवाज लक्ष वेधून घेतो. ही नदी गंगोत्री येथे येऊन गंगेला मिळते. गंगोत्री पासून पुढे गंगा नदी हेच नाव आहे. या भागिरथ नदीबद्दल अशी आख्यायिका आहे की भगीरथ या ऋषींनी कुदळीच्या साहाय्याने हिमालयातून पाण्याच्या प्रवाहाची वाट निर्माण केली. म्हणून या नदीला भागीरथ नदी असे म्हणतात. भागीरथ ऋषींनी खूप कष्टाने ही नदी निर्माण केली .म्हणून तेव्हापासून एक म्हण तयार झाली.भगीरथ प्रयत्न म्हणजे खूप प्रयत्न करणे. एखाद्या कामासाठी खूप कष्ट घेणे. गंगोत्री येथे भगीरथ शिला आहे.
5) सूर्यकुंड: Suryakund
गंगोत्री येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भागीरथी नदी सूर्याला अर्घ्य देऊन गंगेत प्रवेश करते. म्हणजे भागीरथी नदीच्या प्रवाहावर सूर्याची किरणे पडतात. हे दृश्य गंगोत्री धाम जवळून पर्यटकांना पाहता येते. या कुंडात शिवलिंग आहे असे मानले जाते.
गंगा नदी आणि पावित्र्य:
गंगा नदी उत्तराखंड राज्यात गंगोत्री येथे उगम पावून उत्तरप्रदेश, राज्यस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल या नऊ राज्यातून वाहत वाहत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगा नदी जसजशी पुढील राज्यात वाहत जाते, तसतशी तिची शुद्धता कमी-कमी होत गेली आहे. या नदीत अनेक गावांचे सांडपाणी, कारखान्यांचे सांडपाणी, मृत जनावरे, मृत व्यक्तींची रक्षा, फुले, पाने, कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, मैला टाकला जातो. मग ही नदी पवित्र कशी राहील? शिंगापुरात Mother river आहे. त्या नदीच्या पाण्यात उतरणे सुद्धा गुन्हा आहे. मग बाकीच्या गोष्टी तर सोडाच! आपण गंगा नदीला पवित्र नदी मानतो. तिला माता गंगा, गंगा मैया म्हणतो; पण तिची काळजी आपण घेतो का? मग ती पवित्र कशी राहील? गंगेचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून तुम्ही प्राशन केलात तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही. त्या बदल्यात कावीळ मिळेल.पोटाचा आजार मिळेल. सरकार गंगेच्या शुद्धतेसाठी काहीच करत नाही.
जनताही काळजी घेत नाही. सरकार आणि जनता दोघांनीही आपली मानसिकता बदलली, तरच गंगा नदी शुद्ध होईल.
हे सुद्धा आवर्जून वाचा