भारत हा महान देश आहे. भारतीय तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास अनेक पाश्चात्य विद्यापीठांतून केला जातो. या भारतीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे तत्तज्ञानच! जीवन जगण्यासाठी लागणारे मौलिक विचार होय. श्रीकृष्णाने कुरु क्षेत्रावर अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले, जे मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन म्हणजेच श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला गीता सार होय. हीच गीता भगवद्गीता म्हणून ओळखली जाते. या भगवद्गीतेवर शेकडो विचारवंतांनी ग्रंथ लिहिलेत. तरी सुद्धा ने अपूर्णच आहेत, असे म्हणावे लागेल. त्याच श्रीकृष्णाचा जन्म मथुरा (Mathura) येथे झाला. ही Mathura कुठे आहे? आता तेथे काय आहे ? या बाबत आपण अधिक माहिती घेऊया.
मथुरा कोठे आहे? Where is Mathura?
भारतात लोकसंख्येने सर्वांत मोठे असलेले राज्य म्हणजे उत्तरप्रदेश होय. या उत्तर प्रदेशातील आग्रा विभागातील मथुरा या जिल्ह्यात मथुरा हे नगर आहे. हे मथुरा जिल्ह्याचे प्रशासकीय शहर असून मथुरेतूनच जिल्ह्याचा कारभार चालतो.
मथुरेची संक्षिप्त माहिती: Brief Information of Mathura.
ठिकाणाचे नाव. :मथुरा
ठिकाणाचा प्रकार :सांस्कृतिक, ऐतिहासिक
ठिकाणाचे महत्त्व :श्रीकृष्णाचे जन्मस्थान
जवळची नदी :यमुना
स्थापना: महाभारत पूर्व काळ
जिल्हा: मथुरा
विभाग: आग्रा
राज्य : उत्तरप्रदेश
मथुरा कशासाठी प्रसिद्ध आहे ? What is Mathura famous for?
मथुरा ही श्रीकृष्णाची जन्मभूमी. ज्याने भारताला महान तत्त्वज्ञान दिले, महान विचार दिला. त्या श्रीकृष्णाची जन्मभूमी म्हणजे मथुरा आहे. श्रीकृष्णाला मथुरेच्या राजाने म्हणजे कंसाने ठार मारण्यासाठी त्याच्या आईवडिलांना मथुरेतच तुरुंगात ठेवले होते. सध्या या मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी, श्रीकृष्ण मंदिर, गीता मंदिर इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
श्रीकृष्णाचे आई वडील कोण? Who are Lord Krishna’s mother and father श्रीकृष्णाचे जन्मदाते आईवडील वसुदेव आणि देवकी हे होय. एकदा एका ज्योतिषाने कंसाला त्याचे भविष्य असे सांगितले होते की तुझ्या बहिणीच्या (देवकीच्या) आठव्या पुत्रापासून तुझा मृत्यू होणार आहे. या भविष्यावर अन्य ज्योतिषांनी असा सल्ला दिला की आठवा पुत्र पहिल्यांदा जन्मला तर ? किंवा अधेमध्ये जन्मला तर ? यावर कसा असा उपाय काढता येईल? वसुदेव आणि देवकीला डांबून ठेवायचे .जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची हत्या करायची.असा निश्चय कंसाने केला आणि याप्रमाणे वसुदेव देवकीला तुरुंगात डांबून ठेवले. पुढे यथाकाळ त्या दोघांना झालेले सहा पुत्रांना कंसाने स्वतः तुरुंगात येऊन मारले. सातवा पुत्राचा जन्म होण्या आधीच वसुदेव देवकीने रोहिणीच्या पोटात त्याचे गर्भ संकर्षण केले. तोच बलदेव अणि यशोदेच्या पोटातील मुलगी देवकीच्या पोटात संकर्षण केली. ती वाचली. पुढे वसुदेव देवकीला आठवा पुत्र झाला. तो रातोरात वसुदेवाने यमुना पार करून यशोदा-नंद यांच्या घरी आणून ठेवला.
कृष्ण यशोदाच्या घरीच लहानाचा मोठा झाला. यशोदा आणि नंद राजा हे दोघे श्रीकृष्णाचे पालक आईवडील झाले. पुढे कृष्णाने मोठा झाल्यावर मथुरेत जाऊन कंसाला ठार मारले. कंसाने लहान बालकांना मारून जे काही पाप केले होते, त्याची शिक्षा म्हणून कृष्णाने कंसाला ठार मारले आणि त्यामुळे ज्योतिषाचे भविष्य मात्र खरे ठरले.
कृष्णाचा जन्म भाणि मृत्यू केव्हा व कोठे झाला? When and Where did born Lord Krishna born?
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य/कृष्ण अष्टमीला झाला. तेव्हा द्वापार युग होते. श्रीकृष्णाचा मृत्यू कलियुगात झाला. श्रीकृष्णाचा मृत्यू केव्हा झाला हे सांगता येत नाही, पण त्याला मृत्यु मात्र सामान्य आला. श्रीकृष्ण योगी पुरुष होता. त्यामुळे त्याचे आयुष्य 150 ते 250 वर्षाच्या दरम्यान असेल,असा तर्क केला जातो. श्रीकृष्णाने महाभारत युद्धात कुरुक्षेत्रावर युद्धाचे शंख फुंकले आणि तेथून पुढे कलियुगाची सुरुवात झाली. एक युग म्हणजे 4 लाख 32 हजार वर्षे होय. श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात झाला आणि मृत्यू कलियुगात झाला. दोन युगाला सांधणारा दुवा म्हणजे श्रीकृष्ण होय.
*मथुरेला कसे जायचे ? How to go to see Mathura?
आग्र्याचा ताजमहाल आणि लाल किल्ला पाहून मथुरेला जाता येते. आग्रा ते मथुरा 57 किलोमीटर अंतर आहे. येथून बसने जाता येते. मुंबईहून रेल्वेने आग्र्याला जाता येते. तेथून मथुरेला जाता येते. ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) चा किल्ला पाहून तेथून रेल्वेने मथुरेला जाता येते.
* इंदौर (मध्यप्रदेश) येथूनही रेल्वेने मथुरेला जाता येते.
* कोल्हापूरहून थेट मथुरेला जाता येते. कोल्हापूर ते मथुरा किमान दोन ते दीड दिवस लागतात.
1.कृष्ण जन्म भूमी: krishna Janma Bhumi ,Mathura
मथुरेतील कृष्णाचा जन्म एका कारागृहात झाला होता. मधुरा येथे कैद्यांसाठी कंसाने बांधलेल्या कारागृहात कृष्णाचा जन्म झाला. सध्या या कारागृहाच्या ठिकाणी जन्मभूमी मंदिर आहे. प्रवेश द्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला कृष्ण कारागृह पाहायला मिळते. कंसाचे कारागृह कसे असेल ? याची कल्पना करून या ठिकाणी कारागृह बांधले आहे. कारागृह पाहताना आपण द्वापार युगात जातो आणि तत्कालीन कारागृहातील स्थिती आठवतो.
2. गीता मंदिर मथुरा: Geeta Mandir, Mathura
बिर्ला ग्रुपने भारतात अनेक मंदिरे बांधली आहेत.मथुरेतील गीता मंदिर सुद्धा बिर्ला मंदिर या नावाने ओळखले जाते. उत्तम वास्तुकला आणि चकचकीत संगमरवरी दगडापासून बनवलेले हे गीता मंदिर जितके आकर्षक आहे, तितकेच ते महत्त्वपूर्ण आहे.
गीता बिर्ला मंदिर मथुरेपासून 6 किलोमीटर अंतरावर असून शेठ जुगल किशोर बिर्लाने हे मंदिर बांधले आहे.महाभारत काळात कुरुक्षेत्रात कष्णाने जी गीता सांगितली त्या काळातील म्हणजे महाभारत काळातील काल्पनिक चित्रे येथे काढलेली आहेत. शिवाय येथे गीतेतील सातशे श्लोक संगमरवरी दगडात कोरलेले आहेत
येथे एक गीता स्तंभ आहे. त्या स्तंभावर श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन उभा आहे. मंदिर परिसर अत्यंत सुंदर आणि शांत वातावरणात आहे.
3. वृंदावन Vrindavan, Mathura.
मथुरेपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर यमुना नदीच्या कानावर वृंदावन आहे. हे वृंदावन अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे. येथील मंदिरातील कृष्ण दर्शन दुपारी 12:00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत बंद असते. सकाळी आणि संध्याकाळी आपणास दर्शन घेता येते.
मथुरा ठिकाणी छोटी छोटी खूप मंदिरे आहेत. सारे वातावरण कृष्णमय आहे. गेथील मुख्य गोविंद (कृष्ण) मंदिर खूप आकर्षक आणि सुंदर आहे. इ स 1590 मध्ये हे मंदिर राजा मानसिंगने बांधले होते. त्यावेळी हे मंदिर सात मजली होते. औरंगजेबच्या वाईट नजरेतून या मंदिरातील मूर्ती वाचवण्यासाठी राजा मानसिंगने मंदिरातील सर्व मूर्ती जयपूर मधील वाड्यात नेऊन ठेवल्या होत्या. पुढे 1850 मध्ये त्या मूर्ती मंदिरात पुनर्स्थापित करण्यात आल्या होत्या. येथे निधीवनात भक्तांच्या अनेक समाधी आहेत. या निधीवनात रात्री जाण्यास बंदी आहे. येथील रंगनाथ मंदिर अप्रतिम आहे. या मंदिराच्या आवारात 490 किलो सोन्याचा स्तंभ आहे. येथील श्रीकृष्ण शयन स्थितीत आहे. मथुरेपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हे वृंदावन आहे.
(4) प्रेम मंदिर, मथुरा: Prem Mandir, Mathura:
मथुरेपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर वृंदावन आहे या वृंदावनातच प्रेम मंदिर आहे. या मंदिरात सायंकाळच्या सुमारास लोक अधिक प्रमाणात येतात. याचे कारण म्हणजे या मंदिराला सजवलेल्या लेझर लाईटमुळे या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. श्रीकृष्णाचे एक कृपाळदास नावाचे भक्त होते. त्यांनी हे मंदिर इटालियन मार्बल वापरुन 150 कोटी रुपये खर्च करून बांधलेले आहे. संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे मंदिर खुले असते. या वेळी आपण हे मंदिर पाहू शकता. या मंदिरात राधाकृष्ण यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
राधाकृष्ण मंदिर सुंदर आहे. महाभारत काळात म्हणजे द्वापार युगाच्या शेवटाला आणि कलियुगाच्या सुरुवातीला कृष्ण या महान व्यक्तीचा जीवन काळ व्यतीत झाला. तत्कालीन महाभारताच्या कोणत्याही ग्रंथात ‘राधा’ या पात्राचा उल्लेख नाही. कृष्ण लीला यासारख्या ग्रंथांचा जन्म साधारण पणे 12 व्या शतकापासून सुरु झाला. त्यांत अनेक रंजक कथा घुसल्या. राधा हे पात्र निर्माण झाले. आणि त्यावर आधारित काव्ये, रास लीला लिहिल्या गेल्या.कृष्णाला रुक्मिणी,सत्यभामा अशा आठ बायका होत्या.
हे सुद्धा आवर्जून वाचा