शांतिनिकेतन: Shantiniketan

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे जीवनकार्य यांना दुवा साधणारा घटक म्हणजे Shantiniketan होय. Shantiniketan हे रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचे ध्येय बनलेले होते. आणि त्याच ध्येयाने झपाटून त्यांनी आनंददायी, कृतियुक्त शिक्षणाची निर्मिती करुन एक आदर्श शाळा कशी असते, याचा नमुना जगासमोर ठेवला.रवींद्रनाथ टागोर हे जात्याच कवी होते. त्यांनी लिहिलेला’ काव्यसंग्रह गीतांजली या नावाने प्रकाशित झाला आणि त्याच काव्य संग्रहाला 1513 साली रवींद्रनाथ टागोर यांना जागतिक द‌र्जाचा नोबेल पुरस्कार मिळाला. भारताला मिळालेला हा पहिलाच नोबेल पुरस्कार होता.याच रवींद्रनाथ टाथोरांनी ‘जन-गण-मन’ हे काव्य लिहिले: पुढे हेच काव्य आपले राष्ट्रगीत झाले. या रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत.

ठिकाणाचे नाव :शांतिनिकेतन / बोलपूर

स्थापना. :1901

संस्थापक: रवींद्रनाथ टागोर

ठिकाणचा प्रकार: शैक्षणिक, सांस्कृतिक

जिल्हा: बीरभूम

विभाग : बोलपूर

राज्य. : पश्चिम बंगाल

नामकरण: विश्वभारती वि‌द्यागिर

केंद्रीय विद्यापीठ दर्जा :1951

शांतिनिकेतनला कसे जायचे? How to go to Shanti- Niketan?

शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठ पश्चिम बंगाल राज्यातील बीरभूम जिल्ह्यात आहे. मुंबई किंवा दिल्लीतून कोलकात्यात विमानाने गेल्यास कोलकाता येथून 160 किलोमीटर अंतरावर शांतिनिकेतन आहे.कोलकात्याहून बसने किंवा रेल्वेने जाता येते.

झारखंड राज्यातील रांची या शहरापासून 313 किलोमीटर आहे. रांची ते शांतिनिकेतन बस, रेल्वेने जाता येते.

शांतिनिकेतन येथील विश्वभारती विद्यापीठ कशासाठी प्रसिद्‌ध आहे? What is Vishwa Bharati University at Shantiniketan famous for?

शांतिनिकेतन हे शहर जगप्रसिद्ध आहे. या शहरात रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 साली विश्वभारती( शांतिनिकेतन विद्यालय)वि‌द्यापीठ स्थापन केले. सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन हे विद्यालय स्थापन केले होते. पण त्यांचे या विद्यालयाच्या मर्यादित शिक्षणातून समाधान होईना. म्हणून त्यांनी 1921 साली शांति वि‌द्यानिकेतन विद्यालयाचे विश्वभारती वि‌द्यापीठ असे नामकरण केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या विश्वभारती वि‌द्यापीठाला 1940 साली भेट दिली होती. वि‌द्यापीठ‌ाचे सारे कामकाज पाहून गांधीजींनी खूप समाधान व्यक्त केले होते. आज शांति निकेतन येथील विश्व भारती वि‌द्यापीठ एक जग प्रसिद्ध वि‌द्यापीठ म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठाचा आदर्श घेऊन अनेक शाळा, महाविद्यालये जगभरात स्थापन झाली आहेत.

शांतिनिकेतन येथील विश्वभारती वि‌द्यापीठाचा इतिहास : History of Vishwa Bharati University at Shantiniketan.

रवींद्रनाथ टागोर यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथे झाला. रवींद्रराथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी बोलपूर या गावात एक आश्रम काढला होता. या आश्रमाला त्यांनी शांतिनिकेतन असे नाव दिले होते. पुढे त्यांचा पुत्र रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 साली मुलांसाठी कृतियुक्त शक्षण देणारे वि‌द्यालय काढले. सुरुवातीला या वि‌द्यालयाचे नाव ब्रह्म विद्यालय असे ठेवले होते;पण या नावाच्या बाबतीत ते फारसे समाधानी दिसत नव्हते. त्यामुळे नंतर त्यांनी या कृतियुक्त वि‌द्यालयाला शांतिनिकेतन वि‌द्यालय असे नाव दिले आणि त्याच नावाने हे विद्यालय प्रसिद्ध झाले.

रवींद्रनाथ टागोर यांना कडक शिस्तीतील घोकंप‌ट्टी वजा शिक्षण आवडत नव्हते. त्यांच्या मते मुलांना आनंद‌दायी वातावरणात आणि प्रयोगातून शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवून त्यांना शिक्षण देणे चुकीचे आहे. त्यांना व्यावहारिक शिक्षण दिले पाहिजे, की जेणे करून त्यांना अशा शिक्षणातून आनंद मिळेल. म्हणून असेच शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपल्या वि‌द्यापीठाची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले आणि 1921 साली या वि‌द्यानिकेतनचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. हा वटवृक्ष म्हणजे विश्वभारती वि‌द्यापीह होय. हे वि‌द्यापीठ स्थापन करताना रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते——–

“मला शांतिनिकेतन जातीपातीच्या आणि भौगोलिक स्थितीच्या बंधनात ठेवायचे नाही. पृथ्वीवरील समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आणि उद्धारासाठी हे वि‌द्यापीठ मी स्थापन करीत आहे. स्वादेशिक अभिमान न बाळगता विश्वबंधूता निर्माण करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारती वि‌द्यापीठ स्थापन करताना काही उद्‌दिष्टे डोळ्यांसमोर ठेवली होती. ती पुढील प्रमाणे

1. विविध दृष्टिकोनातून सत्याचा शोध घेण्यासाठी अध्ययन करणे

2. प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणे, त्यांच्यातील एकतेचा आणि शोधक वृत्तीचा अभ्यास करणे.

3. संपूर्ण जगाशी संपर्क ठेवून संस्कृतीतील मूल्ये जगासमोर ठेवणे.

4. हे शांतिनिकेतन असे सांस्कृतिक केंद्र आहे किंवा असेल की येथे या ठिकाणी धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान हे विषय शिकत असताना हिंदू, मुस्लिम, शीख ख्रिस्ती, बौद्ध, जैन इत्यादी धर्मातील आदर्श मूल्ये, कला यांचे अध्ययन आणि शोध कार्य करणे. पूर्व-पश्चिमी संस्कृतीतील आदर्श मूल्यांचा मिलाप करणे.

रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन वि‌द्यालयाचे रुपांतर विश्वभारती वि‌द्यापीठात करताना यत्र विश्वं भवत्येक नीडम ‘ हे घोष वाक्य ठेवले. या घोष वाक्याचा अर्थ आहे—-

‘सारे विश्व हे एक घर आहे’

याचा अर्थ रवीद्रनाथांनी स्वातंत्र्य पूर्व काळात निर्माण केलेल्या या वि‌द्यापीठात जाति- धर्माच्या संकुचित वृत्तीला थारा दिला नाही.

विश्वभारती वि‌द्यापीठातील शिक्षण: Education in Vishwa Bharati University.

भारत स्वतंत्र झाल्यावर भारत सरकारने केंद्रीय विश्वभारती वि‌द्यापीठाला 1951 साली ‘केंद्रीय विश्वभारती विद्यापीठ म्हणून मान्यता दिली. यापूर्वी 1940 साली राष्ट्र‌पिता महात्मा गांधीनी 1940 साली विश्व भारती वि‌द्यापीठाला भेट देऊन तेथील शिक्षण पद्धतीची पाहणी केली. आणि रवींद्रनाथ टागोर यांचे कौतुक केले.

सध्या विश्व भारती विद्यापीठात (1) Arts, Humanities, and Social Science

2) Science 3) ,Animation and Design 4) Education 5) Commerce या पाच विविध

शाखांमधून 176 प्रकारचे Courses शिकवले जातात. म्हणजे शांतिनिकेतनची व्याप्ती आणि विस्तार किती प्रचंड आहे, हे लक्षात येते.

1) Arts, Humanities, Social Science

कला, मानवता आणि सामाजिक शाखेत या विभागाशी संबंधित 124 Courses आहेत. यावरून विश्व भारती विद्यापीठ कोणाला गोष्टीला महत्त्व देते. हे लक्षात येते.

2) Science:

विज्ञान शाखेत वेगवेगळ्या प्रकारचे 32 कोर्सेस आहेत.

3) Animation and Design:

अ‍ॅनिमेशन आणि डिझाइन या शाखेंतर्गत वेगवेगळ्य प्रकारचे 10 कोर्सेस आहेत

4) Education

शिक्षण विभागांतर्गत 8 कोर्सेस आहेत.

5) Commerce.

वाणीज्य शाखांतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे 2 कोर्सेस आहेत.

विश्वभारती वि‌द्यापीठात सर्वकष शिक्षण मिळते. येथे माणूस घडवला जातो. यंत्रमानव नाही. आपल्या संस्कृतीचा ठेवा आणि परंपरा याचे महत्त्व येथे कळते . त्याची जपणूक येथे केली जाते. रवींद्रनाथ टागोर यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवून ते अंमलात आणले.

1 thought on “शांतिनिकेतन: Shantiniketan”

  1. आताच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान उपयुक्त नसून त्याच्या जोडीला व्यवहार ज्ञान ही आवश्यक आहे. कृती, कौशल्य यावर आधारित अभ्यासक्रम गरजेचं आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या विचारातून प्रकटलेले शांतीनिकेतन निसर्गाच्या सानिध्यात राहून कृतियुक्त शिक्षण मिळवण्याचे उत्तम ठिकाण आहे.

    Reply

Leave a comment