आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु राजघराण्याची काय परंपरा होती? कुठे आहे ही रामजन्मभूमी ? सविस्तर माहिती घेऊया.
रामजन्मभूमी (आयोध्येची )संक्षिप्त माहिती: Brief Information of Ram Janma Bhumi.
ठिकाणचे नाव :राम जन्म भूमी
ठिकाण कोठे आहे :आयोध्या
स्थापना : द्वापार युग
ठिकाणाचा प्रकार : सांस्कृतिक
लखनऊ हुन अंतर :136 किलोमीटर
वैशिष्ट्य : राम मंदिर
जिल्हा : आयोध्या
राज्य : उत्तर प्रदेश
जवळची नदी : शरयू
कसे जायचे आयोध्येला ? How to go to see Ayodhya?
* आयोध्या हे रामजन्म भूमीसाठी प्रसिद्ध असल्याने येथे विमानाने, रेल्वेने जाता येते. महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नागपूर येथून रेल्वेने, बसने जाता येते. कोल्हापूर ते आयोध्या sleeper class ये तिकीट 700 ते 1500 रु. पर्यंत वेळ आणि काळा नुसार असू शकते. पुणे, मुंबईहून असाच काहीसा दर असेल.
तुम्ही विमानाने लखनऊला गेला असाल तर तेथून 186 किलोमीटर अंतर बसने जाता येते.
भारतातील कोणत्याही राज्यातून आयोध्येला विमान, रेल्वे किंवा बसने जाता येते.
राम जन्म भूमीला (आयोध्येला) इतर कोणती नावे आहेत? What are the other names of Ram Janma Bhumi (Ayodhya)?
राजा राम हा आयोध्येचा श्रेष्ठ आणि लोकप्रिय राजा होता. त्याचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला द्वापार युगात झाला. राजा राम चा जन्म झाला, तेव्हा रामजन्मभूमीला आयोध्या असे नाव होते. वाल्मिकीने प्रथम रामायण लिहिले. वाल्मिकी हा राम समकालीन होता. त्याने आपल्या रामायण ग्रंथात आयोध्या असा उल्लेख केला आहे. म्हणजे त्या काळी आणि त्यापूर्वीच्या काही काळही अयोध्या असेच नाव आहे. आयोध्येला अयुद्धा , कोसल, साकेत या नावांनीही ओळखले जाते. पण ही नावे कोणत्या कालखंडात होती? बाबाबत निश्चित माहिती नाही.
आयोध्येचा (रामजन्मभूमीचा) इतिहास: History of Ayodhya Ram Janm Bhumi
रामायण कोणी व केव्हा लिहिले ? When and who has written Ramayan?
एखादी व्यक्ती मोठी होण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल कोणी तरी लिहावे लागते. तसा दर्जेदार लेखक मिळावा लागतो ‘रामायण’या महाकाव्याचे लेखन वाल्मिकीने केले. वाल्मिकी पूर्वी कोळी होतो. तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चोऱ्या करायचा. लुटमार करायचा. प्रसंगी खून करायचा; पण त्याला एक दिवस आपल्या या कुकर्माचा पश्वात्ताप झाला आणि हे कुकर्म सोडून देऊन तो वनात तपश्चर्या करू लागला. मग या वाल्याचा वाल्मिकी झाला. याच वाल्मिकीने ‘रामायण’ हे महाकाय लिहिले. वाल्मिकी हा राम समकालीन होता.त्याचा जन्म अश्विन शुद्ध पौर्णिमेला द्वापार युगात झाला.वाल्मिकीच्या रामायण ग्रंथावरुन नंतरच्या काळात अनेक लेखकांनी रामायण लिहिले. त्यात थोडा थोडा बदल होत गेला.
राम जन्मभूमीचा (आयोध्येचा) इतिहास: History of Ram Janm Bhumi [Ayodhya]:
आयोध्येचा राजा दशरथ हा कर्तबगार राजा होता. त्याला कौशल्या,कैकयी आणि सुमित्रा अशा तीन राण्या होत्या. कौशल्याच्या पोटी राम जन्मला. कैकयीच्या पोटी भरत जन्मला.तर सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोन मुलगे झाले.दशरथ राजा इक्ष्वाकु वंशीय होता.अर्थात रामही इक्ष्वाकु वंशीय होता. अशी एक घटना घडली की ज्यावेळी रामाचा जन्म झाला. त्यावेळी रावणाकडून दशरथ राजा प्रथमच युद्धात हरला होता. आणि तोही रावणाकडून. त्यामुळे दशरथ राजा रामाला अपशकुनी मानायचे; पण पुढे रामाने आपल्या स्वभावाने आणि कर्तृत्वाने दशरथ राजाचे मन जिंकले होते .म्हणुनच दशरथ राजाने रामाच्या राज्याभिषेकाचा सोहळा घोषित केला होता.
कैकयीने राज्याभिषेकाला विरोध केला. त्यामुळे रामाला पुढे 14 वर्षे वनवास भोगावा लागला.
रामाबरोबर सीता, लक्ष्मणही होते. राम, सीता, लक्ष्मण नाशिक जिल्ह्यातील पंचवटीच्या वनात राहत असताना तेथून सीतेला रावणाने पळवून नेले. खरे तर या घटनेला लक्ष्मण जबाबदार होता. त्याने रावणाच्या बहिणीचे शूर्पनखेचे नाक कापले नसते, तर पुढचे रामायण घडले नसते . ना सीता हरण, ना राम-रावण युद्ध.
रामने शंबुकाची हत्या केल्यामुळे रामाच्या जीवनात वनवास आला. असेही काही ग्रंथात उल्लेख आहे. पण रामाने शंबुकाची हत्याच केलीच नाही. रामाचे विचार आणि तत्त्वे पाहिली तर तो अशा निरपराध शंबुकाची हत्या कधीच करणार नाही. उलट ज्यांनी असे लिहून ठेवले आहे, यांच्याच पूर्वजांनी ती हत्या करून रामाच्या नावे खपवली आहे. उत्तर रामायण हे राम सीता, लक्ष्मण आयोध्येला आल्यानंतर घडले असल्याचे लिहिले आहे. केवळ कथेला रंजकता यावी म्हणून उत्तर रामायण तत्कालीन आणि त्या नंतरच्या लेखकांनी अक्षरश: रामायणात घुसवले आहे.
आयोध्येतील प्रसिद्ध ठिकाण: Famous Places of Ayodhya
1) रामजन्म भूमी / ‘राम मंदिर : Ram Janma Bhumi Ram Mandir.
राजा राम याचा जन्म ज्या ठिकाणी झाला , त्या ठिकाणी भव्य राम मंदिर बांधले आहे. रामजन्मभूमी- बाबरी मशिद विवाद बरीच वर्षे चालू होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा वाद चालू होता; पण 1985 पासून हा वाद उफाळून आला. 6 डिसेंबर 1992 रोजी कार सेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव होते.त्यानंतर दोन्ही बाजूंनी खटला कोर्टात गेला. अखेर 9 नोव्हेंबर 2019 रोजी रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रिम कोर्टाने नवीन निर्णय दिला. त्यामुळे मागील सर्व निर्वाच रद्द झाले तेव्हापासून रामजन्म भूमीच्या ठिकाणी नवीन राम मंदिर बांधण्याचे कामकाज चालू होते. 2019 च्या निर्णयानुसार बफ्फ बोर्डाला 5 एकर जागा उपलब्ध करुन देण्याचा आदेशही केंद्र सरकारला सुप्रिम कोर्टाला दिला होता.
सध्या नवीन बांधलेले राम मंदिर मार्च 2024 पासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.राम मंदिर बांधण्यासाठी सुमारे 700/800 करोड रुपर्व खर्च आलेला आहे. मंदिर आणि मेदिराचा परिसर, मंदिराकडे येण्याचा मार्ग यांत सुधारणा केली आहे.
आयोध्येत राम मंदिर व्यतिरिक्त हनुमान गढी, राजद्वार मंदिर, महादेव मंदिर, कालेराम मंदिर, नागेश्वर नाथ मंदिर, मणिपर्वत, दशरथ महाल, लक्ष्मण किल्ला इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.