खिश्चियन मैथियास थियोडोर मॉमसन
Christian Matthias Theodor Mommsen
जन्म : 30 नोव्हेंबर 1817
मृत्यू : 1 नोव्हेंबर 1903
राष्ट्रीयत्व : जर्मनी
पुरस्कार वर्ष : 1902
खिश्चियन मैथियास थियोडोर मॉमसन हे जर्मन इतिहासकार होते. ते बर्लिन berlin विश्वाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी ‘द हिस्टरी ऑफ रोम’ History of Rome हे पुस्तक लिहिले. इतिहासाच्या या आदर्शवत पुस्तकाला 1902 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. ते प्राचीन इतिहासतज्ज्ञ असूनही त्यांना आधुनिक काळातील घडामोडीचे चांगले ज्ञान होते. अनुवाद आणि मौलिक ग्रंथ एकत्र करून त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली.