मध्य प्रदेश हे राज्य जसे राजेराजवाडे, थंड हवेचे ठिकाण, खजुराहो साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते भव्य किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरचा किल्ला जसा भव्य आहे, तसाच हा मांडू किल्ला Mandu Fort प्रसिद्ध आणि भव्य आहे. मांडू या किल्ल्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया –
संक्षिप्त माहिती Brief Information of Mandu Fort:
ठिकाणाचे नाव : मांडू किल्ला.
ठिकाण :मांडव शहर
स्थापना : इ.स. 6 वे, 7 वे शतक
जिल्हा : धार
धार पासून अंतर : 36 किलोमीटर
राज्य : मध्यप्रदेश
किल्ल्याचा प्रकार : भुईकोट किल्ला.
किल्ल्याचे जुने नाव : मांडव गड
मांडवगडला कसे जायचे? How to go to see Mandu Fort?
1.) मध्य प्रदेशच्या धार या जिल्ह्याच्या ठिकाणापासून मांडवगडला जाण्यासाठी बसेस आहेत. येथून 36 किलोमीटर अंतरावर मांडवगड आहे.
२) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. भोपाळ पासून धार 263 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून मांडवगड 36 किमी अंतरावर आहे. भोपाळहून मांडवगडला जाता येते.
3) उज्जैनपासून धार 105 किलोमीटर आहे. येथून बसने धारमार्गे मांडवगडला जाता येते.
4) महाराष्ट्रातून इंदौरला विमानाने किंवा रेल्वेने जाता येते. इंदौर ते मांडवाड 95 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर बसने जाता येते.
मांडवगड कशासाठी प्रसिद्ध आहे? What is Mandavgad famous for?
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मांडवगड Mandu Fort या ऐतिहासिक स्थळासाठी प्रसिद्ध आहे. मांडवगड हा एक विशाल आणि ऐतिहासिक किल्ला आहे. येथील जहाज महल, हिंडोला महल, शाही हमाम, गोलघुमट इत्यादी ठिकाण प्रसिद्ध आहेत. ही सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आपल्याला इंदौर (Indore) पासून 95 किलोमीटर अंतरावरील मांडवगड ला जाणे आवश्यक आहे.
मांडवगडचा इतिहास : History of Mandavgad
विक्रम सवंत 612 या सालातील शिलालेखानुसार मंडपा दुर्गा येथे पार्श्वनाथाचे मंदिर बांधल्याचे आढळते. म्हणजे त्या काळी याच ठिकाणी वसाहत होती. पुढे मंडपाचे मांडू, मांडव झाले.
इ.स. 10 व्या 11 व्या शतकात या मांडवगडावर परमार राज्यघराण्यातील भोज राजांची सत्ता होती. त्या काळी परमार शिलाहार राजघराण्यांनी आपली सत्ता मध्य भारत व दक्षिण भारतातील काही प्रदेशावर प्रस्थापित केली होती. तत्कालीन परमार चे अपभ्रंश होऊन सध्या पवार’ या आडनावाने ओळखले जातात.
परमार राजघराण्यातील राजा जयवर्मन (दुसरा) याच्यापासून या गडावर परमारांची सत्ता असल्याचे तसे (पुरावे) आढळतात. परमारांनी दिल्लीच्या सुलतानांना आणि देवगिरीच्या कृष्णदेवराय यांना किल्ला वाचवण्यासाठी टक्कर दिली.
हुसेन शाह हा मांडूच्या किल्ल्याचा संस्थापक मानला जातो. त्याच्या नावावरून होशंगाबाद हे नगरही वसलेले आहे. मांडव गडापासून होशंगाबाद 386 किलोमीटर अंतरावर आहे.
राजा बाज बहाद्दूर आणि राणी रुपमती यांच्या प्रेमाचे प्रेमाचे प्रतीक म्हणून या मांडू किल्ल्याकडे पाहिले जाते. येथील रूपमती महल सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.
मांडवगडावरील प्रेक्षणीय स्थळे : Famous Points of Mandav gad
1. रुपमती महल : Rupmati Mahal, Mandu
मांडू किल्ल्यातील सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणजे रूपमती महल होय. राजा बाज बहाद्दूर याने त्यांच्या आणि रुपमतीच्या प्रेमाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी हा महाल बांधला होता. प्रथम या महालाच्या उभारणीचा पाया परमार राजा भोजने केला होता. त्यावेळी हा किल्ला (महल) सुरक्षेसाठी बांधला होता. त्यानंतर पाचशे वर्षांनी अकबरचा सेनापती बाज बहाद्दूर आणि राणी रुपमती यांच्या प्रेमाचे रंग सुरु झाले. रूपमतीने चंदेरीचा राजा मानसिंगला सोडून बाज बहाद्दूर सोबत राहू लागली. दोघेही उत्तम गायक असल्याने त्यांचे सूर जुळले होते. तिच्या इच्छेखातर बाज बहाद्दरने राणीला हवा तसा महाल बांधला होता. पावसाळ्यात हा किल्ला पाहण्यास वेगळीच मजा आहे. अकबराला रुपमतीच्या गायकीची कल्पना आल्यावर त्याने रुपमतीला ताबडतोब दिल्लीला आणण्याचा हुकूम दिला; पण बाज बहादूर ने हुकूम मानला नाही. शेवटी युद्ध झाले. युद्धात बाज बहाद्दूर मारला गेला.राणीने आत्महत्या केली; पण शत्रूच्या हाती लागली नाही, राणी रुपमती आणि बाज बहाद्दूरच्या प्रेमाचे प्रतीक आजही डौलाने उभे आहे.
हिंडोला / झुला महल – Hindola Mahal:
या महालाला झुलता महल असे म्हटले जाते; कारण या महालाच्या भिंती 77 अंशात झुकलेल्या आहेत. म्हणून या महालाला हिंडोला महल असे नाव पडले आहे. या महालाला चौदा दरवाजे आहेत. या महालाची रचना माळवा वास्तुशैलीची आहे. हा महाल जरूर पाहण्या सारखा आहे.