Saint Basaveshwar / संत बसवेश्वर

जन्म : 28 एप्रिल 1131
मृत्यू : अक्षय्य तृतीया 1167

जीवन परिचय Life Story of Basaveshwar.
संत बसवेश्वर यांच्या जन्मतारखेच्या बाबतीत एकवाक्यता नसली तरी त्यांचे विचार परिवर्तनशील होते हे महत्वाचे आहे.
वर्णजातिमूलक उच्च-नीचता आणि विषमता हे भारतीय समाजाचं खरं दुखणं आहे आणि या मुळावर घाव घातला गेला पाहिजे, याची जाणीव भारतातील ज्या थोर चिंतकांना झाली; त्यांतील बसवेश्वर हे एक प्रमुख होते. जन्माने कन्नड असूनही संपूर्ण दक्षिण भारतावर त्यांनी आपल्या विचारांची आणि कार्याची छाप पाडली. चातुर्वर्णाला आव्हान देऊन त्यांनी सर्व मानवांना समान मानलं. वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा त्यांनी अभ्यास केला व वर्णभेद, वर्गभेद आणि जातिभेद या बाबी अमानवी आहेत असं मानून त्यांना कडाडून विरोध केला. जुन्या धर्माच्या अनावश्यक, टाकाऊ परंपरा समाजाने सोडून द्याव्यात यासाठी पशुहत्या, बालविवाह विन आदी अंधश्रद्धांना त्यांनी नाकारलं. बाराव्या शतकातील भारतीय समाजासमोर असे विचार मांडणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं निश्चितपणे द्रष्टेपणाचं व क्रांतिकारक स्वरूपाचं होतं

रविंद्रनाथ टागोर / Rabindranath Tagore

बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांच्यातील बंडखोरीचा कुटुंबीयांना प्रत्यय आला. त्यांच्या मुंजीची तयारी झाल्यावर त्यांनी मुंज करून घेण्याचं नाकारलं. पुढे ते बिज्जल राजाकडे कोषागार मंत्री होते. मात्र त्यांनी धर्मसुधारणेचं काम हाती घेतल्यामुळे आणि हे कार्य पटत नसणाऱ्यांनी बिज्जलाचे कान भरल्यामुळे बिज्जल व बसवेश्वर यांच्यात मतभेद झाले. हे मतभेद इतके विकोपाला गेले की, बिज्जलाचं सैन्य आणि बसवेश्वर यांचे अनुयायी यांच्यात सातत्याने खटके उडू लागले. या झगड्याला कंटाळून ते कूडलसंगम इथे गेले व तिथंच त्यांनी समाधी घेतली.

बसवेश्वर यांचे तत्त्वज्ञान- Philosophy of Basaveshwar

बसवेश्वर आपल्या मतांशी आयुष्यभर चिकटून राहिले. तत्कालीन समाजव्यवस्थेला हादरे देणारे विचार ते मांडत असल्यामुळे त्यांच्याबद्दल एका गटात मोठाच असंतोष होता. परंतु त्याची त्यांनी फिकीर केली नाही. धर्मसुधारणेचं हाती घेतलेलं काम त्यांनी चालूच ठेवलं. ते बसवेश्वर- पूर्व काळात हिंदू, बौद्ध, जैन हे धर्म आणि कापालिक, कालामुख आणि शास्त हे पंथ अस्तित्वात होते. बसवेश्वरांनी वीरशैव धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन वेगळी वाट चोखाळली. शिव हा एकमेव ईश्वर असल्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी शिकवण त्यांनी दिली. दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती आणि शील यांचा त्यांनी आग्रह धरला.

वर्णभेद, जातिभेद आणि धर्मातील कुप्रथांना तिलांजली देण्यासाठी बसवेश्वरांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. बसवकल्याण या गावी त्यांनी शिवानुभवमंडप नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत विविध जाती-जमातीतील स्त्री-पुरुषांना मुक्त प्रवेश असे. तिथे होणाऱ्या चर्चामार्फत बसवेश्वरांनी लोकांमध्ये बंधुभावाचा विचार पसरवला. बसवेश्वरांच्या जातिभेद-विरहित संघटनेच्या रचनेमुळे सर्व जातींतील लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. ज्या काळी जातिभेद कडकडीतपणे पाळले जात असत त्या काळी बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाह लावून दिले. लोकांना रोटीव्यवहार व बेटीव्यवहार करण्यास त्यांनी उद्युक्त केलं. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अस्पृश्याच्या घरी जाऊन जेवणही केलं होतं. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळायला हवी, असा त्यांचा कटाक्ष असे. सर्व मानव समान आहेत हे त्यामागील सूत्र बसवेश्वरांनी स्वीकारलं होतं व इतरांनीही ना त्याचं अनुकरण करावं असा त्यांचा आग्रह होता. स्वतःच्या वीरशैव धर्मात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही दीक्षा देण्याची प्रथा त्यांनी पाडली होती. ‘कायकवे कैलास’ म्हणजे ‘शारीरिक श्रम हाच स्वर्ग’ हा सिद्धांतही त्यांनी मांडला. त्यांच्या या सिद्धांतामुळे श्रमप्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा त्यांचा हेतू होता, असं मानलं जातं. बसवेश्वरांनी हे सारे प्रयत्न प्रायोगिक पातळीवर ठेवले नाहीत, हे त्यांचं खरं – मोठेपण. त्यांनी अनेक ठिकाणी मठ बांधले व धर्मसुधारणेचे प्रयत्न सर्वत्र जारी ठेवले.

बसवेश्वर यांचे लेखन writing of Basaveshwar

बसवेश्वरांचे समकालीन चिंतक तत्त्वज्ञ सहसा संस्कृतमध्ये लेखन करत. परंतु जनसामान्यांपर्यंत आपला उपदेश पोचवावा या उद्देशाने न त्यांनी कत्रड भाषेतून ‘षट्स्थलवचन’, ‘कालज्ञान’, ‘मंत्रगौप्य’, आणि ‘विद्यारत्नवचन’ असे धर्मग्रंथ लिहिले. बसवेश्वरांची चरित्रंही  तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये लिहिली गेली. त्यामुळे दक्षिण भारतात बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार होणं सोपं गेलं. आजही बसवेश्वरांना मानणारा मोठा वर्ग दक्षिण भारतात दिसतो.

Leave a comment