फ्रेड्रिक मिस्राल
Frederic Mistral
जन्म: 8 सप्टेंबर 1830
मृत्यू: 25 मार्च 1914
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष : 1904
फ्रेड्रिक मिस्राल हे फ्रान्सचे सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि नाटककार होते. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील त्यांना वकील बनवणार होते, परंतु त्यांची रुची साहित्यात होती. त्यांनी फ्रान्सची प्राचीन भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यासाठी फार मोठे योगदान दिले होते. प्राचीन दंतकथा, गोष्टी, कादंबरी यांना कवितेचे रूप दिले. त्यांच्याबरोबर 1904 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जोस एकेगारे यांनाही मिळाला होता.
साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते / First Nobel Laureate in Literature