साहित्यातील नोबेल पुरस्कार 2006
जिओसे काडूसी
Giosue Carducci
जन्म : 27 जुलै 1835
मृत्यू : 16 फेब्रुवारी 1907
राष्ट्रीयत्व : इटालियन
पुरस्कार वर्ष : 1906
जिओसे काडूसी हे इटलीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून कविता लेखनास सुरुवात केली. ते युवा कवींचे आदर्श होते. रोमँटिक कविता लिहिण्यापेक्षा शास्त्रीय साहित्य कवितेत आणण्याची त्यांची इच्छा होती. ते एक चांगले वक्ते होते आणि साहित्याचे चांगले अध्यापक होते. त्यांचे जीवन अत्यंत कष्टात गेले होते. 1906 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार स्वीकारण्यास ते जाऊ शकत नव्हते. तरी सुद्धा स्वीडनच्या राजाने विशेष दूत पाठवून त्यांच्या घरी पुरस्कार प्रदान केला.
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते Nobel Prize Winner in Literature