साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर
Gurudev Ravindranath Tagore
जन्म: 7 मे 1861
मृत्यू : 7 ऑगस्ट 1941
राष्ट्रीयत्व : भारतीय
पुरस्कार वर्ष: 1913
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन आणि तेथे केलेले अध्यापन कार्य यामुळे त्यांना ‘गुरूदेव’ ही उपमा मिळाली. रवींद्रनाथ टागोर यांच्या रूपाने प्रथमच एका भारतीय साहित्यिकाला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या गीतांजली या काव्य संग्रहाला हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे कथालेखन, बालसाहित्य, नाटक, कादंबरी इत्यादी लेखन अत्यंत कौशल्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेली ‘जन-गण-मन अधिनायक जय हे…’ ही सुप्रसिद्ध कविता भारत सरकारने ‘राष्ट्रगीत’ म्हणून स्वीकारले. पाश्चात्त्य देशात गुरुदेव टागोर यांना भारतीय संस्कृतीचे प्रचारक मानले जाते.