Amazon river dolphin
ॲमेझॉनचे जंगल हे जगप्रसिद्ध जंगल आहे. या जंगलात लाखो जीव आहेत. शेकडो प्रकारचे प्राणी आहेत. सुमारे 430 प्रकारचे सस्तन प्राणी (mammals) आहेत. Amazon rainforest मधून जी भव्य नदी वाहते, त्या नदीला ॲमेझॉन नदी म्हणतात. या ॲमेझॉन नदीत अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. डॉल्फिन हा मासा आढळतो या डॉल्फिनला Amazon river dolphin म्हणतात. South America या खंडात असणाऱ्या ऍमेझॉन नदीतील डॉल्फिन ला ‘bottos’ असे म्हणतात. हा डॉल्फिन नेहमी Amazon नदीच्या ताज्या पाण्यात आढळतो. Bottos डॉल्फीनला bufeo किंवा pink river dolphin असेही म्हणतात. मानवानंतर सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणून आपण डॉल्फिन ला च ओळखतो . डॉल्फिन माणसाशी चांगली मैत्री करू शकतो. माणसाला संकटकाळी मदत करु शकतो. डॉल्फिन हा mammal (सस्तन) प्राणी आहे. तो मांसाहारी प्राणी असून डॉल्फिन हा नेहमी fish, crabs, turtles, shirimps (कोलंबी) आणि इतर लहान जलचर प्राणी खातो. दक्षिण अमेरिका मधील Amazon river च्या शुद्ध पाण्यामध्ये आढळणारा हा डॉल्फिन जगात इतरत्र कुठेही विशेषत: आढळून येत नाही.
Dolphin हा सस्तन प्राणी असल्याने ते अंडी घालत नाहीत. ते पिलांना जन्म देतात. पिले जन्मतःच पोहायला लागतात. डॉल्फिन मादी काही काळ पिल्ले मोठी होईपर्यंत पिलांच्या सोबत राहते.
हे सुद्धा आवर्जून वाचा