दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest (ॲमेझॉनचे जंगल) हे जगातील घनदाट आणि जीवसृष्टीने समृद्ध असलेले असे हे ॲमेझॉन जंगल आहे. हे जंगल Amazon Rainforest या नावाने ओळखले जाते. अनेक प्रकारचे प्राणी, सरिसृप, कीटक, वनस्पती यांनी हे जंगल नटलेले आहे. या ॲमेझॉन च्या जंगलाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
अमेरिकेतील ॲमेझॉनचे जंगल संक्षिप्त माहिती : Amazon Rainforest: Brief Information
ठिकाणाचे नाव: ॲमेझॉनचे जंगल
ठिकाण कोठे आहे: South America
व्यापलेले क्षेत्र : 67,00,000 sq. km
प्रसिद्धी : विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती.
मुख्य जंगल : Brazil.
1. ॲमेझॉनच्या जंगलांचे खास वैशिष्ट्य काय आहे? What is the special about Amazon rain- forest ?
ॲमेझॉन रेन फॉरेस्ट हे जगातील सर्वात भव्य, वैविध्यपूर्ण आणि जैवविविधतेने नटलेले आहे.
या जंगलात जवळजवळ 40000 प्रकारच्या वनस्पती आहेत. 3000 प्रकारचे मासे आणि जलचर प्रकारचे प्राणी आहेत. 1300 प्रकारचे पक्षी आहेत. 430 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत आणि 25,00,000 प्रकारचे कीटक आहेत.
मग कल्पना करा, की ॲमेझॉनचे जंगल किती भव्य आणि दिव्य आहे ते. या जंगलात एखादा माणूस हरवला (without mobile and Compass) तर सापडणे कठीण आहे.पण याच जंगलात अनेक संशोधक तळ ठोकून असतात. आणि आपले संशोधनाचे कार्य करतात.
2. ॲमेझॉनचे भव्य जंगल कोणकोणत्या देशात पसरलेले आहे? In which country is the Amazon rainforest spread?
ॲमेझॉनचे हे भव्य जंगल दक्षिण अमेरिकेत व्यापलेले असले तरी या जंगलाचा जवळजवळ 60 % भाग म्हणजे सुमारे 42,00,000 चौरस किमीचा भाग ब्राझीलमध्ये व्यापलेला आहे. आणि बाकीचा 25,00,000 चौरस किमीचा भाग बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, गुयाना, पेरु, सुरीनेम, व्हेनेझुला, फ्रेंच, गयाना इत्यादी देशांत व्यापलेला आहे.
आणि बाकीचा 25,00,000 चौरस किमीचा भाग बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, गुयाना, पेरु, सुरीनेम, व्हेनेझुला, फ्रेंच, गयाना इत्यादी देशांत व्यापलेला आहे.
3. ॲमेझॉनचे जंगल भारताच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे कां? Is Amazon rainforest area bigger than India?
अमेरिकेतील ॲमेझॉनचे जंगल हे जगात सर्वात भव्य आहेच. त्याच बरोबर ते भारताच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्रफळ या जंगलाचे आहे. भारताचे क्षेत्रफळ सुमारे 32,87,263 चौ. किमी आहे तर ॲमेझॉनच्या जंगलाचे क्षेत्रफळ 67,00,000 चौ. किमी आहे.
4. अमेझॉन म्हणजे काय ?What is meaning of Amazon?
ॲमेझोनास हे प्राचीन पराक्रमी महिला योद्ध्यांचे प्रतिकात्मक रुप आहे. याचाच अर्थ Amazon होय. ॲमेझॉन म्हणजे प्राचीन ग्रीक पराक्रमी महिला योद्धे. प्राचीन ग्रीक कथेच्या संदर्भातून Amazon हे नाव घेतले आहे.
5. या जंगलाला ॲमेझॉन रेन फॉरेस्ट असे नाव का दिले आहे? Why is it called the name ‘Amazon rainforest?
ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात असलेल्या जंगलाला ॲमेझॉन रेन फॉरेस्ट असे नाव खरे तर ॲमेझॉन नदीवरुन दिले आहे. ज्याला स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेत रिओ ॲमेझोनास असे म्हणतात. Amazonas हे प्राचीन ग्रीक कथेतील पराक्रमी महिला योद्ध्यांचे प्रतिकात्मक रुप आहे. Amazonas चे रुपांतर पुढे Amazon असे झाले.