साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जॅकिन्टो बेनावेन्टे
Jacinto Benavente
जन्म : 12 ऑगस्ट 1866
मृत्यू : 14 जुलै 1954
राष्ट्रीयत्व : स्पॅनिश
पुरस्कार वर्ष: 1922
जॅकिन्टो बेनावेन्टे हे स्पेन देशाचे महान नाटककार होते. त्यांनी नाटकात वास्तववाद आणण्याचा प्रयत्न केला. पद्याच्या ठिकाणी गद्य भाग आणला आणि कॉमेडीच्या ठिकाणी दर्जेदार प्रभावशाली घटना आणल्या. त्यांचे नाटक विचारप्रवर्तक असायचे. ‘इंटरेस्ट बाँड’, ‘एलतामो ब्रेसिटो’, ‘डॉल्स हाउस’ इ. त्यांची नाटके प्रसिद्ध नाहेत. त्यांच्या समग्र नाटकांना १९२२ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.